हिंद सेवा मंडळ सीताराम सारडा विद्यालयाचे कलाशिक्षक अशोक डोळसे यांनी खडू वर कोरली नऊ गणेशाची शिल्पे..
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गणेश उत्सवाच्या निमित्ताने..

आश्चर्यम ….
एका छोट्याशा खडूवर …
नऊ श्री गणेशाची शिल्पे अहिल्यानगर येथील चित्र – शिल्पकार व कलाशिक्षक श्री. अशोक डोळसे यांनी कोरली आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या अष्टविनायकांची आठ शिल्पे एकाच खडूवर कोरलेली असून वरच्या भागात एक सेंटीमीटर पेक्षाही छोटी श्री गणेशाची मूर्ती कोरलेली असून या गणेश मूर्तीची सोंड देखील शरीरापासून वेगळी कोरलेली दिसते. उर्वरित खडूवर करंगळीच्या नखापेक्षाही छोटी अष्टविनायकाची ही शिल्पे अत्यंत आकर्षक व हुबेहूब पद्धतीने नैसर्गिक पानाच्या आकारात कोरलेली पहावयास मिळतात. अष्टविनायकाची गणेश शिल्पे अधिक उठावदार दिसावीत म्हणून मागील पानांना गडद हिरवा रंग दिलेला आहे.
अहिल्यानगर शहरातील अष्टविनायक देखील सरांनी एकाच खडूवर अप्रतिम कोरलेली आहेत. अहिल्यानगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती व शहरातील विविध ठिकाणी असलेल्या गणेशाच्या विविध मूर्ती या खडूवर कोरलेल्या दिसतात. या शिल्पांसोबत अनेक कलात्मक श्री गणेशाची शिल्पे देखील छोट्याशा खडूतून साकारलेली पहायला मिळतात.
खडूवर व्यक्ती शिल्पे साकारण्याचे वेगळी कसं सरांच्या हातात आहे. त्यांनी आज पर्यंत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, कला – क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींची गोल व्यक्तीशिल्पे खडूवर कोरलेली आहेत. यामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल, संत तुकाराम, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रणवजी मुखर्जी, साईबाबा, डॉक्टर हेडगेवार, क्रांतिकारक तात्या टोपे, पंतप्रधान इंदिरा गांधी, महात्मा गांधी, आचार्य रजनीश, सचिन तेंडुलकर इत्यादींची शंभराहून अधिक खडूशिल्पे कोरलेली आहेत. ही सर्व खडूशिल्पे सावेडी स्थित अशोका आर्ट गॅलरी मध्ये प्रदर्शनीय आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

