महाराष्ट्र राज्यात नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व शिखर संघटनेचे कार्य संगणकीय युगात महत्वपूर्ण…शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर …
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना मुंबई या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे दि.५ व ६ मे रोजी संपन्न झाले , अधिवेशनाचे उदघाटन शिक्षणमंत्री नामदार दीपक केसरकर यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाले..
.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर , शिक्षण तज्ञ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी अशासकीय सदस्य रमेश खानविलकर, अहमदनगर जिल्हा मजूर संघाचे नूतन संचालक उत्तमराव घोगरे, सहकार महर्षी बाबुराव तनपुरे कारखान्याचे चेअरमन व जिल्हा मजूर संघाचे नूतन संचालक नामदेवराव ढोकणे पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, संदीप लहारे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे ,महासचिव हेमंत ढमढेरे राज्य कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते..उदघाटन सोहळ्यात संस्था चालकांना मार्गदर्शन करतांना शिक्षणमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यात टंकलेखन,लघुलेखन व संगणक टंकलेखन तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचे कार्य नाविन्यपूर्ण असून शिखर संघटना संगणकीय युगात महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे नमूद केले.
शिक्षणमंत्री नामदार केसरकर यांनी आपले मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना महाराष्ट्र राज्यात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून छोट्या छोट्या टायपिंग इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत, कालांतराने इन्स्टिट्यूटने बद्दल स्वीकारला आणि सर्व संस्था डिजिटल युगात संगणकीकरण झाल्या या कामी संघटनेने बदल स्वीकारून डिजिटल युगात मोलाचे काम केले आहे, आजही प्रशासनात लघुलेखन लिपीचे महत्व टिकून आहे, विध्यार्थी हित पाहून माझे शालेय विभागाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या शासन आदेश काढून मार्गी लावल्या असून अजूनही अधिवेशनात मांडण्यात आलेल्या मागण्या प्रशासनाशी चर्चा विनिमय करून मार्गी लावल्या जातील, कॉपी मुक्त अभियानात काही कठोर निर्णय घेतले जातील ते बदल संस्थाचालक असो की विद्यार्थी असो स्वीकारावी लागतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्यवसाय शिक्षणावर भर दिलेला असून सुमारे अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले असून याचा लाभ विध्यार्थी वर्गाने घेतला पाहिजे असे ते महा आले, शिर्डी येथे साई दरबारी येण्याची संधी मला संघटनेने दिली साई दरबारी अधिवेशन घेऊन संघटनेने छान काम केले आहे संघटनेचे अध्यक्ष, महासचिव, शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर यांनी आग्रहपूर्वक निमंत्रण दिले आमदार तान्हाजी मुटकुळे आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचा व शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर यांचा अधिवेशनास उपस्थिती कामी फार आग्रह होता तो मी पूर्ण करून शासन संस्था चालकांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले, आज अधिवेधनाला उपस्थीत असतांना अतिशय आनंद झाला हे आवर्जून नमूद केले…संस्थांना शासन नेहमी सहकार्य करेल केंद्रीय शिक्षण धोरणानुसार जे काही बदल करण्यात आलेले आहे त्यातून संस्थाचालकांना अडचणी निर्माण झाल्या त्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे काही जाचक अटी रद्द करून संस्थांना दिलासा दिलेला आहे यापुढेही अधिवेशनात मांडण्यात आलेल्या मागण्या या प्रशासनाबरोबर चर्चा करून मार्गी लावू असे सांगितले, यावेळी शिक्षणमंत्री यांचे शुभहस्ते संघटनेचे दिनदर्शिका व हिरकणी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले,शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर यांनी मनोगतात राज्यातील संस्थाचालक शासनाचे कोणतेही अनुदान न घेता टायपिंग, लघुलेखन, व संगणकाचे प्रशिक्षण देत आहेत हे अभिमानास्पद आहे, मॅन्युअल टायपिंग अभ्यासक्रमाला शासनाने संगणकाची जोड देऊन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र कोर्स व संगणक अर्हता कोर्स एकाच कोर्स मधून उपलब्ध करून दिले आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, मान्यताप्राप्त संस्थांना दिलासा देतांना बहिस्थ विध्यार्थी मुद्दा शासन आदेशातून काढून टाकून शिक्षणमंत्री यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेश पालकर यांनी आपले मनोगतात सांगितले की पारंपारिक परीक्षा पद्धत वेळेवर निकाल आणि संभाव्य बदलाबाबत राज्यात सहविचार सभा घेऊन संस्था व प्रशासन यांचा समनव्य साधला असून प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे व यापुढेही करणार असून संस्थांना मंत्रीमहोदय यांचे सूचनेप्रमाणे कामकाज करून परिषदेची जबाबदारी पार पाडू असे सांगितले, प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी केले प्रारंभी संस्था चालकांचे प्राचार्य पद कायम ठेवणे व किमान वेतन कायदा लागू करू नये ही आग्रही मागणी करून शासनाकडील १२ मागण्या व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडील 13 मागण्या सादर केल्या, साई दरबारी मागण्या मान्य कराव्यात असा आग्रही धरला ,शेवटी आभार संघटनेचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी मानले….
: दिनांक 6 मे रोजी गौरव गौरव सोहळा कार्यक्रम माजी आमदार डॉ.सुधीरजी तांबे , आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब, आमदार डॉ.किरण लहामटे ,परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी शिक्षण संचालक महावीर माने , सौ. शीतलताई लहारे, ऍड.शेखर दरंदले पाटील, सचिन चौधरी, संदीप लहारे, संघटना अध्यक्ष प्रकाश कराळे, महासचिव हेमंत ढमढेरे, प्रवक्ते सुभाष पाटील, उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी, स्वागत समिती आणि हजारो संस्था चालक यांचे उपस्थीत संपन्न झाला या गौरव सोहळ्यात जेष्ठ सदस्य गोवर्धन विरकुवर यांची संघटनेच्या वरिष्ठउपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार आला यावेळी ६० वयोमान पूर्ण झालेल्या व टंकलेखन, लघुलेखन,व संगणक टंकलेखन प्रशिक्षण देऊन ज्ञानदान कार्य करणाऱ्या सुमारे १३७ महिला संस्थाचालीकांना हिरकणी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आपले मनोगतात संस्था चालक अतिशय अल्प शुल्कात प्रशिक्षण देऊन शासनानेच काम करत आहेत मात्र कधीही अनुदानाची मागणी करत नाहीत राज्यात हजारो संस्थाच झाळ असून डीटीपी ऑपरेटर, उत्कृष्ट टायपिष्ट, आणि क्षणा क्षणाला केंद्र सरकार असो की राज्य सरकार प्रशासनात लेखकांची गरज या संस्थांनी प्रशिक्षित केलेले विद्यार्थी करत असतात याचा अभिमान आहे संघटना ताकदवान असून प्रशासनावर दबाव ठेवून संस्थाचालकांना न्याय मिळवून देत आहे याचा अभिमान असल्याचे सांगितले, आमदार तान्हाजीराव मूटकुळे म्हणाले की मी आमदार नसतांना सुद्धा अधिवेशनाला उपस्थित देत होतो आता तर आमदार झाल्यापासून माझी जबाबदारी वाढली मी नामदार विनोद तावडे असतील की नामदार केसरकर यांचेकडून संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेतच यापुढेही माझा कायम प्रयत्न राहील कारण संघटना आणि पदाधिकारी फार मोठे काम करत आहे, टायपिंग संघटना ही एकच शिखर संघटना कार्यरत असून अध्यक्ष प्रकाश कराळे अभ्यासू व चिकाटीने काम करत आहे सर्वांना बरोबर घेऊन संघटन वाढविणे ही त्यांची जमेची बाजू आहे.संघटनेसाठी मदत करणारे कोणीही असो त्यांचा त्यांना विसर पडत नाही ..महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष महावीर माने यांनी संगणक युगात आता मॅन्युअल च्या मागे न लागता विध्यार्थ्यांना काळाची गरज पाहून शिक्षण द्यावे जून ते सोन न म्हणता आता नवीन ते सोन म्हणावे व संगणक अभ्यासक्रमाची कास धरावी त्यातच सर्वांच भल असून छान आशा कवितेतून संस्था चालकांना मोलाचा सल्ला दिला..
गौरव सोहळ्याचे अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे शिक्षण मंत्री असतांना मंत्रालयात बैठकी घेऊन संस्थाचे अडचणी सोडवल्या आहेत, शिवाय अनेक अधिवेशनांना आवर्जून उपस्थित राहून संस्था चालकांना मदत केलेली आहे, माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची दूरदृष्टी आणि संघटनेने स्वीकारलेला बदल आज हजारो संस्थांना रोजीरोटी अबाधित ठेवण्याचे काम फार मोलाचे आहे, परीक्षा पद्धत पारदर्शी करा, सीसीटीव्ही लावा, वेळेत निकाल लावा ही मागणी स्वतःहून संघटना करते हे महत्वाचे असून शासन आणि परीक्षा परिषद यांनी याकामी तातडीने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले, संघटनेच्या सर्व मागण्या या आर्थिक बोजा निर्माण करणाऱ्या नाहीत हे लक्षात घेऊन त्या सोडविणे शासनाचे कर्तव्य आहे यासाठी माझा आणि आता आमदार सत्यजित यांचा प्रयत्न असेल यावेळी त्यांनी हिरकणी सन्मान दिल्याबद्दल आणि महिला संस्थाचालिकांचा सन्मान केल्याबद्दल आनंद व्यक्त केला…शेवटी आभार अनुराधा थिटे यांनी मानले…
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space