नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक..सत्ताधारी गटाच्या षड्यंत्रनाने वातावरण तापलं….. – प्रेरणा जनहित मंच

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक..सत्ताधारी गटाच्या षड्यंत्रनाने वातावरण तापलं…..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मराठा पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक*…..

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे दिनांक 27 मार्च रोजी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात आली या छाननी मध्ये सत्ताधारी गटाने जाणीवपूर्वक संस्थेसाठी योगदान देणाऱ्या आणि मराठा सेवा संघाच्या कार्यात गेली 33 वर्ष सातत्याने जिल्हा अध्यक्ष ते केंद्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून सहभाग असणारे संस्थेचे संस्थापक संचालक माजी चेअरमन रामकृष्ण कर्डिले यांचेसह माजी संचालक भाऊसाहेब हारदे व ज्येष्ठ माजी संचालक छगनराव काळे, नेवासा येथील सर्वमान्य उमेदवार उप प्राचार्य मुरलीधर कराळे यांचे उमेदवारी अर्ज बाद केले वास्तविक पाहता संस्थेची निवडणूक लागली कुठेही बातमी नाही संस्थेसाठी अर्ज भरले कुठेही बातमी नाही मात्र छाननीनंतर प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अर्ज बाद होताच वर्तमानपत्राला बातम्या देऊन दिशाभूल करण्याचा सत्ताधारी गट प्रयत्न करत आहे. कल्पोकल्पीत परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे वास्तविक पाहता संस्थेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये थकबाकीदारांच्या यादीत रामकृष्ण कर्डिले भाऊसाहेब हारदे, मुरलीधर कराळे व छगनराव काळे यांची कुठेही नावे नव्हती यादी आजही कोणीही पाहू शकते मात्र संस्थेची निवडणूक लावण्यापासून ते प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यापर्यंत सत्ताधारी गटाने षडयंत्र असल्याचे निदर्शनास येत आहे सदोष मतदार यादी तयार केली नाही म्हणून रामकृष्ण कर्डिले यांनी प्रारूप मतदार यादीच्या वेळीच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर व सचिव महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण यांना तक्रार दाखल केली होती मात्र सहकार खात्याने वेळेत तक्रारीची दखल घेतली नाही हे तितकेच खरे आहे. आपल्या सहकाऱ्यांचे थकबाकीदारांच्या यादीत नावे न घेताच त्यांना अडचणीत कसे आणता येईल हाच प्रयत्न संस्थेचे व्यवस्थापक व चेअरमन विजयकुमार ठुबे यांच्या गटाने केला वास्तविक पाहता स्वतःची अपात्रता गेली सात वर्ष अंधारात ठेवून पद भोगणारे हेच निवडणुकीच्या काळात आता दुसऱ्याला अपात्र ठरविण्यात आनंद मानत आहेत वास्तविक पाहता 2015 ते 2021 या कालावधीसाठी अपात्रता धारण करत असताना संचालक पद लाभ घेणारे विजयकुमार ठुबे यांना सहकार खात्यानेही अभय दिला तत्कालीन जिल्हा उप निबंधक यांना अपात्रता आदेश लागू करून पद रद्द करण्याबाबत मागणी केली असता तत्कालीन जिल्हा उपनिबंधक यांनी अपात्र आदेश त्यांना अवगत नाही अपात्र आदेशाची अंमलबजावणी झाली नाही या कारणाने वेळ काढू पणा करून दोन वर्ष संधी दिली त्यामुळे सहकारात कायदे मोडीत काढता येतात ये सर्व मान्य झाले, वास्तविक पाहता तक्रार दाखल केल्यानंतर अपात्रता आदेश बजावण्याची जबाबदारी सहकार खात्याची होती ती न पार न पाडता आपला आदेश आणि आपले कार्यालयाची जबाबदारीची जाणीव न ठेवता यामध्ये मोठा राजकीय दबाव आल्याने अपात्रता आदेश माहिती होऊनही व त्यांना 2015 चा आदेश 2018-19 ला अवगत होऊनही सन 2019 पासून2023 पर्यंत सहकार खात्याने कारवाई केली नाही ही खेदाची बाब आहे मग आपलेच अधिकारी यांनी काढलेला आदेश खोटा होता का, इतर 6 सदस्य अपात्र झाले त्यांचे आदेश कसे लागू झाले त्यांनी अपात्रता पाळली मग यांचेच आदेश लागू का नाही झाले अर्थात यात सहकार खात्यातील एका सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधकांचा असणारा दबाव आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काही छुपे रुस्तुम यांची असणारी साथ यामुळेच सन 2015 पासून अपात्रता असतानाही 2023 पर्यंत पद भोगणारे आता सन 2023 -2028 या कालावधीत निवडणुकीत सुद्धा षडयंत्र रचून सत्ता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र हा डाव नक्कीच हाणून पाडला जाईल कारण प्रारूप मतदार यादीत थकबाकीदारांची नावे न घेणे वास्तविक पाहता थकबाकी भरूनही छाननीच्या दिवशी अहवाल न देणे, थकबाकी नील दाखले देण्यासाठी टाळाटाळ करणे अशा अनेक बाबी यात असून कॅश क्रेडिट कर्ज खाते मुदत न संपताच व 31 मार्च न होताच व थकबाकीची मागणी न करताच थकबाकी धरणे त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी बळी पडणे आणि त्यातून खऱ्या अर्थाने संस्थेसाठी योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांचे अर्ज बाद करणे हे षडयंत्र टिकणार नाही कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयावरही अपील करण्याची तरतूद आहे तिथे योग्य ती बाजू मांडून न्याय मिळेल अशी खात्री आहे या उपरोक्त ही न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेतच त्यामुळे सहकारयांचे फॉर्म बाद करून फार काही पदरात पडेल असा आव आणू नये हे आवर्जून नमूद करावे लागते काही जरी झाले तरी उमेदवारी अर्ज भरलेले सुमारे 22 उमेदवार जे पात्र ठरलेले आहे ते रामकृष्ण कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत रामकृष्ण कर्डीले जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सर्वांनी ठाम पणे सांगितले असून त्यांचे भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असून काय खरे काय खोटे आणि कोण खर आणि कोण खोट हे समोर येईल,मात्र या कारणाने बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला हे त्रिवार सत्य आहे…..

प्रकाश कराळे
संस्थापक मानद सचिव,
मराठा पतसंस्था

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031