नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सर्व सामन्याचा आधारवड म्हणजे “पोलीस मित्र स्व.दादासाहेब गायकवाड दादा ” …वाठोरे नांदेड. – प्रेरणा जनहित मंच

सर्व सामन्याचा आधारवड म्हणजे “पोलीस मित्र स्व.दादासाहेब गायकवाड दादा ” …वाठोरे नांदेड.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रिय, दादासाहेब साहेब,

मी दादांच्या खूप जवळचा होतो. दादा मला दररोज न चुकता सकाळी सहा वाजता सगळ्यांचा अगोदर मला फोन करायचे आणि संध्या म्हणून रोज मला पंधरा ते वीस दैनिक पेपर घेऊन बस मध्ये पाठवाला लावायचे. साहेब दररोज दिवसातून जवळपास 40 ते 50 दैनिक पेपर वाचायचे. आणि त्यामधून खूप काही माहिती मिळून लोकांपर्यंत पोहोचायचे.

त्यांच्या शिपाई पासून ते आय.ए.एस.(IAS) आय.पी.एस (IPS) अशा सर्व अधिकाऱ्यांसोबत दादांचे जवळचे संबंध होते. पोलीस अधिकाऱ्यांसोबत तर दादांची मैत्री होती. तसेच गावातील सदस्य ते मंत्र्यांपर्यंत जवळचे संबंध होते. अभिनेता, अभिनेत्री, कलाकार अशा अनेक लोकांसोबत दादांचे जवळीक संबंध होते.
दादांनी गोर-गरीब, होतकरू, सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना ते अनेक कंपन्यांमध्ये कामाला लावून त्यांना रोजगार मिळवून दिला. तसेच गोरगरीब लोकांच्या अडचणी व समस्या दादा स्वतःता पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या सोडवायचे.
दादांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
दादांची एक विशेष बाब म्हणजे कोणाचे वाढदिवस, लग्न वाढदिवस, इतर कोणतेही कार्यक्रम असो त्यांना दादा न चुकता एक दिवस अगोदर मेसेज करून सांगायचे व त्यांना सकाळी सकाळी शुभेच्छा द्यायचे. कोणाच्या दुःखातही दादा सहभागी होण्याचे. कोणालाही काही पाठवायचे असेल किंवा मेसेज करायचे असेल तर मला सांगायचे व माझ्याकडून लिहून घेऊन नंतर त्यांना पाठवायचे.
दादा मला न चुकता दररोज रात्री नऊ वाजता फोन करून दिवसभरात दादांनी काय काय केले ते मला हसत-खेळत सांगायचे व त्यांनी अधिकारी सोबत काढलेले फोटो पाठवायचे.
दादा तुम्ही परत या मला तुमची खुप खुप आठवण येते.
तुमचा,
संध्या
संदीप वाठोरे,
रा.वडगांव (बु) ता. हदगाव जि.नांदेड

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930