नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जालना येथील टंकलेखन संस्था चालिका सौ आनंदी अय्यर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान…. – प्रेरणा जनहित मंच

जालना येथील टंकलेखन संस्था चालिका सौ आनंदी अय्यर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*
ब्राह्मण समाज अधिवेशन समितीतर्फे गुणवंतांचा सत्कार; सौ. आनंदी सुब्रमण्यम अय्यर यांना ‘समाजभूषण पुरस्कार’*

जालना : ब्राह्मण समाज अधिवेशन समिती, जालना यांच्या वतीने गांधी चमन येथील ब्राह्मण सभागृहात आयोजित गुणवंतांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
*याप्रसंगी शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सौ. आनंदी सुब्रमण्यम अय्यर यांना मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.*

*सौ. अय्यर या गेली अनेक वर्षे संगणक शिक्षणाचा प्रसार, युवकांना कौशल्याधारित शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला.*

या सोहळ्यास ब्राह्मण समाज अधिवेशन समितीचे पदाधिकारी, मान्यवर, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : ब्राह्मण समाज अधिवेशन समिती, जालना आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ‘समाजभूषण पुरस्कार’ स्वीकारताना सौ. आनंदी सुब्रमण्यम अय्यर.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031