सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी द्या विकास काय असतो दाखवून देणार….अनुराधा नागवडे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी द्या , विकास काय असतो दाखवून देणार – अनुराधा नागवडे…*
रुईछत्तिशी – नगर – श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. गावोगावी प्रचार सभांचा धडाका उडाला आहे. रुईछत्तिशी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांची प्रचार सभा पार पडली.सामान्य जनतेची सेवा करण्याची मला एकदा संधी द्या , विकास काय असतो तो दाखवून देणार अशी मोजकी टिप्पणी अनुराधा नागवडे यांनी केली.शिवसेनेच्या माध्यमातून उध्दव साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगर – श्रीगोंदा मतदारसंघात राहिलेल्या विकास कामांचा अनुशेष भरून काढू असे प्रतिपादन देखील नागवडे यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे , काँग्रेस नेते संपत म्हस्के , बाबा गुंजाळ , शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी केले.युवा नेते भैय्या शेठ गोरे यांनी देखील सर्व मतदारांनी अनुराधा ताई यांना साथ देण्याचे आवाहन केले.गावातून खूप मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.महिलांचा सहभाग येथून मागे कोणत्याही राजकीय सभेत दिसला नसल्याने ही सभा विशेष चर्चेची ठरली.प्रचार सभेवेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर , संपत म्हस्के , बाबासाहेब गुंजाळ , राजेंद्र भगत , प्रवीण गोरे , संपत वाघमोडे , भैय्या शेठ गोरे , माणिक गोरे , अजिनाथ नवसुपे , संजय बोरकर , दिलीप गोरे , सोमनाथ गोरे , मच्छिंद्र गोरे , गणेश गोरे , कल्पेश गोरे , आकाश गोरे , प्रशांत छत्तिशे , रियाज शेख , मंदू छत्तिशे , ऋषिकेश गोरे , नवनाथ गोरे , शरद पवार , गौतम गुंड , मुरलीधर गोरे , राजेंद्र गोरे , सार्थक म्हस्के , ज्ञानेश्वर खाकाळ , सचिन भुजबळ , वैभव खाकाळ , सादिक पठाण , अभिजित गोरे , योगेश गोरे , विठ्ठल खाकाळ , देवराम छत्तिशे , मधुकर गोरे , दिलीप गोरे आदी ग्रामस्थ , पदाधिकारी युवा वर्ग उपस्थित होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space