नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि इतर संस्थाद्वारे दिले जाणारे प्रशिक्षणातून तरुणांनी उद्योग/व्यवसाय व्यवसाय उभारून आधुनिक विचार आत्मसात करावीत …आमदार संग्राम भैय्या जगताप – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि इतर संस्थाद्वारे दिले जाणारे प्रशिक्षणातून तरुणांनी उद्योग/व्यवसाय व्यवसाय उभारून आधुनिक विचार आत्मसात करावीत …आमदार संग्राम भैय्या जगताप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*तरुणांनी उद्दोग /व्यवसायात आधुनिक विचार व कष्टातुन नावलौकिक मिळवावा.आमदार संग्रामभैय्या जगताप*

जिल्हा उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर आयोजित तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व रविदासिया चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या विशेष सहकार्याने विशेष घटक योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या लेदर प्रोडक्टस प्रशिक्षण कार्यक्रम चा प्रमाणपत्र वितरण सोहळा अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार मा.संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी आमदार मा श्री संग्राम भैय्या जगताप, जिल्हा उद्योजकता विकास केंद्र चे महाव्यवस्थापक मा श्री अतुल दवंगे ,रविदासिया चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्री चे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष मा.श्री.संजय खामकर साहेब, जिल्हा उद्योजकता विकास केंद्र चे प्रकल्प अधिकारी मा श्री तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी मा श्री दिलावर सय्यद सर, महानगरपालिका चे इंजिनिअर निकम साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, लेखक डाॅ रोहिदास नामदेव उदमले, अहमदनगर एक्सप्रेस चे कार्यकारी संपादक श्री भैय्यासाहेब बाॅक्सर,शिवगर्जना न्यूज चॅनल चे अमोल डोळस, उद्योजक बाबासाहेब आंबेडकर आदि मान्यवर उपस्थित होते. 10 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या एक महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये नगर शहरातील व तालुक्यातील युवक युवती नी सहभाग घेऊन हा प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले. संपूर्ण महाराष्ट्रात हा लेदर प्रोडक्टस प्रशिक्षण कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आले. लेदर प्रोडक्टस चे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रकारचे वस्तू चे प्रदर्शन ही यावेळी ठेवण्यात आले होते. या सर्वांची पाहणी मान्यवरांनी करून प्रशिक्षणार्थी चे अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेखक डाॅ रोहिदास उदमले लिखित संत रोहिदास महाराज- तात्विक व शैक्षणिक विचार या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. आमदार मा श्री संग्राम भैय्या जगताप यांनी युवकांनी उद्योग व्यवसाय मध्ये नावलौकिक करून समाजातील इतर लोकांना सुध्दा आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा शिक्षण देण्यासाठी या प्रशिक्षणाचा भविष्यात उपयोग करण्याचा सल्ला उपस्थित सर्वांना दिला. जिल्हा उद्योजकता विकास केंद्र चे महाव्यवस्थापक मा श्री अतुल दवंगे यांनी भविष्यात अशाच प्रकारचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवुन युवक युवती ना यशस्वी उद्योजक होण्यासाठी शासनाच्या विविध योजना चा लाभ देऊन उद्योग उभारणीसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. रविदासिया चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्री चे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय खामकर यांनी समाजातील युवक युवती महिला ना रोजगार निर्मिती साठी विविध उपक्रम राबविण्यासाठी व संस्थेच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्यासाठी सर्व संस्थेचे पदाधिकारी यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मा श्री दिलावर सय्यद सर यांनी उपस्थित सर्वांना बार्टी च्या प्रकल्प विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा उद्योजकता विकास केंद्र चे प्रकल्प अधिकारी मा श्री तात्यासाहेब जिवडे यांनी केली. या प्रशिक्षणार्थी ना प्रशिक्षण देणारे अमोल सोनवणे,रवी गाडे, विकास बोरूडे,किरण भागवत,संतोष कदम,विशाल पोटे,संतोष कांबळे यांचा सन्मान सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थी ना प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार प्रियंका शेळके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुभाष मराठे, संदिप सोनवणे, बार्टीचे समतादूत पिरजादे एजाज, प्रेरणा विधाते, रजत अवसक, संतोष शिंदे, वसंत बढे, रवी कटके, सुलतान सय्यद यांनी विशेष प्रयत्न केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930