महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे Msce व महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना मुंबई Msceia अधिकारी पदाधिकारी बैठक संपन्न….
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*MSCE अधिकारी व MSCEIA पदाधिकारी बैठक संपन्न…..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे परिषदेचे अध्यक्ष श्री.शरद गोसावी साहेब, आयुक्त शैलेजा दराडे मॅडम,सहायक आयुक्त घोडेकर मॅडम, प्रशासन अधिकारी खरात साहेब, मूल्यमापन अधिकारी अनिल सोनार साहेब त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे सर, महासचिव हेमंत ढमढेरेसर, वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश पोरे सर, कोषाध्यक्ष सुभाष बागड सर, प्रसिद्धीप्रमुख संतोष झंझाड सर,राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीकांत जोशी सर , जोसेफ सर, पंकज ठाकूर सर, श्री.दुरकुंडे सर श्री.रविकांत पवार सर नांदूरबार,श्रीमती अनुराधा थिटेमॅडम , माजी सदस्य श्री उमाकांत पंपट सर आदींच्या उपस्थितीत तातडीची मिटींग संपन्न झाली खरंतर अध्यक्षांना पुढील मिटींग असल्याने Msceia ने दिलेल्या दिनांक 2 जुन 2022 या पत्राने व एक ते आठ मागण्या बाबत चर्चा झाली, सर्व कार्यकारिणी सदस्यांची व अधिकारी वर्गाची ओळख परेड झाली त्याच बरोबर माहे जुलै मध्ये होणाऱ्या जीसीसी टीबीसी परीक्षेच्या तारखा जाहीर करणे बाबत संघटना पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घ्यावी व पंधरा दिवस अगोदर प्रवेश पत्र आणि ब्याच लिस्ट देण्यात यावी या मागणीवर मा.अध्यक्षांनी जुलैच्या 3 ऱ्या आठवड्यात परीक्षा सुरू करू आणि लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी पुरेसे परीक्षा केंद्र उपलब्ध केले जातील असे सांगितले मात्र इतर परीक्षेची माहिती अर्जेंनसी पाहून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे, मागील परीक्षा जीसीसी ची परीक्षा आणि जीसीसी टीबीसी ची उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र त्वरित मिळणे बाबत चर्चा झाली विषयावर परीक्षा परिषद कार्यवाही केलेली आहे लवकरच सर्वांना प्रमाणपत्र मिळतील फक्त लघुलेखन चे प्रमाणपत्र हे पडताळणीनंतर देण्याचा प्रयत्न करत आहोत असे अध्यक्षांनी सभेत सांगितले आहे.. जीसीसी टीबीसी परीक्षा संभाव्य विध्यार्थी संख्या परिषदेचे स्तरावर परीक्षा केंद्र मिळण्याबाबत परीक्षा परिषदेमार्फत मोठ्या शिक्षण संस्था त्यात रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व जिल्ह्यातील मोठ्या संस्थांना परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणेबाबत परीक्षा परिषदेने पत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली त्याप्रमाणे लवकरच परिक्षा परिषद कार्यवाही करेल असे मा. अध्यक्षांनी सांगितले यानंतर परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बायोमेट्रिक उपस्थिती, या मागणीसाठी चर्चा झाली परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही असतील असेच परीक्षा केंद्र निवडण्यात येतील असे तसा प्रयत्न राहील असे अध्यक्षांनी सांगितले, ज्या संस्था गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत, किंवा फक्त पेपर वर चालू आहे अशा संस्थांनी विद्यार्थी प्रविष्ठ केलेले नाही अशा संस्थांनी नूतनीकरण केलेले नाही या संस्थांचे अशा संस्था व स्थलांतरामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी अहवाल दिलेल्या आहे अशा संस्थाना संकेतस्थळावरून ब्लॉक करण्यात यावेत यावर चर्चा झाली शिक्षणाधिकारी यांचे अहवाल पाहून कारवाई करणार करणार असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे.. लघुलेखन अभ्यासक्रमाबाबत राज्यातील सर्व विभागात तज्ञांच्या व परिक्षक समीक्षक प्राश्ननिक यांची कार्यशाळा घेणे बाबत व तज्ञ समितीने तयार केलेली लघुलेखन नियमावली गुणदान पद्धत ताबडतोब लागू करणेबाबत ची मागणी करण्यात आली या मागणीवर माननीय अध्यक्षांनी लवकरच प्रशासनासोबत आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे मान्य केले त्याच बरोबर लघुलेखन संदर्भात वाढीव मानधन मूल्यमापन शुल्क वाढविण्याबाबत मागणी करण्यात आली त्यावर विचार करण्याचे मान्य अध्यक्ष यांनी मान्य केले ज्या संस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालकांनी दोषी ठरवले आहे अशा संस्थांना परीक्षेत विद्यार्थी प्रविष्ट करण्यासाठी दुसऱ्या संस्थांवर सक्ती करणे चुकीचे आहे नियमावलीचा भंग करणारे आहे पर्यायाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा असल्याने असे निर्णय रद्द करावेत अशी मागणी संघटनेने केली मात्र काही बाबी विद्यार्थी हितासाठी विचारात घ्यावे लागतात त्यामुळे निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष ने सांगितले मात्र यापुढे या बाबींचाही जरूर विचार करू असे आश्वासन दिले तसेच शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांनी कारवाई केलेल्या संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे परिपत्रक निर्गमित करण्याबाबत चर्चा झाली तसेच या संस्था संकेत स्थळावर ब्लॉक करण्यात याव्यात असे ठरले परीक्षा केंद्रावर पारदर्शकता असावी याकामी बैठे व कोड नेमणे बाबत अध्यक्षांनी सहमती दर्शवत परीक्षा या पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे अध्यक्षांनी आश्वासन दिले यानंतर मागील परीक्षा लघुलेखन परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी बाबत त्याचबरोबर ज्या परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिकेवर लाल रेषा मारण्यात आल्या त्या त्या उत्तर पत्रिका तपासण्यात आल्या असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशा तक्रारी संघटनेकडे आलेले असल्याने त्या सभेत मांडण्यात आल्या यावर माननीय अध्यक्षांनी चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले नुकत्याच लघु लेखनाच्या व जीसीसी टीबीसी उत्तर पत्रिका माहितीच्या अधिकारात देण्यात आलेले आहे त्याची पडताळणी केली जात आहे त्यात विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील तर त्यांना न्याय देण्याची मागणी संघटनेने केली याबाबत अध्यक्षांनी सविस्तर आढावा बैठक घेऊन कार्यवाही केली जाईल असे सांगितले प्रलंबित देयके देणे अतिशय विलंब होत आहे वारंवार मागणी करूनही डबल पेमेंटच्या रकमा आजा केल्या जात नाही या मागणीवर चर्चा करण्यात आली पडताळणी केल्याशिवाय असे पेमेंट आता करता येत नाही मात्र ते लवकरच करण्यासाठी संबंधितांना कळविण्यात येईल चालू सत्रासाठी जर संस्थाचालकांनी परीक्षा परिषदेला पेमेंट करताना पेमेंट यशस्वी झाल्याचे मेसेज आले असतील व बँक स्टेटमेंट ला पेमेंट कपास झाले असेल मात्र परीक्षा परिषदेकडे पेंडिंग दिसत असेल तर अशा संस्थांना पुन्हा पेमेंट करण्याची आवश्यकता नाही व नसावी त्यांचे मेसेज पाहून अशा संस्थांचे पेंडिंग पेमेंट क्लेर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली ही मान्य अध्यक्षांनी मान्य केले अशा कमी वेळेत सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आवश्यक ती कार्यवाही कार्यवाही करण्याची व आवश्यकता पाहून शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली जाईल असे अध्यक्षांनी सांगितले आहे..तशा संबंधितांना सूचना केल्या आहेत या नंतर अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानून बैठक समाप्त करण्यात आली आहे…या पुढे बैठकीच्या बाबत लेखी पत्र देण्यात येऊन वेळ घेऊन पूर्णवेळ बैठक घेऊन इतिवृत्त तयार केले जाईल असे आयुक्त दराडे मॅडम यांनी सांगितले …
अशा प्रकारे अतिशय कमी वेळेत महासचिव यांनी वेळ घेऊन बैठक घडवून आणली पुढे अशाच पद्धतीने भेटी व बैठका घेऊन संस्था चालकांच्या मागण्या मार्गी लागतील…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

