नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मौजे कामठी ता.श्रीगोंदा गावचे सरपंच बाळासाहेब आरडे यांचे दुःखद निधन..दशक्रिया विधी कामठी येथे होणार शुक्रवार दि.3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.वाजता – प्रेरणा जनहित मंच

मौजे कामठी ता.श्रीगोंदा गावचे सरपंच बाळासाहेब आरडे यांचे दुःखद निधन..दशक्रिया विधी कामठी येथे होणार शुक्रवार दि.3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.वाजता

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मौजे कामठी तालुका श्रीगोंदा गावचे विद्यमान सरपंच व अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ (जिल्हा लेबर फेडरेशनचे) माजी संचालक आणि जिल्ह्यात नवे राज्यात प्रसिद्ध असलेल्या एबी व आरडे इलेक्ट्रिकल्स चे संचालक बाळासाहेब त्रिंबक आरडे यांचे दुःखद निधन …..

अहमदनगर येथील अमर धाम येथे त्यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप दिला…..

नगर….मौजे कामठी ता.श्रीगोंदा गावचे सुपुत्र व विद्यमान सरपंच श्री बाळासाहेब त्रिम्बक आरडे हे शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व व्यवसायाच्या निमित्ताने आरडे कुटुंब अहमदनगर शहरात स्थायिक झाले विशेष करून माळीवाडा येथे आरडे इलेक्ट्रिकल्स च्या माध्यमातून जेष्ठ बंधू बापूसाहेब आरडे व बाळासाहेब आरडे यांनी व्यवसायाला सुरुवात केली, व्यवसाय करत असताना चे कोट्रॅक्टर क्षेत्रात उतरले आणि त्यांनी पाणीपुरवठ्यासह इलेक्ट्रिकल कामांच्या मोठमोठ्या निविदा मिळवून शहरात जिल्ह्यात व राज्यात अनेक मोठमोठी कामे केले अनेक पाणीपुरवठा प्रकल्प वेळेत व उत्कृष्ट पूर्ण केल्याने त्यांचे अनेक गावांनी व विभागणी सन्मानही केले, अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक व दिलदार व्यक्तिमत्व असणारे बाळासाहेब आरडे हे लहानापासून ते सर्वांचेच मित्र होते व्यवसाय बरोबर त्यांना राजकारणाची आवड होती आपल्या स्वतःच्या जन्म गावात आपण काहीतरी चांगले करावे या उद्देशाने त्यांनी गावाच्या राजकारणातही लक्ष घातले गावाने त्यांना मोठ्या विश्वासाने सरपंच पदी निवडून दिले, सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावात शासनाच्या सर्व योजना राबवण्याचा प्रयत्न केला आणि गावाला नवीन ओळख करून देण्याचे काम केलं याच काळात त्यांनी सहकार क्षेत्रात गुरुप्रसाद इलेक्ट्रिकल व काळुबाई मजूर सहकारी संस्था या संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे निविदा मिळवण्याची काम केले उत्कृष्ट काम ही त्यांची परंपरा राहिली त्यांची त्यात सहकारात ओळख होत त्यांनी अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संघाची संचालक पदी निवड झाल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक मजूर सहकारी संस्था व इतरांना मदतीचा हात दिला त्यांना सहकार्य केले त्यामुळे आज जिल्ह्यातील प्रत्येक मजूर चळवळीच्या प्रतिनिधींमध्ये त्यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे संघाच्या संचालक मंडळाची 2023 2028 या कालावधीची निवडणूक चालू आहे या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्नीचा महिला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता यादरम्यान त्यांना पोट दुखी व पित्ताशयाचा आजार सुरू झाल्याने त्यांनी रुबी हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेण्याचे ठरवले यामध्ये त्यांची सर्जरी झाली पित्ताशयातील काही गाठींच्या ऑपरेशनही झाले आणि त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते दोन दिवसात त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता याच दरम्यान त्यांना प्रचंड रक्तस्राव झाल्याने व हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी अहमदनगर येथील अमरधाम मध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला , त्यांचा दशक्रिया विधी 3 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे कामठी ता.श्रीगोंदा येथे होणार आहे, आरडे परिवाराचे नातेवाईक कामठी गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार अरुणकाका जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस अनेक नेत्यांनी व पदाधिकारी यांनी त्यांचे निवास स्थानी भेटी दिल्या यावेळी मोठी गर्दी जमा झाल्याने कुटुंबियांना धीर दिला, जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप, जिल्हा मजूर संघाचे चेअरमन अर्जुनराव बोरुडे, व्हाईस चेअरमन विकिशेठ जगताप, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, माजी प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक, विविध पदाधिकारी जिल्हा मजूर चळवळीतील पदाधिकारी शासकीय निम शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व मित्रपरिवार हजारोच्या संख्येने उपस्थित होता या दुःखद समयी सर्वांनी हळहळ व्यक्त करून त्यांना सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण केली….

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930