नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन लघुलेखन संघटनेचे 61 वे राज्यस्तरीय अधिवेशन जालना येथे 5 एप्रिल 2026 रोजी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे उपस्थितीत होणार…. प्रकाश कराळे. – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन लघुलेखन संघटनेचे 61 वे राज्यस्तरीय अधिवेशन जालना येथे 5 एप्रिल 2026 रोजी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे उपस्थितीत होणार…. प्रकाश कराळे.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*॥ चलो जालना… चलो जालना… ॥*
महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थाची संघटना (MSCEIA)राज्यस्तरीय 61 वे अधिवेशन जालना येथे मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह जालना येथे 5 एप्रिल रोजी… हजारो संस्थाचालक हजर राहणार.

अहिल्यानगर….महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांच्या शिखर संघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन ऐतिहासिक जालना नगरीत आयोजित करण्याचे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व संस्थाचालकांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.
राज्य कार्यकारिणीच्या दि. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी उपस्थित राहून राज्यातील संस्था-चालकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. याच बैठकीत डॉ.बेडसे साहेबांचा यथोचित सन्मान करून त्यांना अधिवेशनाचे निमंत्रणही प्रदान करण्यात आले आहे.
तसेच, मालेगाव येथे राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांना या अधिवेशनाचे उदघाटक म्हणुन निमंत्रण देण्यात आले आहे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंढे अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भूषवणार असून संकट मोचन msceia स्मरणिकेचे प्रकाशन शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे हस्ते होणार आहे अधिवेशनास नामदार अतुलजी सावे,माजी शिक्षण मंत्री राजेंद्रजी दर्डा, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे यांचे सह खासदार, आमदार, महापौर, , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, शिक्षण विभाग अधिकारी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचे तपशील:
* दिनांक ५ एप्रिल २०२६ 3 वाजता उदघाट्न सोहळा
* स्थळ: जालना (महाराष्ट्र) मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह

*महत्त्वाच्या सूचना व आवाहन:*
१. मोठ्या संख्येने उपस्थित राहा: राज्यातील समस्त संस्था-चालकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि संघटना बळकटीकरणासाठी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
२. जिल्हास्तरीय निधी: संघटनेच्या निर्णयानुसार, या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याने २५,०००/- रुपये मदत निधी जमा करावयाचा आहे.
३. विशेष आभार: अत्यंत कमी कालावधीत हे मोठे धाडस स्वीकारल्याबद्दल संघटनेचे महासचिव संतोष दानी सर आणि जालना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण सर यांचे राज्य संघटनेच्या वतीने विशेष आभार मानण्यात येत आहेत.
*चला, आपण सर्वजण मिळून हे ६१ वे अधिवेशन यशस्वी करू या!*
निमंत्रक….
*प्रकाश कराळे*
*अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्था संघटना (MSCEIA)*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930