नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्था 23 वर्षात 30 कोटी ठेवी लाजिरवाणी बाब परिवर्तन पॅनल 100 कोटीचे उद्धिष्ट पूर्ण करेल, मराठा पतसंस्था जिल्ह्यात आदर्श करू….रामकृष्ण कर्डीले – प्रेरणा जनहित मंच

अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्था 23 वर्षात 30 कोटी ठेवी लाजिरवाणी बाब परिवर्तन पॅनल 100 कोटीचे उद्धिष्ट पूर्ण करेल, मराठा पतसंस्था जिल्ह्यात आदर्श करू….रामकृष्ण कर्डीले

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मराठा पतसंस्था 23 वर्षात 30 कोटी ठेवी ही लाजिरवाणी बाब परिवर्तन पॅनल 100 कोटीचे उद्धिष्ट पूर्ण करेल.मराठा पतसंस्था जिल्ह्यात आदर्श करू ..सुकाणू समिती उमेदवारांच्या घरातीलच ते पण सत्ताधारी गटाचे षडयंत्रचं, थकबाकीदार आणि खात्याने अपात्र केलेले सत्ताधारी पॅनलचे प्रमुखच ….रामकृष्ण कर्डिले

नगर….अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था अहमदनगर निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, तसेच सुकाणू समितीचे ऐकले नाही , 30 कोटीच्या ठेवी 23 वर्षांची कामगिरी असे वर्तमानपत्रात वाचायला मिळाले वास्तविक पाहता सुकाणू समिती उमेदवारांच्या घरातीलच नसते ती कोणी स्थापन केली माहितीही नाही या समितीमध्ये मराठा सेवा संघाचे सर्व माजी जिल्हाध्यक्ष घेतले असते तर मान्य ही केले असते मात्र तो निकष लावला असता तर माझाही सुकाणू समितीत सामावेश झाला असता मात्र उमेदवारांच्या घरातील सर्व सुकाणू समिती सदस्य घेऊन या समिती पैकी विठ्ठलराव गुंजाळ यांचेशी चर्चा करून त्यांना स्वतःचे व पत्नीचे उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला भाग पाडून त्यांचीच मोठी फसवणूक केली, परिवर्तन पॅनलचा चेहरा बाहेर काढून कोणी विश्वासघात केला, सागर गुंजाळ हा उच्चशिक्षित तरुण इतर मागास मतदार संघातून आमचे विड्रॉल विठ्ठलराव गुंजाळ यांचेकडे देऊनही बिनविरोध होऊ शकला नाही याचे उत्तर सत्ताधारी गटाने द्यावे . मराठा सेवा संघाचे संस्थापक युगप्रवर्तक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यासमोर माझ्यासह इतर तीन अर्ज जे अपात्र झाले होते ते पात्र झाल्यानंतरच एकत्र बसून निर्णय घ्यावा व निवडणूक बिनविरोध करावी असा त्यांचा शब्द होता परंतु विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी आमचे अर्ज पात्र झाल्यानंतरही हाय कोर्टात अपील केले 11 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती हायकोर्टातील आमच्या अर्जाचा निर्णय दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी झाला.तो पर्यंत माघारी मुदत संपलेली होती हे सर्वश्रुत आहे. आदर्श उपविधित फक्त संचालक मंडळ संख्येला मर्यादा घालून दिलेले आहेत बाकी शब्द रचना आम सभेला अधिकार आहेत त्याप्रमाणे उपविधीत दुहेरी नियंत्रण सभासदांनी केलेल्या सूचनेप्रमाणे करण्यात आले त्यास खात्याची मंजुरी घेऊन सत्ताधारी यांनीच अंमलबजावणी केली मात्र दुहेरी नियंत्रण हे पंधरा वर्षे मान्य असताना अचानक का अडथळा ठरला हे गुलदस्तात आहे ते रद्द करण्यासाठी संस्थेचा किती खर्च केला आणि शेवट काय झाला हे सत्ताधारी गटाने जाहीर करावे ? या सहकार कोर्टाचा मनाई आदेश असतांना जिल्हा उप निबंधक यांचेवर दबाव आणून उपविधी बदलला त्यावरही हायकोर्टात कंटेंम आणि पिटीशन दाखल आहे, परिवर्तन पॅनल चे उमेदवार निवडून सत्तेवर येतील आणि आम्ही दुहेरी नियंत्रणाचा स्वीकार करू उपविधी कायदे व नियम पाळू आणि आमचा 15 कलमी जाहीरनामा पूर्णत्वास नेऊ. इतके आज मतदार याद्यांमध्ये घोळ 19 एप्रिल उजाडली तरी केंद्रनिहाय यादी नाही शेकडो मयत सभासद मतदार यादी तसेच आहेत, कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना पाळत नाही, तेवीस वर्षे संस्थेला पूर्ण होऊनही साधे सभासदांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होत नाहीत किंबहुना ते जाणीवपूर्वक दिले जात नाहीत ही मोठी खंत आहे.असो प्रचार दरम्यान सभासदांच्या भेटी गाठी होत आहेत अनेक तक्रारी येत आहेत या बाबतीत सत्ताधारी गट व त्यांचे प्रशासन यांचे अपयश आहे मतदार कंटाळले आहेत त्यांनाही योग्य बदल हवा आहे, संचालक मंडळाची संधी हवी होतीच आमचे अर्ज बाद करून स्वयं घोषित सुकाणू समिती घोषित करून व निवडणूक लादून सत्ताधारी मंडळांनी मतदारांना निवडणुकीची संधी दिली आहे आता मतदाराच धडा शिकवतील असे परिवर्तन पॅनल प्रमुख रामकृष्ण कर्डिले यांनी नमूद केले आहे निवडणूक खर्चाबाबत बोलायचे तर संस्थेच्या वतीने सहकार न्यायालय, अफेलेट कोर्ट, मंत्रालय व हायकोर्ट येथे जास्तीत जास्त मानधन घेणारे वकील नेमले त्यांच्यासाठी लाखोंचे खर्च केले मग निवडणुकीसाठी प्रती सभासद 84 रुपये प्रमाणे साधारणतः 4 लाख खर्च होत असेल तर तो सभासदाचा हक्क नाही का ? सत्ता फक्त स्वतःसाठी आणि आपल्या बगलबच्चासाठी सर्व असेल तर त्याला समाज म्हणता येईल का? कायम पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या व अहमदनगर शहरात फक्त मीटिंग आणि कार्यक्रमासाठी उपस्थिती देणाऱ्यांच्या हाती सत्ता द्यायची का ? त्यातच सहकार खात्याने चौकशी करून 2015 ते 2020 या कालावधीत थकबाकीमुळे अपात्र ठरवलेले सत्ताधारी पॅनल प्रमुखच यांच्या हाती सत्ता का द्यावी हाही प्रश्न आम्हांला आणि सभासदारांना आहे त्यामुळे परिवर्तन पॅनल नक्कीच परिवर्तन करेल आणि जाहीर केलेल्या जाहीरनामा अमलात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू व 23 वर्षात 30 कोटी ठेवी ही लाजिरवाणी बाब असून संस्थेच्या ठेवी 100 कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू असे रामकृष्ण कर्डीले यांनी ठामपणे सांगितले आहे .. इंजि .बबनराव खिलारी, यशवंत ओव्हाळ, रामदास बर्डे, रमेश कराळे, मोहनराव कडलग, , छगन काळे, विलास शिंदे, चंद्रकांत नवले, भाऊसाहेब हारदे, अमोल रहाणे, विलास शेडाळे, सुरेश करपे, कांता बोठे, दत्तात्रय जगताप, संपतराव साठे, मुरलीधर कराळे, धोंडीराम दातीर, सुलोचना कराळे, अंजली खिलारी , मायावती जगताप, सुनीता कर्डीले यांनी मतदारांच्या समक्ष भेटी घेऊन परिवर्तन पॅनल प्रचारात आघाडी घेतली आहे दरम्यान परिवर्तन पॅनलने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील उपनगरातील मतदारांच्या भेटीगाठी घेतले असून येत्या दोन दिवसात शहरातले राहिलेले प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यापुढे सत्ताधारी गटाचा त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा पाढा मांडला जाणार आहे, त्यातून मतदारांची जागृती होऊन नक्कीच परिवर्तन घडेल असे रामकृष्ण कर्डिले यांनी नमूद केले आहे.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031