अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2023-2028 परिवर्तन पॅनल चा प्रचार शुभारंभ जेष्ठ सदस्य माजी प्राचार्य कैलासराव मोहिते यांचे शुभहस्ते संपन्न…

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
नगर…
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर पंचवार्षिक निवडणूक 2023 28 परिवर्तन पॅनल प्रचार शुभारंभ जुने एसटी स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवमती मायाताई जगताप, शिवमती सुनीता करडीले, शिवमती सविता कराळे, उमेदवार शिवमती कांता रमेश बोठे,डॉ.अंजली महेश खिलारी,सुलोचना राजू कराळे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून मराठा पतसंस्थेचे ज्येष्ठ सदस्य सेवानिवृत्त प्राचार्य कैलास मोहिते सर यांचे शुभहस्ते नारळ वाढवून प्रचारास प्रारंभ करण्यात आला यावेळी परवर्तन पॅनलचे हितचिंतक इंजि.सदाशिवराव तळेकर, माजी संचालक बापूसाहेब ओव्हाळ,माजी संचालक रमेशराव कराळे, माजी संचालक इंजि .बाप्पासाहेब बोडखे, माजी संचालक विलास शिंदे , राजेश काळे, ऍड. शेखर दरंदलेपाटील, नवनाथ मोरे, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र म्हस्के, अमोल वागस्कर ,मळूराज औटी, इंजि.तुकाराम मचे , बाबासाहेब भगत, निलेश गुंजाळ , रमेश मुरलीधर कराळे, विलास तोडमल ,हर्षद काळे ,अंकुश शिंदे, श्रीकांत क्षीरसागर, नवनाथ कापसे, राजेंद्र कडूस, संजय सपकाळ , राजमाता वधुवर सूचक मंडळाच्या शिवमती मायाताई जगताप, शिवमती सुनीता कर्डीले, महेश खिलारी, आबासाहेब टाकते, मच्छिंद्र बेरड, किरण फटांगरे ,गणेश सातकर, पंकज चव्हाण, एकनाथ जगताप, त्याचबरोबर सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार रामकृष्ण करडीले , सुरेश करपे, उप प्राचार्य मुरलीधर कराळे, छगनराव काळे , इंजिनिअर बबनराव खिलारी, दत्तात्रय जगताप,इंजि. अमोल रहाणे, विलास शेडाळे भाऊसाहेब हारदे, शिवमती कांताताई बोठे ,रामदास बर्डे, मोहनराव कडलग व इतर मागास प्रवर्गातील उमेदवार संपतराव साठे विमुक्त जाती जमाती भटक्या प्रवर्गातील उमेदवार धोंडीराम दातीर, महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार डॉ. प्रा. अंजली खिलारी, सौ सुलोचना कराळे आदी उमेदवार उपस्थित होते पॅनल प्रमुख रामकृष्ण कर्डिले ,कैलास मोहिते , प्रकाश कराळे ,बबनराव खिलारी, मुरलीधर कराळे, कांता बोठे, धोंडीराम दातीर, यांनी मनोगत व्यक्त केले, परिवर्तन पॅनलच्या वतीने मतदारांना आवाहन केले की संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला मात्र एकीकडे सहकाऱ्यांचे नामनिर्देशन फॉर्म जाणीवपूर्वक बाद करण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न करून निवडणुकीला वेगळे वळण दिले खऱ्या अर्थाने बराच कालावधी हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेला त्यामुळे आम्हाला मतदारांपासून भेटीगाठीपासून वंचित ठेवण्यासाठी खेळी खेळण्यात आली एकीकडे अनेकांना उमेदवारी फॉर्म भरायला लावून निवडणुकीचे वातावरण तयार करण्यात आले आणि एकीकडे घरातीलच मंडळी यांचे घरातील उमेदवार आहेत त्यांची सुकाणू समिती स्थापन करून स्वतःचे उमेदवार बिनविरोध कसे करता येतील असा प्रयत्न केला परिवर्तन पॅनलच्या अनेक उमेदवारांना दबाव आणून उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले गेले या सर्व कारणानेच मराठा पतसंस्थेची २२ वर्षानंतर प्रथमच लोकशाही मार्गाने निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलने काही ज्येष्ठ आजी-माजी संचालकांना त्याचबरोबर सुशिक्षित आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या तरुण-तरुणींना उमेदवारी दिलेली असून या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन माजी प्राचार्य कैलासराव मोहिते यांनी केले पॅनलचे प्रमुख रामकृष्ण कर्डिले यांनी संस्थेची निवडणूक ही संस्थेच्या भल्यासाठी संस्था समाजाकडून करण्यासाठी संस्थेचा एनपीए कमी करण्यासाठी सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरविण्यासाठी डिजिटल सुविधा देण्यासाठी व एकाधिकारशाही संपविण्यासाठी पॅनल दिल्याचे नमूद केले परिवर्तन पॅनल मराठा सेवा संघाच्या विचाराने आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनेने संस्थेचे कामकाज करेल अशी ग्वाही दिली त्याचबरोबर मतदारांनी परिवर्तन पॅनल ला बहुमताने विजयी करावे अशी आवाहन केले. संस्थेचे संस्थापक मानद सचिव प्रकाश कराळे यांनी संस्थेमध्ये गेली ४ वर्षापासून चाललेले मतभेद ज्येष्ठ संचालकांना दिलेली अपमानास्पद वागणूक ठराविक लोकांचीच पतसंस्थेमध्ये मक्तेदारी प्रत्येक वर्ष ठेवी वाढ मात्र नफा वाढ नाही, वेळेत वसुली नाही, आणि विशेष करून संस्थेचे मॅनेजर यांनी संचालकांमध्ये लावलेली भांडणे यामुळे संस्था आज न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लाखो रुपये खर्च करून बसले आहे त्यातूनच मतभेद वाढले आहेत खऱ्या अर्थाने संस्था ज्यांनी उभी केली त्यांनी वेळ दिला अशा सहकाऱ्यांना बाजूला सारून विद्यमान चेअरमन विजयकुमार ठुबे यांनी स्वतः आणि भावजयी कल्पना ठुबे यांनी उमेदवारी करून एकाधिकारशाही सुरू केली ती वेळीच थांबवणे गरजेचे आहे, भिस्तबाग नागरी पतसंस्थेचे वाटोळे कोणी केले आणि जेल मध्ये कोण होत हे सर्वांना माहिती आहे, अभियंता पतसंस्थेत काय झालं होतं हे अनेकांना माहीत आहे, संस्थेत उपविधी नुसार प्रत्येक वर्षी चेअरमन व्हाईस चेअरमन निवड करून सर्वांना संधी देण्याची मागणी , मराठा पतसंस्थेत बाहेरील कर्ज, पतसंस्थांच्या ठेवी घेण्यास केलेला विरोध, रेमो मार्केटिंग मध्ये गुंतवणुकीला केलेला विरोध, कर्मचाऱ्यांवर दुहेरी नियंत्रण नको, एकाच कुटूंब व नातेवाईक भरती शिवाय मनमानी करता येईल म्हणूनच संस्थेचा एक रुपया खर्च नसलेले मानद सचिव पद रद्द करण्यासाठी केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केले.इंजिनीयर बबनराव खिलारी यांनी सांगितले की, संस्थेच्या शाखा जिल्ह्यात असल्याने वसर्व सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परिवर्तन पॅनलचे उमेदवार करतील यासाठी उमेदवारांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावेत असे उपस्थितांना आवाहन केले आम्ही निवडणूक ही संस्था हितासाठी लढवत असून आम्हीं आमच्या पदाच्या कालावधीत जमा केलेल्या आमच्या ठेवी व ठेवीदारांना आत्मविश्वास देण्यासाठी व संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर यानंतर भटक्या विमुक्त मतदार संघाचे उमेदवार धोंडीराम दातीर यांनी सांगितले की मराठा सेवा संघ ही बहुजनवादी चळवळ असून बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन काम करत आहे या संस्थेचा मी एक सभासद म्हणून मला अभिमान आहे परिवर्तन पॅनलच्या प्रमुख रामकृष्ण कर्डिले यांचे मराठा सेवा संघातील योगदान त्यांची प्रशासनातील कार्यपद्धती आणि त्यांचा सर्वसामावेशक स्वभाव भावला असल्याने व संस्थेच्या स्थापने पासून त्याचे व मानद सचिव प्रकाश कराळे यांचे योगदान मला माहिती असल्याने मी परिवर्तन पॅनलची उमेदवारी स्वीकारली आहे मला खात्री आहे परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार त्यांचा सभासदाची असणारा संपर्क यातून मला सभासद प्रचंड मताने निवडून देतील आणि मी संस्था वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. सर्वसाधारण मतदारसंघातील महिला उमेदवार कांताताई बोठे यांनी सांगितले की मी पदवीधर असून मला परिवर्तन पॅनल मध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून संधी दिल्याबद्दल मी परिवर्तन पॅनलचे आभार मानते मी सातत्याने बचत गटाच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून व पक्ष संघटनेच्या माध्यमातून सभासदांच्या व समाजातील बांधवांच्या संपर्कात असल्याने मला निवडणूक अवघड नाही आणि मी प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असून मराठा पतसंस्थेच्या सद्यस्थितीची माहिती देणार आहे. आमचे पॅनल संस्थेसाठी आम्ही जाहीर केलेला जाहीरनामा घरोघरी पोहोचून मतदारांना परिवर्तन पॅनल कडे आकर्षित करून त्यांचे बहुमूल्य मत पॅनलला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे परिवर्तन पॅनलने महिला आरक्षणाशिवाय एक महिला ज्यादा उमेदवार देऊन मला सर्वसाधारण गटातून उमेदवारी देऊन माझा सन्मान केला आहे त्या सन्मानाला मी नक्कीच सार्थ ठरवेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
उप प्राचार्य मुरलीधर कराळे यांनी आपले मनोगतात सत्ताधारी गटाने केलेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध केला ,माझे आयुष्यात असे राजकारण कधी पाहिले नाही याला मराठा सेवा संघाचे केडर बेस कसे म्हणायचं हा प्रश्न आहे विजयकुमार ठुबे हे इतरांना पुढे करून स्वतः नामानिराळे राहतात हे भविष्यात घातक आहे माझी उमेदवारी मी नाही नेवासा शाखेच्या सभासदांनी ठरवली असून तेच आता ठुबे गटाला व त्यांचे पॅनल ला धडा शिकवतील. शेवटी रमेशराव कराळे यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

