नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना मुंबई MSCEIA चे दि.५ व ६ मे रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन ..अधिवेशनाचे उदघाटक दि.५ मे रोजी शिक्षणमंत्री ना.दिपकजी केसरकर यांचे शुभहस्ते तर अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, अधिवेशनाचा गौरव व समारोप सोहळा दि.६ मे रोजी शुभहस्ते माजी शिक्षण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे ….प्रकाश कराळे – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना मुंबई MSCEIA चे दि.५ व ६ मे रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन ..अधिवेशनाचे उदघाटक दि.५ मे रोजी शिक्षणमंत्री ना.दिपकजी केसरकर यांचे शुभहस्ते तर अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, अधिवेशनाचा गौरव व समारोप सोहळा दि.६ मे रोजी शुभहस्ते माजी शिक्षण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे ….प्रकाश कराळे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दिनांक ५ व ६ मे रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे ६० वे राज्यस्तरीय हीरक महोत्सवी अधिवेशन….

अधिवेशनाचा उदघाटन समारंभ राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपकजी केसरकर यांच्या शुभहस्ते व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
तर अधिवेशनाचा गौरव सोहळा व समारोप मसोहळा दिनांक ६ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार श्री. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते हस्ते व माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे .
उदघाटन सोहळ्यास राज्याचे माजी शिक्षण मंत्री व लोकमत चीफ एडिटर राजेंद्रजी दर्डा यांना स्मरणिका प्रकाशक व सत्कारमूर्ती म्हणून निमंत्रित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे , आमदार भरतशेठ गोगावले, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी सभापती विधान परिषद आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,नाशिक पदवीधर मतदार संघाचे नुतन आमदार श्री. सत्यजित दादा तांबे ,
जिल्हा संघाचे संचालक व सहकार महर्षी बाबुराव तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन व जिल्हा मजूर संघाचे नूतन संचालक नामदेवराव ढोकने पाटील,जिल्हा मजूर संघाचे चेअरमन अर्जुनराव बोरुडे, व्हाईस चेअरमन विकास उर्फ विकिशेठ जगताप, संचालक उत्तमराव घोगरे पाटील,संचालक विजय गायकवाड यांना सत्कारमूर्ती म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर उत्तर चे खासदार श्री.सदाशिवराव लोखंडे , संघटनेचे मार्गदर्शक आमदार भरत शेठ गोगावले संघटनेचे मार्गदर्शक आमदार तान्हाजीराव मुटकुळे ,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर राज्याचे माजी मंत्री व आमदार बबनरावजी पाचपुते, राज्याचे माजी मंत्री व आमदार प्राध्यापक राम शिंदे, अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप ,आमदार मोनिकाताई राजळे, पुणे शहर शिवसेना अध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे शिक्षक तज्ञ रमेश खानविलकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस जिल्हा मजूर संघाचे संचालक आदींना उदघाटन सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे.

माजी महसूलमंत्री आमदार श्री.बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणाऱ्या गौरव सोहळा व समारोप सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्री.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्य अरुणकाका जगताप, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व आमदार शंकरराव गडाख राज्याचे माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे ,आमदार लहुजी कानडे ,आमदार अशुतोष काळे ,आमदार निलेशजी लंके ,आमदार रोहित दादा पवार आमदार डॉ.किरण लहामटे, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक व परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष महावीर माने ,परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा दराडे ,जिल्हा मजूर संघाचे चेअरमन अर्जुनराव बोरुडे व्हाईस चेअरमन विकास उर्फ विकी शेठ जगताप सहाय्यक आयुक्त संगीता घोडेकर शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शिर्डी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, जिल्हा मजूर संघाचे संचालक विजय गायकवाड संघटनेचे सल्लागार ऍड.शेखर दरंदलेपाटील आदी मान्यवरांना गौरव सोहळा व समारोप सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना ही १९६२ ची नोंदणीकृत संघटना राज्यातील टंकलेखन,लघुलेखन व संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणाऱ्या शासन मान्य संस्थांची शिखर संघटना म्हणून गेली ६० वर्षापासून कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यस्तरीय अधिवेशन व आमसभेचे आयोजन केले जाते या अधिवेशनात राज्यातील संस्थाचालकांच्या विविध प्रश्नावर विचारविनिमय करून शासन दरबारी मांडले जातात संस्थाचालकांच्या अडचणी महत्वाचे प्रश्न सोडवणूक करून संघटना वाटचाल करत आहे संघटनेने संगणक युगात क्रांतिकारी निर्णय घेऊन पारंपारिक मॅन्युअल टंकलेखन ला पर्याय म्हणून संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेऊन हजारो संस्थांना परिवर्तित केले आहे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे हे गेली १३ वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळीत असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत संस्थाचालकांच्या मान्यता, नूतनीकरण, व परीक्षा संचलन कामात संघटनेचे भूमिका महत्त्वाचे असते. त्याचबरोबर शासनाला विविध नवीन उपक्रम सुचवणे त्याचा पाठपुरावा करणे व त्याची अंमलबजावणी करणे याकामी सातत्याने प्रयत्न करणे हे संघटनेचे काम असते संघटनेच्या माध्यमातून अहमदनगर येथे ५० व्या सुवर्णमहोस्तवी अधिवेशनात माजी शिक्षणमंत्री राजेंद्रजी दर्डा साहेब यांनी मॅन्युअल टंकलेखन नंतर संस्थाचालकांची उपजीविका कायम सुरू राहावी व त्यांचे टंकलेखन प्रशिक्षणाचे कार्य संगणक टंकलेखन प्रशिक्षणात परिवर्तित व्हावे या कामी निर्णय घेऊन ३१ ऑक्टोबर २०१३ ला शासन आदेश निर्गमित केला आणि त्याची अंमलबजावणी होऊन आज राज्यातील संस्था उत्तम प्रकारे संगणक प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे,राज्याचे आजी माजी शिक्षणमंत्री यांनी संघटनेसाठी व राज्यातील शासनमान्य संस्थांसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. विद्यमान शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी शासनाने जाहीर केलेली सुधारित नियमावली १९९१-२०२२ मधील काही जाचक अटी वगळून अधिवेशनापूर्वीच सर्व शासनमान्य टंकलेखन लघुलेखन व संगणक टकलेखन संस्थाच्या पाठीशी शासन उभे असल्याचे दाखवून दिले आहे, प्रशासनाने शासन आदेश २५ जानेवारी २०२३ मध्ये सुचवलेल्या सुधारित नियमावलीतील बहिस्थ विध्यार्थी, सार्वजनिक न्यास करणे, कार्यरत संस्थांमधील अंतर भाडे, १० वर्षाचे भाडे करार, संस्थांसाठी संस्थाचालकांचे संस्थाचालक प्राचार्य पद, अभ्यासक्रमातील शैक्षणिक अट, अशा अनेक बाबी क्लिष्ट होत्या त्या दूर करण्यासाठी शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांनी १५ फेब्रुवारी २०२३ रोजी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्यातील जुन्या संस्था व त्यांच्या वारसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याचबरोबर बहिस्थ सारखा संस्थांना देशोधडीला लावणारा निर्णय मागे घेतला जाईल, भरमसाठ शुल्कवाढ कमी केली जाईल, स्पर्धेचा विचार करता दोन संस्थान मधील अंतर किमान ५०० फूट राहील, संस्था चालकांना त्यांचे संस्थाप्रमुख पद पुन्हा देण्यात येईल, जुन्या संस्था चालकांना सार्वजनिक न्यास करण्याची आवश्यकता राहणार नाही, हस्तांतर स्थलांतर या बाबी नियमावलीत नमूद करून शासन स्तरावरून कारवाई केली जाईल, अशा अनेक सूचना दिल्या त्या सर्व सूचनांची सुधारित नियमावली १९९१-२०२३ मध्ये समावेश होऊन शासनाने दिनांक २७ एप्रिल २०२३. रोजी नव्याने शासन आदेश निर्गमित करून राज्यातील हजारो संस्था चालकांना दिलासा दिला. संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाची सुधारित गुणदान पद्धत मंजूर करणे, व संगणक परीक्षेत विध्यार्थ्यांना पासिंग पद्धतीत ४०% मार्क लागू करणे ही मागणी ४ वर्षांपासून प्रलंबित होती, सुधारित गुणदान योजनेसही शासनाने दिनांक २५ जानेवारी २०२३ ला शासनादेश काढून मान्यता दिली .राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, महासचिव हेमंत ढमढेरे, त्याचबरोबर सर्व राज्य कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा संघटना यांनी निर्णयाचे स्वागत केले.अधिवेशनातील प्रमुख मुद्दा हा बहिस्थ होता आणि बहिस्थ विध्यार्थी नोंदणी अट रद्द झाल्याने संस्था चालक आनंदी असून शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे .या कामी आजी-माजी शिक्षण मंत्री विद्यमान आमदार नूतन आमदार अधिकारी वर्ग महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आदी मान्यवरांचा हितचिंतकांचा त्याचबरोबर टंकलेखन लघुलेखन व संगणक टंकलेखन या क्षेत्रात ६० वर्षे संगणक प्रशिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या महिला भगिनी रणरागिनी यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर अधिवेशनासाठी योगदान देणारे जिल्हा संघटनाचे अध्यक्ष सचिव व राज्य कार्यकारणी सदस्य यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.अधिवेशनास राज्यातील हजारो संस्था चालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रकाश कराळे, महासचिव हेमंत ढमढेरे, राज्य कार्यकारणी सदस्या व जिल्हा कार्याध्यक्ष अनुराधा थिटे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा सचिव अरुण नागरे समन्वय समिती सदस्या संध्याताई देशपांडे, प्रचार प्रसार समिती सदस्य विठ्ठल बडे, राज्य कार्यकारणी व अहमदनगर जिल्हा संघटना व स्वागत समिती यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30