नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.सोमनाथ घार्गे यांची ओळख.. डॉ. उद्धव शिंदे – प्रेरणा जनहित मंच

कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.सोमनाथ घार्गे यांची ओळख.. डॉ. उद्धव शिंदे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  1. *कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक घार्गे यांची ओळख : डॉ. उद्धव शिंदे*


    *’स्नेहबंध’तर्फे नूतन पोलीस अधीक्षकांचा सत्कार*

    *अहिल्यानगर – लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची ओळख आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.*
    *नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा डॉ. शिंदे यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक (नगर शहर) प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कलुभर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व सर्व पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे उपस्थित होते.*
    *डॉ. शिंदे म्हणाले, घार्गे यापूर्वी श्रीरामपूर येथे १ ऑगस्ट २००६ ते २२ जानेवारी २००९ या कालावधीत उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. घार्गे त्यांनी पोलीस दलाच्या अधुनिकीकरणावर मोठा भर दिला. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे बनवण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. पोलीसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले. पोलीस प्रशासनाला लोकाभिमूख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिस्तप्रिय आणि मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या रुबाबदार, शैलीने गुन्हेगारीवर आळा घालतील असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930