नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन जालना नगरीत हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा..अध्यक्ष प्रकाश कराळे, स्वागताध्यक्ष ,महासचिव संतोष दानी. – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन जालना नगरीत हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा..अध्यक्ष प्रकाश कराळे, स्वागताध्यक्ष ,महासचिव संतोष दानी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊


महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन संघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन ५ एप्रिल रोजी मुक्तेश्वर सांस्कृतिक लॉन जालना येथे हजारो संस्थाचालक परिवार उपस्थितीत होत असून अधिवेशनास शिक्षणमंत्री नामदार दादासाहेब भुसे उद्घाटक तर ना.पंकजा मुंढे अध्यक्ष स्थान भूषविणार….

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.श्री. दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते, तर पर्यावरण तथा पालक मंत्री ना.मा.श्री. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.श्री.डॉ.पंकज भोयर, सत्कार मूर्ती ना.मा.श्री.अतुलजी सावेमाजी शिक्षण मंत्री व लोकमत चिफ एडिटर मा.श्री. राजेंद्रजी दर्डा,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे,आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी केंद्रीय मंत्री, मा.श्री. रावसाहेबजी दानवे, मा.खासदार डॉ. कल्याणरावजी काळे, आमदार मा.श्री. राजेश राठोड, आमदार मा.श्री. हिकमत दादा उढाण, आमदार मा.श्री. नारायणजी कुचे, आमदार मा.श्री. संतोषजी दानवे, आमदार मा.श्री. बबनरावजी लोणीकर, आमदार मा.श्री. अर्जुन खोतकर, माजी मंत्री मा.श्री. राजेश टोपे , माजी आमदार श्री. कैलासजी गोरंट्याल, आमदार मा.श्री. परिणय फुके , आमदार मा.श्री. संग्रामभैय्या जगताप, जिल्हाधिकारी मा.श्रीमती आशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक मा.श्री. अजयकुमार बन्सल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम,मा.महेश चोथे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महापौर मा.श्रीमती वंदना मगरे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक मा.श्री. कैलास दातखिळे, उपमहापौर मा.श्री. राजेश राऊत, शिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब खरात, माजी शिक्षण संचालक, मा.श्री. महावीर माने, संघटनेचे मार्गदर्शक, शिक्षणतज्ञ मा.श्री. रमेश खानविलकर, मार्गदर्शक ॲड.सुधीर आकार, संघटनेचे माजी सदस्य तथा नुतन नगरसेवक मा.श्री. महेश माळवदकर, संस्थाचालक व महापौर मा.श्री. आशिष आतकरे, सभापती स्थायी समिती म.न.पा. जालना मा.श्री. अशोक अण्णा पांगारकर, कायदेशीर सल्लागार ॲड. एन.बी. नरवडे (हायकोर्ट), कायदेशीर सल्लागार ॲड .शेखर दरंदले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मान्यवरांना उद्घाटन सोहळा व गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या अधिवेशनास संस्था चालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, स्वागताध्यक्ष महासचिव संतोष दानी यांनी केले आहे.
अधिवेशनात राज्यातील संस्थाचालकांच्या व लाखो विद्यार्थी हिताच्या शासनाकडील व परीक्षा परिषदेकडील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या जाणार आहेत त्या पुढील प्रमाणे….
१) सुधारित नियमावली १९९१-२०२६ टंकलेखन, संगणक टंकलेखन, लघुलेखन मान्यता व संचालन. (शैक्षणिक पात्रता ६ वी शहरी १ कि.मी. व ग्रामीण ३ कि.मी. अंतर, संस्थाचालकांची प्राचार्य पद, शुल्कवाढ, प्रोप्रायटरशीप, आदि दुरुस्तीसह सादर नियमावलीस) तत्काळ मान्यता देणे.
२) महाराष्ट्र राज्य ज्ञानमंडळ (MKCL) चा CCPT, कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण मंडळ कॉम्प्युटर टायपिंग यांनी टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न चालवला, त्यास शासनाचे मान्यता न देणे.
३) शासनाचे महामंडळ : सारथी, बार्टी, महाज्योती, अल्पसंख्याक कामगार मंडळ, अमृत या मंडळांचे प्रशिक्षण अभ्यासक्रमात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा संगणक टंकलेखन GCC-TBC व लघुलेखन GCC अभ्यासक्रमाचा समावेश करून उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना शुल्क परत करणे.
४) महाराष्ट्र राज्यात विनाअनुदानित संस्था चालकांना ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ योजनेसारखी ‘लाडका संस्था चालक’ योजना सुरू करून आर्थिक मदत करणेबाबत.
५) महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) चे काम चालू असलेल्या शासनमान्य प्राप्त संस्थांना देऊन प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे.
६) संगणक टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांना शैक्षणिक दराने विद्युत पुरवठा लागू करणे.
७) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून वर्षात ३ परीक्षांचे आयोजन करणे.
८) महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यात परीक्षा केंद्रासाठी शासनाने आर्थिक मदत करणे.
९) शासनमान्य संस्था या स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रोप्रायटरशिप पद्धतीने स्थापन झालेल्या असल्याने, सुधारित नियमावलीत धर्मादाय संस्था वगळून प्रोप्रायटरशिप पद्धत सुरू ठेवणे.
१०) शासनमान्य प्रशिक्षण संस्थांना कोणतेही अनुदान किंवा आर्थिक मदत नसल्याने शहरी भागात १ कि.मी. व ग्रामीण भागात ३ कि.मी. अंतर पूर्वीप्रमाणे ठेवणे.
११) शासनमान्य प्रशिक्षण संस्थांप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. व बायोमेट्रिक हजेरी (आधारबेस) लागू करणे.
१२) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून GCC-TBC ३०, ४०, ५०, ६०, इंग्रजी व मराठी/हिंदी ३०, ४० अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देणे.
१३) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे LMS सॉफ्टवेअर सक्तीचे न करता ऑफलाईन व संस्थेच्या लॉगिन मधून उपलब्ध करून देणे.
१४) संगणक टंकलेखन, लघुलेखन प्रशिक्षण, अभ्यासक्रमाची शैक्षणिक पात्रता इयत्ता ६ वी करणे.
१५) संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थांना शासन मान्यता, शालेय शिक्षण विभागीय व हस्तांतर, स्थलांतर मान्यता अधिकार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे देणे.
१६) जिल्हा व विभागीय समित्या गठित करण्याबाबत सुधारित नियमावलीमध्ये तरतूद करणे.
१७) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने GCC-TBC परीक्षा, सॉफ्टवेअर स्वतः तयार करून परीक्षा घेणे अथवा मराठी व हिंदी विषयाच्या परीक्षा सुरळीत होणे कामी ठोस निर्णय घेणे.आदी मागण्या सादर केल्या जाणार आहेत.
श्री. प्रकाश कराळे, अध्यक्ष, श्री. संतोष दाणी, महासचिव/स्वागताध्यक्ष, श्री. घनश्याम कुंबलकर, वरिष्ठ उपाध्यक्ष ,श्री. सुरेश केशवराव देवरे परीक्षा सचिव,श्री. पंकज एकनाथ ठाकूर कोषाध्यक्ष, श्री. जोसेफ एलीस रुबेन प्रसिध्दी प्रमुख, श्री. गोवर्धन मोगलय्या विरकुंवर प्रवक्ता, श्री. श्रीकांत केशव जोशी, सह कोषाध्यक्ष, श्री. संजय गजाननराव लेडांगे सह सचिव, श्री. अनिल जीवनधरराव कडू उपाध्यक्ष, श्री. अनुरथ बाबुराव घुमरे उपाध्यक्ष, श्री. संजय बाबुराव राणे उपाध्यक्ष, श्री. नरेश वामनराव बोमेवार उपाध्यक्ष, श्रीमती. जयश्री प्रतापसिंग पाटील उपाध्यक्ष, श्री. रविकांत विठ्ठलराव पवार उपाध्यक्ष, श्री. समीर अशोक म्हात्रे उपाध्यक्ष, श्री. सुभाष भगवानराव नाईकवाडे उपाध्यक्ष, श्री. सचिन बापू घाटगे उपाध्यक्ष, श्री. शशिकांत प्रभाकर रसाळ नि. उपाध्यक्ष, श्री. शोएब सिकंदर मुजावर नि. उपाध्यक्ष, श्री. संजय सिताराम बोराटे नि. उपाध्यक्ष, श्री. रोडगे प्रताप शिवाजीराव सदस्य तथा नि. उपाध्यक्ष, श्री. लतिश भाऊसाहेब बलकवडे परीक्षा सहसचिव, श्री. वसंत रामचंद्र तांबोळी सदस्य तथा नि. उपाध्यक्ष, श्री. ज्ञानेश्वर मारोती वाघ परीक्षा सहसचिव, श्री. तुळशीदास नारायणराव खसाळे परीक्षा सहसचिव, श्री. महादेव किसन शिवरकर परीक्षा सहसचिव, श्री. शेख सत्तार शेख रज्जाक परीक्षा सहसचिव, श्री. अरुण फत्तेलाल चांडक का. सदस्य अध्यक्ष स. समिती, स्मरणिका प्रमुख अनुराधा थिटे, सर्व राज्य कार्यकारणी अधिवेशन यशस्वी करण्यास प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे ६१ वर्षात प्रथमच जालना जिल्ह्यात अधिवेशन होत असल्याने सर्व संस्थाचालक आणि जालना जिल्हा कार्यकारिणी
मुख्य पदाधिकारी अरुण चव्हाण जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील भावसार जिल्हा सचिव श्री. एस. बी.सहारे कोषाध्यक्ष,श्री. सुनील कुलकर्णी कार्याध्यक्ष,श्री. समाधान मुळे उपाध्यक्ष, श्री. प्रभाकर कुदर,परीक्षा सचिव सौ.आनंदी अय्यर कार्यकारिणी सदस्या,सौ. शारदा खालापुरे सदस्या,श्री. सुरेश भाडळकर सदस्य श्री. पवन उफाड सदस्य,श्री. प्रेमदास आडे सदस्य,सौ. जयश्री संगमुळे सदस्या,जालना जिल्हा शहरी व ग्रामीण टंकलेखन व लघुलेखन संस्थेची संघटना, जालना सर्व सभासद संस्था चालक अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत. ६१ व्या राज्यस्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी संघटना अध्यक्ष अरुण चव्हाण व त्यांचे सहकार जिल्हा कार्यकारणीने आवाहन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031