नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते मानपत्र देऊन सन्मान…. – प्रेरणा जनहित मंच

राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते मानपत्र देऊन सन्मान….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*राष्ट्रमाता जिजाऊ महिला पतसंस्थेच्या वतीने ह.भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचा गौरव* .


राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन व राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सवच्या नि निमित्त हरी ह भ प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला त्या प्रित्यर्थ त्यांचा व त्यांच्या धर्मपत्नी सत्यभामा (अक्का)बद्रीनाथ तनपुरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व समाजातील एमपीएससी यूपीएससी व अन्य क्षेत्रात नावीन्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला यानिमित्त सत्कार मूर्ती ह भ प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप उपस्थित होते, सचिनभाऊ जगताप यांनी आपले मनोगतात १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले तसेच राजमाता जिजाऊ नी छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली व स्वराज्य निर्मितीचे कार्य पूर्णत्वास नेले म्हणून आज आपण सुखी असल्याचे सांगितले.यावेळी मार्गदर्शन करताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी पतसंस्था चालवत असताना अतिशय काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून कामकाज केले पाहिजे अन्यथा पाहता पाहता पत्त्याच्या बंगल्यासारख्या काही संस्था मोडकळी झालेल्या आपण पाहिलेले आहेत परंतु पतसंस्था चळवळ ही अर्थव्यवस्थेमध्ये गरजेचे असलेले चांगली संस्था चालून आदर्श घालून देण्याची पण गरज आहे त्या दृष्टीने राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेने कामकाज करावे अशी अपेक्षा आहे

राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्था   ही सकल मराठा समाज व  शिवप्रेमी हितचिंतक  मंडळ यांचे  नियंत्रण आहे त्यामुळे सकल मराठा शिवप्रेमी मंडळ पतसंस्थेच्या पदाधिकारी यांनी आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक काम  करतांना कार्यकर्त्यांनी  वेसनाधीन्तेकडे लक्ष द्यावे त्या दृष्टीने काम करावे अशी आमची अपेक्षा आहे विशेष करून तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे त्यामध्ये काम करणे अत्यावश्यक आहे

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांच्या अनुभवातील पाण्यातील अनेक बाबी विशद करून कशा पद्धतीने समाजासाठी जागृत राहून काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले
या वेळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते डॉ सुनील कदम निघोज तालुका पारनेर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल प्राध्यापक शरद अंबादास बोरुडे यांचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली कार्य आणि एन एस एस च्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य तसेच त्यांचा तेजस दत्तात्रय जगताप,
कापुरवाडी ता. अहिल्यानगर त्यांचीयुपीएससी , मुख्य कार्यकारी अधिकारी , गृहविभाग , नविदिल्ली .निवड झाल्याबद्दल,डॉ.प्रफुल गाडगे
सीईओ , बायोमी टेक्नॉलॉजीजप्रा. लिमिटेड .
अहिल्यानगर . यांनी जैविक शेती क्षेत्रात “केलेल्या कार्याबद्दल महेश शिवाजी हरिश्चंद्रे पोखर्डी , ता. अहिल्यानगर यांची एमपीएससी , उपजिल्हाधिकारी म्हणून निवड म्हणून
कु . योगिता अंकुश नरवडे ,टाकळी, खातगाव .अहिल्यानगर . यांची युपीएससी , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , ग्रेड २ निवड निवड झाल्याबद्दल इंजिनियर विकास तुकाराम शिंदे यांची कार्यकारी अभियंता जल संपदा विभाग पदोन्नती झाल्याबद्दल ऍड.अनुराधा येवले यांची अहमदनगर जिल्हा बारासोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल तसेच शिवश्री आबासाहेब गाडे यांची. निवड झाल्याबद्दल तसेच शिवश्री इंजिनियर शिंदे यांची यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला .
तसेच ह भ प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना सकल मराठा शिवप्रेमी मंडळ व राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने देण्यात आलेला मानपत्र शिवश्री दत्तात्रेय लहानु कर्डिले यांनी तनपुरे बाबांची माहिती एकत्रित करून मानपत्र तयार केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे अमोलजी शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला .संस्थेच्या व्हाइस चेअरमन डॉ.अंजली खिलारी यांनी संस्थेने वर्धापन वर्षात 2 कोटीच्या ठेवी उभारून सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्ज वितरण केल्याचे वर्धापन दिनी नेवासा येथे सभासदाच्या सोईसाठी संस्थेचे कामकाज आमदार विठलराव लंघे यांचे हस्ते उद्घाटन करून सुरू करत असल्याचे चेअरमन सौ सुनीता रामकृष्ण कर्डिले, मानद सचिव सविता प्रकाश कराळे, स्वाती साठे, शोभा कांबळे, कांता बोठे , मायाताई जगताप, कांता बोडखे, सुरेखा तापकीर, सुलोचना कराळे, सविता बेर्डे, अक्षदा रहाणे, श्रीमती सुशीला कापसे,मंगला कराळे, सिंधुताई हार्दे आदी व्यासपीठावर सांगितले होते.शेवटी आभार प्रकाश कराळे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930