नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विधान परिषदेचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांची अहमदनगर येथे श्रीराम कॉम्प्युटर्स ला सदिच्छा भेट शहरातील टंकलेखन संस्था चालकांशी साधला सवांद …जिल्हा अध्यक्ष जालिंदर चौरे – प्रेरणा जनहित मंच

विधान परिषदेचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांची अहमदनगर येथे श्रीराम कॉम्प्युटर्स ला सदिच्छा भेट शहरातील टंकलेखन संस्था चालकांशी साधला सवांद …जिल्हा अध्यक्ष जालिंदर चौरे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य आमदार डॉ.सुधीरजी तांबे साहेब यांची आज अहमदनगर येथे श्रीराम कॉम्प्युटर्स इन्स्टिट्युट मध्ये अहमदनगर शहरातील शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे संस्थाचालक व संघटना पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक संपन्न……

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्य तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी आज अहमदनगर शहरातील नामांकित अशा श्रीराम कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी अहमदनगर शहरातील शासनमान्य कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट चे संस्थाचालक व राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली यावेळी श्रीराम कॉम्प्युटरच्या संचालिका श्रीमती अनुराधा थिटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले . राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी संघटनेच्यावतीने राज्यातील संस्थाचालकांच्या अडीअडचणी मांडून या कामी मंत्रालयात बैठक घेण्याचा आग्रह केला, आमदार डॉ.सुधीर तांबे व शिक्षण परिषदेचे नेते श्री. रावसाहेब रोहोकले अडव्होकेट अजित वाडेकर यांचा श्रीराम कॉम्प्युटर्स व राज्य संघटना आणि जिल्हा संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश कराळे जिल्हाध्यक्ष जालिंदर चौरे व संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्या अनुराधा थिटे यांनी स्वागत व सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना आमदार डॉक्टर तांबे साहेब म्हणाले की श्रीराम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट 54 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच भव्य असा सेटअप विद्यार्थी संख्या सर्व स्टाफ पाहून आनंद व्यक्त केला, यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की प्रकाश कराळे यांनी महाराष्ट्र राज्यात संघटनेची उत्कृष्ट बांधणी केली आहे त्यामुळेच आज संघटना मॅन्युअल टायपिंग कडून कम्प्युटर टायपिंग कडे वाटचाल करत आहे आज हजारो संस्थांना उपजीविकेचे मोठे साधन निर्माण झाले असून अतिशय अल्प फी मध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आज राज्यात कार्यरत आहे त्यातून पदवीधर विद्यार्थ्यांना विविध विषयाचे प्रशिक्षण दिले जात आहे या प्रशिक्षणा मधून आज विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय व शासकीय नोकरीची संधी निर्माण होत आहे राज्याचे विद्यमान महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण मंत्री असताना राज्यातील संस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मी स्वतःही अनेक अधिवेशनाला उपस्थित राहून प्रश्नाचे गांभीर्य पाहून नियमित मदत केली यापुढेही संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले राज्य संघटनेच्या अध्यक्षांनी मंत्रालयात प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विषयाबाबत शिक्षण मंत्री महोदय कडे मीटींग घेण्याबाबत विनंती केली.

आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मान्य केली पुढील आठवड्यात मंत्रालयात मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्याचबरोबर परीक्षा परिषदेचे नुतन अधिकारी अध्यक्ष शरद गोसावी व आयुक्त शैलेजा दराडे यांच्याशी चर्चा करून संघटनेने सादर केलेल्या परीक्षा परिषदेच्या स्तरावरील सर्व अडचणी सोडविण्याची ग्वाही दिली या बैठकीस शहरातील संस्थाचालक मोठ्या उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात पुढे होणाऱ्या पदवीधर विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी प्रत्येकाने नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले बैठकीस राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे जिल्हा संघटनेचे सचिव जालिंदर चौरे राज्य संघटनेचे सदस्य अनुराधा थिटे, जिल्हा संघटनेचे सचिव संजय कांबळे जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी श्रीकांत शिंदे, शारदा जगदाळे, शबाना शेख, सविता कराळे, स्वाती जाधव, विनोदा बत्ती, अभिजित भूतकर प्रदिप नालकुल, मनोज काळे, नवनाथ होले, अतुल ढवळे, जावेद शेख, बाळकृष्ण गुंजाळ, शोभा वाळके, प्रशांत वारकड दीपक धाडगे, अमन तिवारी, सागर कदम, योगेश दिवाने आदी उपस्थित होते…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31