नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संसार फुलण्याआधीच रंग उडाले, धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू – प्रेरणा जनहित मंच

संसार फुलण्याआधीच रंग उडाले, धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

संसार फुलण्याआधीच रंग उडाले, धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

संसार फुलण्याआधीच रंग उडाले, धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बदलापूर : धुळवडीला (Holi) रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात (Badlapur) ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात आशुतोष संसारे हा 28 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. आशुतोषचं अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं, मात्र संसार फुलण्याआधीच रंग उडाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

धुळवडीला रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात आशुतोष संसारे राहत होता. धुळवडीनिमित्त आशुतोष त्याच्या संकुलात रंग खेळून, नाचून हा तरुण घरी गेला. मात्र घरी जाताच त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.

संसार फुलण्याआधीच कोमेजला

आशुतोष याचं अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे संसार फुलण्यापूर्वीच आशुतोषवर काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय.

दरम्यान, आशुतोषचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सकृतदर्शनी जरी दिसत असलं, तरी यामागे आणखी काही कारण आहे का? हे तपासण्यासाठी त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं असून त्याच्या अहवालानंतर आशुतोषच्या मृत्यूमागे दुसरं काही कारण होतं का? हे समजू शकणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031