नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यातील वर्ग 3 चे लिपिक वर्गाची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय…. – प्रेरणा जनहित मंच

राज्यातील वर्ग 3 चे लिपिक वर्गाची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*राज्यातील वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत असा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे लिपिक पदासाठी आवश्यक कॉम्प्युटर टायपिंग (इंग्रजी, मराठी व हिंदी 30 wpm, 40 wpm आणि स्पेशल स्किल ..50 wpm) हा सहामाही सत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांचा कल निश्चित वाढणार आहे. म्हणून जानेवारी, 2023 मध्ये होणाऱ्या GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आजच शासनमान्य संस्थेशी संपर्क साधून आपला प्रवेश नोंदवावा.*

*सविस्तर वृत्त: राज्यातील तरुण वर्गासाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आनंदाची बातमी दिली आहे. राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. (Recruitment of 75 thousand vacancies)*

*या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगा भरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय विशेष संस्थेची निवड प्रक्रिया पुढील कॅबिनेटमध्ये पार पडणार आहे असून रेल्वे व केंद्रीय परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत मेगाभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.*

*राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात भरली जातील, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मागेच विधान परिषदेत केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने ही मेगाभरती प्रत्यक्षात करण्याची घोषणा आता केली आहे. त्यामुळे राज्यभरतील नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728