महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पारदर्शक परीक्षेचे समर्थन करते… डॉ. नंदकुमार बेडसे.
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सांगली…

कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहँडचे कैवारी संस्था-चालकांचे लाडके, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) चे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (भा. प्र. से.) यांनी सांगली जिल्ह्याच्या पहिल्या एकदिवशीय अधिवेशनास उपस्थित राहून संस्था-चालकांसोबत दिलखुलास संवाद साधला.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, सांगली येथील मराठा सेवा संघ हॉल मध्ये कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहँडची एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना डॉक्टर नंदकुमार बेडसे म्हणाले की, विद्रोहाला जन्माला घालू नका, खरे बोलायला शिका. परीक्षेतील 99 टक्के समस्या कमी झाल्या आहेत. विनाकारण परीक्षा परिषदेला बदनाम करू नका. विद्यार्थी चुकल्यास मान्य करावे. आपले अपयश दुसर्यावर ढकलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कॉम्प्युटर आपल्या कमांडप्रमाणे काम करतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू असतांना स्क्रीनवर गोल फिरणे म्हणजे कॉम्प्युटर हॅंग झाला असा त्याचा अर्थ लावणे चुकीचे असून, पुढील सूचनेसाठी वाट पहाणे असा अर्थ घ्यावा. यावर टाईमअपचा उपाय काढला असून, यापुढील परीक्षेत सरळ टाइमअपचा मेसेज दिसणार आहे. परीक्षा परिषदेचा नवीन सर्व्हर सक्षम करण्यात आला असून, परीक्षा चालू करताना व पेपर सबमिट करतानाच इंटरनेट लागणार आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांकडून अनावधानाने चुकीचे कि-कॉम्बिनेशन वापरल्याने प्रॉब्लेम निर्माण होतात. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून परीक्षा केंद्रावर सी.सी. टी.व्ही. बंधनकारक करण्यात आले आहेत. मागील परीक्षेत राज्यात 48 केंद्रावर परीक्षा परिषदेने स्वत: सी.सी.टी.व्ही. लावले असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून, कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत प्रत्येक विषयात गुणानुक्रमे येणार्या पहिल्या 5 विद्यार्थ्याची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येते. अनधिकृत गोष्टी टाळण्यासाठी यापुढे विद्यार्थ्यांची मोबाइलवर हजेरी चालू करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कर्तव्यदक्ष, अभ्यासू, प्रामाणिक संस्था-चालकांचे कैवारी तर अनधिकृतांचा कर्दनकाळ म्हणजेच डॉक्टर नंदकुमार बेडसे अशी भावना संस्था-चालक व्यक्त करीत आहेत. सर्व संस्थांनी एल. एम. एस. हा परीक्षा डेमो विद्यार्थ्यांना द्यावा असे आवाहन त्यांनी केले. सर्व संस्थांच्या अडीअडचणीसाठी समन्वय समिति गठित करण्याबरोबर क्वेरी मॅनेजमेंट सिस्टम तयार केली जात आहे. परीक्षेतील संगणक प्रमाणित असल्याची खात्री करणारे हेल्थ स्टेटस सॉफ्टवेअर विकसित केले असल्याचे ते म्हणाले. राज्यातील 206 संगणक संस्था विद्यार्थी परीक्षेस न बसविल्याने बंद होत्या त्यांना प्रतिवर्षी किमान 5 विद्यार्थी परीक्षेस बसविणे व किमान 5 वर्ष हस्तांतरण न करणे या अटीवर त्या संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून, या संस्थांनी याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले. वर्षातील दोन्ही परीक्षांचे वेळापत्रकही 20 जून ते 20 जुलै व 20 डिसेंबर ते 20 जानेवारी या दरम्यान घेण्याची योजना आखली जात आहे. अभ्यासक्रमात बदल केला जात असून, ए. आय. टूल्सचा समावेश केला जात आहे. विद्यार्थी हितावह सारथी, बार्टी या योजना चालू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिक्षणाधिकारी मा. राजेसाहेब लोंढे साहेब व उपशिक्षणाधिकारी गीता शेडगे मॅडम यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी शिक्षणाधिकारी मा. राजेसाहेब लोंढे व उपशिक्षणाधिकारी गीता शेंडगे यांनी आपल्या कामकाजाचा आढावा दिला. राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी आपले मनोगतात सांगली जिल्ह्यात कित्येक वर्षांनंतर होत असलेल्या पहिल्या अधिवेशनाचे कौतुक केले, स्वअनिल कुलकर्णी यांच्यानंतर शोएब मुजावर एक उत्तम पदाधिकारी राज्यसंघतनेस लाभला असल्याचे नमूद केले कराळे यांनी जिल्हा समिती गठीत करणे प्रत्येक तालुक्याला परीक्षा केंद्र देणे नियमावलीचे पालन करून हस्तांतर स्थलांतर व नवीन प्रकरणे मंजूर करण्याची मागणी केली, msbt व कौशल्य विकास कडून अनैसर्गिक स्पर्धा हा चिंतेचा बाब असून डॉ बेडसे सर सारखे सुधारणावादी अधिकारी तिथे नेमले जावे असे नमूद करून डॉ बेडसे यांनी केलेला सुधारणेला संघटनेचा कायम पाठिंबा असल्याचे नमूद केले.यावेळी जेष्ठ संस्थाचालक मोटे सर व छत्रपती संभाजीनगरचे मोहनराव भोमे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दुपारच्या सत्रामध्ये लघुलेखनवर अनुराधा थिटे, कॉम्प्युटर टायपिंगवर हेमलता ढमढेरे तर ए.आय. वर संतोष झंझाड सर यांनी महितीपूर्ण कार्यशाळा घेतली. तब्बेतीच्या कारणाने कार्यशाळेस हजर राहू न शकलेले व सर्वांना तांत्रिक अडचणीत मदतीचा हात देणारे जेष्ठ संस्था-चालक श्री रविकांत जेरे यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.) यांनी त्यांच्या घरी त्यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांगली जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री रविंद्र रणनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हाप्रतिनिधी श्री शोएब मुजावर यांनी केले. या कार्यक्रमास राज्य संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व संस्थाचालक मोठ्या संखेने उपस्थित होते.
वार्तांकन: द्वारा व्ही. सी. पुजारी, सांगली
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





