मनीषा फाउंडेशन संचलित मनीषा कॉम्प्युटर व त्रिमूर्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्युट च्या वतीने संगणक परीक्षेतील गुणवंताचा गौरव ….गणेश दिघे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
संगमनेर येथील मनीषा कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहॅन्ड इन्स्टिट्यूट(गव्हर्नमेंट रजि. नं.22085)व मनीषा फाउंडेशन संचलित त्रिमूर्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्युट (गव्हर्नमेंट रजि. नं 22240)या दोन्ही कॉम्प्युटर टायपिंग संस्थेच्या गुणवंत व जी सी सी- टी बी सी कॉम्प्युटर टायपिंग तसेच स्टेनो यासह टॅली डी टी पी परीक्षेत यशस्वी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सत्कार रोख रक्कम बक्षिसे व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संगमनेर येथे संपन्न झाला.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मनीषा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका तथा मनीषा फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती. संध्याताई देशपांडे ( मनिषाताई) तर प्रमुख उपस्थिती विवेकानंद करिअर अकॅडमी संगमनेरचे संचालक प्राचार्य श्री. प्रशांत देशमुख सर तसेच सर्वच विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थिती मधे कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या द्वारे घेण्यात येणारी कॉम्प्युटर टायपिंग (जी सी सी- टी बी सी) व स्टेनो परीक्षा वर्षातून दोन वेळेस सत्रानुसार घेण्यात येते. नोव्हेंबर २०२१ मधे झालेल्या परीक्षांमध्ये मनीषा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व मनीषा फाउंडेशन संमनेर,संचलित त्रिमूर्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घुलेवाडी या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पालकांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. मनीषा कॉम्प्युटर इन्स्टिट्युट संगमनेरचे विद्यार्थी रहाणे सुदर्शन इंगर्जी- ३० विषयात प्रथम तर वाकचौरे संकेत याने द्वितीय क्रमांक पटकावला. रहाणे सुदर्शन मराठी -३० विषयात प्रथम तर रहाणे रुपाली हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सातपुते भक्ती हिंदी -३० विषयात भरगोस गुण संपादन करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यात यशस्वी ठरली. इंग्रजी -४० विषयात गुंजाळ सार्थक प्रथम तर दिघे मंजुश्री द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच शेख रमिज मराठी -४० विषयात प्रथम आला.

त्रिमूर्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट घुलेवाडी चे विद्यार्थी वाकचोरै सानिका इंगर्जी -३० विषयात प्रथम तर पाटील नयन शिवदास द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. इंग्रजी -४० विषयात साळुंखे सोनाली सुरेश प्रथम तर द्वितीय क्रमांक रहाणे कविता राजहंस हिने पटकविला. हिंदी-३० विषयात अरगडे मोहिनी किरण हि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. स्टेनो परीक्षेत मनीषा कॉम्प्युटर टायपिंगचे विद्यार्थी शुभांगी फटांगरे मराठी-८० विषयात प्रथम तर फोडसे योगेश याने इंग्रजी -६० विषयात प्रथम क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक सुरेश साळुंखे सर, अशोक फाफाळे, नंदा अरगडे, वंदनाताई शिंदे, श्रीमती रहाणे मॅडम, बेबीताई गडगे, गणेश बिल्लाडे, विलास गुंजाळ, नरबहादुर टमाटा, एकेंद्र सूनार, सविता नवले, सुवर्णा अभंग, सागर पन्हाळे व भाऊसाहेब पवार इ. उपस्थित होते. शिस्तीचे पालन करत कष्ट घेऊन विद्यार्थी यशस्वी होतात व बक्षिसांस पात्र होतात. हे बघून पालक वर्ग भारावून गेला. प्रसंगी विद्यार्थ्याने व उपस्थित पालकाने आपापली मनोगते व्यक्त केली. प्रा. सुरेश साळुंखे सर यांनी संस्थेचे आभार मानले. प्रा. प्रशांत देशमुख सरांनी करिअरच्या नव्या दिशा या विषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. श्रीमती संध्याताई देशपांडे मॅडम (मनिषाताई) यांनी परीक्षेची तयारी व क्लास मधे चालणारे विविध कोर्स या विषयी मार्गदर्शन केले. तसेच ४४ वर्षापासून संस्थेची सुरू असलेली वाटचाल आणि विविध परीक्षेची माहिती या विषयावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. गणेश दिघे सर, प्रा. संतोष जोंधळे सर, प्रा. सौ. भारती अभंग मॅडम, प्रा. केतन पवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मंजुषा गुंजाळ मॅडम यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

