नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री लोकमत समूहाचे चीफ एडिटर राजेंद्रजी दर्डा यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य टंकलेखन परिवाराच्या वतीने साजरा..राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव ..… – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री लोकमत समूहाचे चीफ एडिटर राजेंद्रजी दर्डा यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य टंकलेखन परिवाराच्या वतीने साजरा..राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव ..…

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री लोकमत समूहाचे चीफ एडिटर श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांचा वाढदिवस राज्य टंकलेखन संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला …..*

दिनांक : 21 नोव्हेंबर हा दिवस माजी शिक्षणमंत्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांचा जन्मदिवस !!!!संभाजीनगर येथे लोकमत भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भेटीगाठी व अभिष्टचिंतन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे महासचिव हेमंत ढमढेरे राज्य, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी अशासकीय सदस्य चांदमल चांदीवाल सर व राज्य संघटनेचे कार्यकारिणीचे औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी महेश माळवतकर, राज्य कार्यकारणी सदस्या जयश्री पाटील,राज्य कार्यकारिणीच्या सदस्या व 60 वे राज्यस्तरीय अधिवेशनाच्या “हिरकणी” स्मरणिकेच्या स्मरणिका प्रमुख अनुराधा थिटे, अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जालिंदर चौरे, जिल्हा सचिव संजय कांबळे , राज्य संघटनेचे व जिल्हा संघटनेचे संभाजीनगर चे आजी माजी पदाधिकारी मोहन भोमे , दिलीप कुलकर्णी ,भारत थोरात,बाविस्कर, त्याचबरोबर पुणे येथील महा.जनहित मंच चे मार्गदर्शक अशोकराव राऊत ,पत्रकार श्री अनिल मोरे , उद्योजक संजय शेवते आदींनी लोकमत भवन येथे बाबूजींचे समक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महासचिव हेमंत ढमढेरे यांनी पुणे येथून तयार करून आणलेले भव्य अशी स्मृतिचिन्ह तयार करुन माजी शिक्षण मंत्री राजेंद्रदादा दर्डा यांना सन्मानपूर्वक देण्यात आले !!!राज्यातील संस्थाचालकांच्या प्रती असलेल्या महत्त्वाच्या योगदानाचा उल्लेख करून ऑडिओ क्लिप ऐकवून ऋण व्यक्त केले . त्याचबरोबर बाबूजींना 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना बाबूजींनी महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेच्या कार्याला उजाळा दिला तसेच शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्र राज्यात संगणक टंकलेखन कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याची आठवण करून दिली .भारतात महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे की जे मॅन्युअल टायपिंग नंतर कॉम्प्युटर टायपिंग मध्ये परिवर्तित होऊन आज अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे त्यातून सन 2014 ते 2022 या कालावधीत सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन नोकरीची संधी प्राप्त केलेली आहे या कामी महाराष्ट्र राज्यातील 4000 संस्थांनी परिवर्तन करून मॅन्युअल पेपर ऐवजी कॉम्प्युटर लावून मोठमोठे सेटअप उभारून शासनाच्या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला त्याचे श्रेय राज्य संघटनेचे असल्याचे नमूद केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे 60 वे राज्यस्तरीय अधिवेशन हीरक महोत्सवी वर्ष शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेले असून या अधिवेशनाच्या माहितीपत्रकाचा शुभारंभ बाबूजींच्या हस्ते करण्यात आला

. शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनास अवश्य उपस्थित राहील अशी ग्वाही राजेंद्र बाबूजी यांनी उपस्थितांना देऊन सर्वांना आनंदित केले एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातून अनेक संघटना प्रतिनिधी ,बाबूजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्यात महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचा सातत्याने प्रत्येक वाढदिवसाला असणारी उपस्थिती ही कायम स्मरणात राहणारी असल्याचे त्यांनी नमूद केले संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची श्री.ऋषी दर्डा यांच्याशी भेटीगाठी करून संघटना आणि संघटनेने घडून आणलेले परिवर्तन ही बाब समजावून सांगितली .शेवटी महासचिव हेमंत ढमढेरे यांनी बाबूजींच्या वाढदिवसानिमित्त खास करून संस्थाचालक व संघटना प्रती बाबूजींनी दाखवलेली आदराची भावना ही उपकृत करतांना स्मृतिचिन्ह वर नमूद असलेली शब्द रचना सर्वांना भावली सदरचे स्मृतिचिन्ह सन्मानपूर्वक देण्यात येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ध्वनिक्लिप वाजवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728