नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे उमेदवार भाऊसाहेब हारदे,मुलीधर कराळे,छगन काळे यांचे नामनिर्देशनपत्र मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कायम….. – प्रेरणा जनहित मंच

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे उमेदवार भाऊसाहेब हारदे,मुलीधर कराळे,छगन काळे यांचे नामनिर्देशनपत्र मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कायम…..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अर्जदार भाऊसाहेब चांगदेव हारदे, मुलीधर नामदेव कराळे, छगन झुंगाजी काळे यांचे  नामनिर्देशन पत्र मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठांमध्ये कायम …..

याबाबत  सविस्तर वृत्त असे की जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. सदरील निवडणुकीचे टप्पे जाहीर केले होते त्या अनुषंगाने सदरील पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 2023 ते 2028 च्या कालावधीसाठी सर्वसाधारण मतदार संघातून भाऊसाहेब चांगदेव हारदे, छगन झुंगाजी काळे व मुरलीधर नामदेव कराळे यांनी नामनिर्देशन दाखल केले होते सदरील नामनिर्देशन पत्रावरील सतीश शंकरराव इंगळे द्वारकाधीश उत्तमराव राजेभोसले व संभाजी मते यांनी हरकत अर्ज दाखल करून उमेदवारांकडे थकबाकी असल्याचे नमूद करून त्यांचा उमेदवारी अर्ज ना मंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आर.एम. खेडकर अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर यांच्याकडे हरकत अर्ज दाखल केले होते व सदरील उमेदवार हे डिफॉल्टर असल्याचे नमूद केले होते त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भाऊसाहेब चांगदेव हारदे, छगन झुंगाजी काळे व मुरलीधर नामदेव कराळे यांचे नामनिर्देशन पत्र नाममंजूर करण्यात आले होते त्या नाराजीने उमेदवारांनी मा. गणेश पुरी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे अपील दाखल केले होते व सदरील अपिल मंजूर करण्यात आले होते त्या अनुषंगाने नाराज होऊन सतीश शंकरराव इंगळे द्वारकाधीश उत्तमराव राजे भोसले व संभाजी मते यांनी मान्.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करून मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्या आदेशास आव्हानित केले होते सदरील प्रकरणांमध्ये उमेदवारांच्या वतीने ऍड. एन.बी.नरवडे  यांनी हजर होऊन युक्तिवाद केला व पतसंस्थेने डिफॉल्टर लिस्ट जाहीर करताना थकबाकी यादीत अर्जदारांचा समावेश केलेला नसल्याने सदरील अर्जदारांना डिफॉल्टर म्हणता येणार नाही व हरकत घेणाऱ्यास मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अल्टरनेट रेमडी अवेलेबल असल्याचे नमूद करून अगोदरच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याने युक्तिवादांमध्ये नमूद करून मा.न्यायमूर्ती श्री अरुण आर पेडणेकर यांच्या खंडपीठाने हरकतदार यांचे रिट याचिका डिस्पोंजल करून कायद्याप्रमाणे असलेली अल्टरनेट रेमडी चा वापर करून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी असे आदेश पारित केल्याने उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र कायम राहिले आहे सदरील प्रकरणांमध्ये उमेदवारांच्या वतीने ऍड.एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930