राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी सौ. प्रियांका विलास शिंदे व सौ.सुरेखा चंद्रकांत तापकीर यांची नियुक्ती…चेअरमन सौ सुनीता रामकृष्ण कर्डिले…समाजात योगदान देणाऱ्यांचा सन्मान .
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या स्वीकृत संचालक पदी सौ. प्रियांका विलास शिंदे व सौ सुरेखा चंद्रकांत तापकीर यांची नियुक्ती……
नगर.. अहमदनगर येथील नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी सकल मराठा शिवप्रेमी हितचिंतक मंडळाचे भिंगार येथील सदस्य विलास शिंदे यांच्या पत्नी सौ. प्रियांका शिंदे व सकल मराठा शिवप्रेमी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री.चंद्रकांत तापकीर यांच्या पत्नी सौ.सुरेखा तापकीर यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्यात आली, नूतन संचालिकांचा संस्था कार्यालयामध्ये चेअरमन सौ.सुनीता रामकृष्ण कर्डिले यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालिका मायाताई दत्तात्रय जगताप, मानद सचिव सविता प्रकाश कराळे, जयश्री काळदाते, सुरेखा गाडे, सकल मराठा चे ज्येष्ठ सदस्य संस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण कर्डिले, बापूसाहेब ओव्हाळ, इंजिनियर बप्पासाहेब बोडखे, विलास शेडाळे , सुरेश करपे, चंद्रकांत तापकीर, नारायण कडू, विलास शिंदे, रामदास काळदाते , संभाजी नांगरे , प्रकाश कराळे
दिनकर ठानगे , श्री. निक्रड आदी उपस्थित होते…
यावेळी चंद्रकांत तापकीर, रामदास काळदाते, विलास शिंदे, प्रकाश कराळे, रामकृष्ण कर्डिले यांनी मार्गदर्शन केले, संस्थेच्या मार्च अखेर 5 कोटीच्या ठेवी करून संचालक मंडळाचा मानस पूर्ण करण्याची ग्वाही दिली, तसेच सकल मराठा व शिवप्रेमी हितचंतक मंडळाचे कार्य घरोघरी नेण्याचा संकल्प सर्वांनी केला , तज्ञ संचालक निवडी बद्दल संचालिका प्रियांका शिंदे व सुरेखा तापकीर यांनी आभार व्यक्त करून आमच्या व परिवाराच्या समाजातील योगदान व कर्तव्याची जाणीव संस्थेच्या मार्गदर्शकाची व संचालक मंडळाची भूमिका सन्मान करणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या….
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space