महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नूतन उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे यांचा अहिल्यानगर जिल्हा मजूर संघाचे वार्षिक सभेत आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे हस्ते सत्कार संपन्न…..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*अहिल्यानगर जिल्हा मजूर संघाची वार्षिक सभा संपन्न नूतन उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे यांचे निवडीचे स्वागत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड – मा.आ. प्रविणभाऊ दरेकर अध्यक्षपदी, तर अर्जुनराव (आण्णा) बोरुडे उपाध्यक्षपदी निवड!*
या निवडीच्या पार्श्वभूमीवर अर्जुनराव बोरुडे यांचा अहिल्यानगर जिल्हा मजूर संघाचे वार्षिक सभेत भव्य सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील पारदर्शक कारभार, शाश्वत विकास आणि सर्वसामान्य सभासदांचे हित या दृष्टीकोनातून या दोन्ही नेत्यांची निवड ऐतिहासिक ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, अहिल्यानगरचे आ. संग्राम भैय्या जगताप, व्हॉईस चेअरमन विकास उर्फ विकीशेठ जगताप,जिल्हा बँकेचे संचालक श्री. प्रशांतदादा गायकवाड,संघाचे ज्येष्ठ संचालक उत्तमराव घोगरे,अनिलराव पाचपुते,नामदेवराव ढोकणे,रामचंद्र राळेभात,शंकरराव गायकवाड, युवराज लाळगे , प्रशांत गजे, बाळासाहेब सोनवणे, राजू फकीर, प्रकाशराव बोरुडे, विनायकराव काळे, गुलाबराव कराळे, किशोर गायकवाड,प्रकाश सदाफुले, संघाचे मानद सचिव विठ्ठल सांगळे, व्यवस्थापक प्रकाश कराळे, सचिव तुकाराम बोरुडे , पत्रकार सुनिल गिते, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्यासह आजी माजी संचालक, मजूर संस्थांचे प्रतिनिधी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार चळवळीच्या इतिहासात सहकारी संघाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. दरेकर आणि बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण होतील, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. सभेत राहता तालुक्यातील मजूर सहकारी प्रतिनिधींनी सुरुवातीला भव्य पुष्पहार देऊन चेअरमन अर्जुनराव बोरुडे यांचा सत्कार केला तदनंतर सर्व तालुक्याचे संचालक प्राथमिक मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन यांनीही सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सभेत उशिराने आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी उपस्थिती देऊन पक्षाच्या आणि शहराच्या वतीने अर्जुनराव बोरुडे यांचा सत्कार केला संघाचे संचालक मंडळाच्या वतीने आमदार संग्राम भैय्या जगताप यांचा सत्कार केला. शासनाकडून मजूर संस्थांच्या कामाच्या मर्यादा वाढी साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.सभेत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी संघाचे कामकाजाचे कौतुक केले जिल्हा बँकेकडून संघाची वर्गणी वसुलीबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, संघाने सर्व मजूर संस्थांना कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.शेवटी सभासद सदस्य बरोबर स्नेहभोजन ही घेतले सर्वांना आनंद झाला. वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात सर्व ठराव एकमताने होऊन सभा संपन्न झाली.दीपावली साठी सभासदांना भेट देण्याची मागणी सुभाष राख यांनी केली ती अध्यक्षांनी मान्य करून संचालक मंडळ निर्णय घेईल असे आश्वासन दिले शासन शेवटी अहिल्यानगर ला राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष पद दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, मजूर चळवळीचे नेते संजीव कुसाळकर आदींचे संघाचे व्यवस्थापक प्रकाश कराळे यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

