नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निवडणुक विभागाला कॉंग्रेसने सुनावले खडे बोल..पदवीधर सेलचे अध्यक्ष प्रजापती यांनी विचारला सवाल…पदवीधर नोंदणी मध्ये प्रशासन उदासीन – प्रेरणा जनहित मंच

निवडणुक विभागाला कॉंग्रेसने सुनावले खडे बोल..पदवीधर सेलचे अध्यक्ष प्रजापती यांनी विचारला सवाल…पदवीधर नोंदणी मध्ये प्रशासन उदासीन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निवडणूक विभागाला काँग्रेसने सुनावले खडेबोल
पदवीधर सेलचे अध्यक्ष प्रजापती आक्रमक : पदवीधर प्रश्न पेटला

अमरावती : विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या तत्काळ सोडवाव्या या संदर्भात निवडणूक विभागाकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन गंभीर नसल्याने सोमवारी काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम प्रजापती यांनी आक्रमक होत निवडणूक विभागाला खडेबोल सुनावले. त्यामुळे पदवीधर नोंदणीचा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे.विभागीय पदवीधर मतदार नोंदणीकरिता सात नोव्हेंबर ही शेवटची वेळ आहे. त्याकरिता काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी 27 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देऊन नोंदणीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या तत्काळ सोडवावे अशी मागणी केली होती. प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्रजापती यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके यांचे दालन गाठत त्यांना या संदर्भात चांगलाच जाब विचारला. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अनेकांनी पदवीधर मतदार नोंदणीचे फॉर्म गोळा केले आहेत. मात्र एकगट्ठा फार्म घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. परिणामी मतदार नोंदणीला विलंब होत आहे. यासह नोंदणी करताना पदवीधरांना वेगवेगळ्या प्रकारच्या जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. त्या अटी तत्काळ रद्द करून निवडणूक प्रक्रिया ही योग्य त्या पद्धतीने राबविण्यात यावी अशी मागणी श्याम प्रजापती यांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्याला गांभीर्याने घेण्यात न आल्याने प्रजापती यांनी आक्रमक होत निवडणूक विभागाला सोमवारी जाब विचारला. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी दसरा यासह महत्त्वाचे सण आल्याने अनेक पदवीधरांची नोंदणी अजून बाकी आहे. याला मुदतवाढ द्यावी अशी ही मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन निवडणूक जनजागृती प्रभावी करत नसल्याचा आरोपही श्याम प्रजापती यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक विभागाला चांगलेच खडेबोल सुनावत यामध्ये सुधारणा करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा श्याम प्रजापती यांनी निवडणूक विभागाला दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्या पवार, यावेळी युवक काँग्रेसचे समिर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, योगेश गुडधे, निलेश गुहे, इमरान खान, सागर कलाने, अनिल देशमुख, यासीन भारती, राजू भेले, निसार खान, संजय वाघ, रफ्फू भाई, राजा बागडे, विठ्ठल वानखडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930