नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मांडवगण चे सुपूत्र चि. रोहन रमेश रासकर याची एम एस साठी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन (USA)मार्फत झाली निवड…जिल्हा मजूर संघाच्या वतीने केला सत्कार – प्रेरणा जनहित मंच

मांडवगण चे सुपूत्र चि. रोहन रमेश रासकर याची एम एस साठी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन (USA)मार्फत झाली निवड…जिल्हा मजूर संघाच्या वतीने केला सत्कार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मांडवगण चे सुपुत्र चि. रोहन रमेश रासकर यांची एम. एस. साठी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन( Ann Arbor) ( यू. एस. ए)मार्फत निवड….

अहमदनगर – चि रोहन रासकर हा मांडवगण तालुका – श्रीगोंदा येथील सुपुत्र असून त्यांचे महाविद्यालयातील शिक्षण 11 वी व 12 वी पुणे येथे सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस एंड कॉमर्स येथे पूर्ण केले. तर व्हीआयआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे चार वर्षाचा डिग्री कोर्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यास आटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याने कॉलेज कडून “रेसिंग कार” हे मॉडेल तयार करण्यात भाग घेऊन कार रेसिंग मध्ये स्पर्धेत भाग घेतला. रोहन ची अमेरिका येथील युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, Ann Arbor मध्ये MS-Mechanical अभ्यासक्रमासाठी निवड झाली हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा असून त्यात निवड होणे हे भाग्यचे काम असते. त्यात रोहन यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या वतीने चेअरमन अर्जुनराव बोरुडे, मॅनेजर प्रकाश कराळे, सचिव विठ्ठल सांगळे, पर्यवेक्षक तुकाराम बोरुडे, लिपिक ज्ञानेश्वर हजारे, शिवाजी खेंडके , पंडित बोरुडे, प्रशांत पिंपळे, यांनी त्याचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

चि. रोहन रासकर यांस त्याची उच्च शिक्षित आई सौ. कविता रासकर व एम. ई. स्ट्रक्चर असलेले वडील अभियंता श्री. रमेश रासकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच VIIT कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अतुल कुलकर्णी व प्राध्यापक डॉ. अशोक मचे यांनी मार्गदर्शन केले. रोहन याची सहा युनिव्हर्सिटी मध्ये निवड झाली त्यात दोन विद्यापीठात स्कॉलरशिप म्हणून 14 लाख रुपये मिळणार होते. मात्र त्यावर समाधान न मानता त्याने जगातील अव्वल मानांकन असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन Ann Arbor येथे एम. एस. मेकेनिकल ह्या पुढील शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे.
रोहन रासकर हे अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशन चे अध्यक्ष श्री.अर्जुनराव बोरुडे यांचे नातू व प्रसिद्ध अभियंता रमेश रासकर पुणे यांचे ते चिरंजीव आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930