नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावांतर्गत सिमीत असते,गावाचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा उद्देश असावा …गणेश दिघे ..गणेश दिघे – प्रेरणा जनहित मंच

ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावांतर्गत सिमीत असते,गावाचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा उद्देश असावा …गणेश दिघे ..गणेश दिघे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावापूर्ती सिमीत असते,गावाचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा उद्देश असावा….गणेश दिघे

*ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावांतर्गत सीमित असते.* गावाबाहेर या निवडणुकीचा कवडीचाही संबंध नसतो. तरीही आपण गाव सोडून बाहेरच्या घटकांना महत्व देत बसतो. ही निवडणूक गावातील *गटांची* असते. यात कोणताही *पक्ष* विचारात घेतला जात नाही. तशी घटनेत तरतूद नाही. येथे गावातील *गट* हेच पक्ष असतात. परंतु तरीही लोक येथे गावाबाहेरील लोकांचा किंवा राजकीय पक्षांचा संबंध जोडून जनतेची *दिशाभूल* करतात. येथे गटाची *शिरजोरी* असते. काही गट *काम* करून शिरजोर असतात तर काही गट विरोधी *विचारावर* शिरजोरी करतात. तर काही गट *जातीपातीवर* भर देत तर काही गट *वर्चस्ववादी* असतात. असे अनेक प्रकारचे गट मिळून ग्रामपंचायत निवडणूक होत असते. यात *टोळीयुद्ध* जास्त दिसून येते. खरे उद्देश बाजूला राहतात. आता तर फक्त पद *प्रतिष्ठा* हाच उद्देश पुढारी समोर ठेऊन निवडणूक लढवतात. *विकासासाठी* निवडणूक फारच कमी प्रमाणात होताना लक्षात येते. *प्रतिष्ठा* कमी होऊ नये यासाठी आजकाल *घराघरात* लढाई सुरु आहे. *सरपंच* पद लोकनियुक्त असल्याने *सदस्य* मात्र स्वतः च्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतात. सरपंच पदावर अविश्वास ठराव पारित होण्यासाठी बहुमत लागते. ते बहुमत न होऊ देण्यासाठी *मूठभर* सदस्य जरी हातात ठेवले तरी बहुमत जुळत नाही. त्यामुळे ते सहज बगलात ठेवता येतात. त्यामुळे होणारे सरपंच सदस्यांप्रति फार विचार करणार नाहीत. राहिले उपसरपंच पद, ते तर *धोत्र्याचे फुल* त्याला वासच नसतो. जे त्यासाठी लढतात त्यांना खरे राजकारणच कळाले नाही असा अर्थ होतो. *गावचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा मूळ उद्देश* म्हणून खरा उद्देश बाजूला ठेऊन आपण पवित्र लोकशाहीला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना न्याय देऊ शकतो का? हाच मोठा प्रश्न पडतो.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31