नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कापुरवाडी येथील सौ. वेणूबाई कराळे यांच्या जाण्याने कराळे परिवाराचा बुरुज ढासळला…. प्रकाश कराळे – प्रेरणा जनहित मंच

कापुरवाडी येथील सौ. वेणूबाई कराळे यांच्या जाण्याने कराळे परिवाराचा बुरुज ढासळला…. प्रकाश कराळे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*कै. सौ.वेणूबाई निवृत्ती कराळे या विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे सेवानिवृत्त सचिव श्री.निवृत्ती तुकाराम कराळे यांच्या धर्मपत्नी यांना जाऊन आज दहा दिवस झाले दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे  कै.बाईचे माहेर कापूरवाडी येथील दुसुंगे परिवार मधील कै.यशवंत दुसुंगे यांची कन्या माहेरी तीन बहिणी गोदाबाई, जनाबाई,नबाबाई, व दोन भाऊ रंगनाथ व गुणाजी दुसुंगे,सासरी  कै. तुकाराम पाटीलबा कराळे व कै. पारूबाई  तुकाराम  कराळे  यांचे  परिवारात  निवृत्ती कराळे  यांचेशी  विवाह  झाला.  कराळे  परिवारात  भाया मुरलीधर कराळे, दिर भीमराज कराळे, दिर उत्तमराव कराळे,जावा शेवंताबाई, हिराबाई व मीराबाई कराळे एक ननंद रखमाबाई दुसुंगे यांच्याबरोबर त्यांनी कौटुंबिक व आयुष्याची वाटचाल केली तसेच त्यांचे बंधू गुणाजी दुसुंगे यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते त्या अत्यंत कष्टाळू होत्या त्यांना शेती व्यवसायाची आवड होती त्यात भाग घेणे, सर्वांना आपुलकीने प्रेम देणे हा त्यांचा स्वभाव होता गाव पातळीवर त्यांनी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून पाच वर्षे काम केले तसेच कापूरवाडी सेवा सहकारी संस्थेत व्हाईस चेअरमन म्हुणुन पद संभाळून पदाधिकारी म्हणूनही जनतेची, शेतकऱ्यांची सेवा करण्याचे काम केले अत्यंत मनमिळावू गोड स्वभावामुळे त्या सर्वांच्या आवडत्या होत्या त्यांचे पती नोकरीसाठी बाहेरगावी वाळकी येथे वास्तव्यास होते तिथे जाईल तिथे गोतावळा गोळा करणे तिला जमत होते त्यांना दोन मुले अशोक निवृत्ती कराळे व डॉ. संजय निवृत्ती कराळे व एक मुलगी शोभा शिवाजी मोरे (सेवानिवृत्त शिक्षिका) तसेच नातू संदीप कराळे, सुमित कराळे, अमित कराळे, पूजा व प्रसाद संजय कराळे हे असून त्यांना उच्च शिक्षण देतांना व स्वतःच्या पायावर उभे करण्याचे मोठे काम त्यांनी केले सर्वांचा सांभाळ करून परिश्रम घेऊन सर्व सुशिक्षित कुटुंब त्यांनी तयार केले त्यांचे जावई शिवाजी केरू मोरे  यांनी न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल राहुरी फॅक्टरी व न्यू इंग्लिश स्कूल वाळुंज येथे शिक्षक व प्राचार्य पदावर सेवा केली, मुलगा डॉ.संजय कराळे हे व्हाईस प्रेसिडेंट अल्केम इंडस्ट्रीज गुजरात येथे कार्यरत आहेत तर नातू संदीप अशोक कराळे याने  बीई सिव्हिल,अमित अशोक कराळे याने एम फार्म,सुमित अशोक कराळे याने एम एस्सी, पूजा संजय कराळे हिने एमबीए, किशोर शिवाजी मोरे याने एम फार्म, कल्याणी स्वप्नील शेळके हिने एम ई सिव्हिल पदवी प्राप्त केली, एक नातू प्रसाद संजय कराळे हा ऑस्ट्रेलिया येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे.  बाई वेणूबाई कराळे यांचे मागे पती दोन मुलं एक मुलगी पाच नातू आणि दोन नाती चार पनतू, दोन सुना, तीन नातू आहेत, त्यांना पाच पुतणे,चार पुतण्या, सर्वांचे पंधरा नातवंडे आणि सहा पनतू आहेत बाईने संपूर्ण आयुष्यात शेतीवर प्रेम केले कष्टही केले स्वतः बैलगाडी चालवताना बैलगाडी पलटी होऊन त्यांचे कमरेवरून बैलगाडी गेली त्यात त्यांना कमरेचा आजार होता इतकेच त्यांचे दुखणे त्यावर त्यांनी अनेक वर्ष मात करत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कष्टच केले शेवटी मंगळवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राण ज्योत मावळली. माझी ती चुलती होती आमच्या आई प्रमाणे तिने आमचा  संभाळ केला जीव लावला आमच्या वाटचालीचा तिला अतिशय अभिमान व आनंद होता..कराळे परिवारांचा एकत्रित कुटुंबाचा वसा त्यांनी उत्तम प्रकारे हाताळला त्यांचे वास्तव्य काही दिवस सारसनगर अहमदनगर येथे मुलीकडे असायचे त्यांचे मंजुळ वाणीने त्यांनी माणसांचा गणगोताचा गोतावळा तयार केला होता त्यांच्या जाण्याने कराळे, मोरे, दुसुंगे व नातेवाईक परिवारांचा आधारस्तंभ गमावला गेला त्याचे दुःख कायम राहील कै.सौ वेणूबाई कराळे या आमच्या बाईला भावपूर्ण श्रद्धांजली…

प्रकाश भीमराज कराळे.(पुतण्या )*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30