सर्वसामान्यांचे आधारवड विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप अनंतात विलीन….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
-
*सर्व सामान्यांचे आधारवड अरुणकाका जगताप यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…*
अहिल्यानगर – नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांचे वडील व विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचे आज पहाटे निधन झाले.अहिल्या नगर येथील अमरधाम भूमीत त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व सामान्य माणसांचे आधारवड म्हणून काकांची ओळख होती.गेल्या ४० ते ४५ वर्षापासून नगर शहरात काकांनी आपले सामाजिक व राजकीय जीवन वाहून घेतले होते. श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी या छोट्याश्या खेडेगावात जन्म घेतलेले काका सामान्य माणसांचे आधारस्तंभ म्हणून नावारूपास आले.नगर शहरात नगरसेवक , नगराध्यक्ष अशा विविध पदावर काम करत असताना काका कायम जनतेच्या मनात घर करून राहिले.मुलगा संग्राम जगताप यांना नगर शहराचे महापौर व सलग तीन वेळेस आमदार करण्यात वडील काकांचा मोठा हातभार राहिला आहे.नगर शहरात राहून देखील काकांनी कधी ग्रामीण भागाची नाळ तुटू दिली नाही त्यांचे थोरले पुत्र सचिन भाऊ जगताप मांडवगण जिल्हा परिषद गटातून तीन वेळेस जिल्हा परिषदेवर निवडून गेले.काकांनी गावात धार्मिक कार्यात देखील मोठा मित्रवर्ग निर्माण केला आहे.स्थानिक स्वराज्य संस्था विभागातून अरुण काका सलग दोन वेळेस विधान परिषदेवर निवडून गेले. आमदार असताना काकांनी जनतेच्या हिताची अनेक कामे मार्गी लावली.
काकांच्या निधनाची वार्ता समजताच मन हेलावून गेलं.२७ दिवसांची झुंज आज अखेर अनंतात विलीन झाली. अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांचे आधारवड राहिलेले काका आज सर्वांना सोडून गेल्याने काकांच्या आठवणी मागे राहिल्या आहेत.काकांचा वसा आणि वारसा मागे आमदार संग्राम जगताप आणि सचिन जगताप नक्कीच पुढे नेतील.राज्यातील व जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष उपस्थित राहून अखेरची श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधी वेळी जिल्ह्यातील व शहरातील लोकांची हजोरांच्या संख्येने गर्दी लोटली होती. भवानी नगर पासून अमरधाम पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. सकाळी ११ नंतर नगर शहर बंद पाळण्यात आले होते.काकांच्या जाण्याने नगर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पोकळी कधीही भरुन निघणार नाही हे मात्र नक्कीच…. !प्रेरणा जनहित मंच तर्फे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
_________________________

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

