नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांनी पाहिलेले स्वप्न आमदार संग्राम भैय्या जगताप व अध्यक्ष सचिनभाऊ जगताप यांनी पूर्ण केले..नवीन पंचकर्म सेंटर उद्घाटन सोहळा.. उद्योजक नरेंद्र फिरोदिया व पद्मश्री पोपटराव पवार यांचे शुभहस्ते संपन्न. – प्रेरणा जनहित मंच

स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांनी पाहिलेले स्वप्न आमदार संग्राम भैय्या जगताप व अध्यक्ष सचिनभाऊ जगताप यांनी पूर्ण केले..नवीन पंचकर्म सेंटर उद्घाटन सोहळा.. उद्योजक नरेंद्र फिरोदिया व पद्मश्री पोपटराव पवार यांचे शुभहस्ते संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहिल्यानगर : स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांनी पाहिलेले आयुर्वेदिक आरोग्यसेवेच्या विस्ताराचे स्वप्न आमदार संग्राम भैय्या जगताप आणि आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिनभाऊ अरुणकाका जगताप यांनी साकार केले. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचलित गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद रुग्णालय, अहिल्यानगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पंचकर्म सेंटरचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

स्वर्गीय अरुणकाका जगताप यांची जनसेवेची दूरदृष्टी, समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची तळमळ आणि आयुर्वेद उपचारपद्धतीला प्रोत्साहन देण्याची संकल्पना आज प्रत्यक्षात उतरली आहे. आमदार संग्राम भैय्या जगताप व अध्यक्ष सचिनभाऊ जगताप यांनी पुढाकार घेत त्यांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप दिल्याने हा सोहळा भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार, नरेंद्र फिरोदिया, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, सभापती सुभाष लोमटे, सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे सचिव डॉ. विजय कुमार भंडारी यांच्या हस्ते पद्मश्री पोपटराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. संचालक प्रा. अनिल मुरकुटे यांच्या हस्ते नरेंद्र फिरोदिया, प्रा. अरविंद शिंदे यांच्या हस्ते उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, संचालक ज्ञानदेव पांडुळे यांच्या हस्ते सभापती सुभाष लोमटे यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला.

सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. सतीश सोनोनें, बांधकाम व्यावसायिक राजेश भंडारी, एपीएन कॉर्पचे संचालक तथा बांधकाम व्यावसायिक आशिष भोकर्णा, उद्योजक गवनेश भिंगारवाला, डॉ. निलेश शेलके, डॉ. भोलुपी, मातृत्वम् हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज मते आणि डॉ. युवराज पाटील यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या पंचकर्म सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेदाच्या पारंपरिक उपचारपद्धतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार असून, आरोग्य संवर्धन व रुग्णसेवेच्या क्षेत्रात रुग्णालयाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या जनसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेत आमदार संग्राम भैय्या जगताप आणि अध्यक्ष सचिनभाऊ जगताप यांनी साकारलेला हा उपक्रम अहिल्यानगरच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

तुमची चुकली असेल