महाराष्ट्र राज्यातील टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांच्या मागण्या शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांना बुलढाणा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे सादर…..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शेगांव – महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बुलढाणा जिल्हा टंकलेखन संस्था चालकांनी सिंगणगाव जहागीर येथे त्यांची भेट घेऊन सरकार मान्य टंकलेखन व लघुलेखन संस्था चालकाच्या अडीअडचणीवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व राज्य संघटना यांनी सयुक्तिक रित्या सहमतीने सुधारित नियमावली 1991 – 2025 मंत्रालयात मंजूरीकरिता पाठविनेत आली आहे त्यास त्वरित मान्यता देण्यात यावी, राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण करीता मिळत असलेल्या सवलती शासन मान्य संगणक टंकलेखन संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात, जिल्ह्यातील अवैध स्थलांतरित झालेल्या संस्थाची मा. शिक्षणाधिकारी यांनी संस्थेची मान्यता रद्द केलेली शिफारस वर त्वरित कारवाही करण्यात यावी, टंकलेखन=लघुलेखन, संगणक टायपिंग प्रशिक्षण देत असलेल्या शासन मान्यताप्राप्त संस्थांना शासना कडून कोणतेच अनुदान मिळत नाही, अश्या संस्थांना मान्यता घेऊन 40 वर्षे पूर्ण झाली किंवा ज्या संस्था चालकाचे वय 60 वर्षा पेक्षा जास्त झाले त्यांना 10 हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे आदी मागण्याचा समावेश करण्यात आल्यात.मा. ना. दादा भुसे यांनी वरील निवेदनातील मागण्या बाबत लक्ष घालील असे सांगितले, यावेळी माजी आ. शशिकांत खेडकर, संघटनेचे अध्यक्ष अमोल भट, सचिव मो. आतिक, राज्य संघटनेचे प्रतिनिधी अरुण चांडक, महेश मूळे, काळे सर, पाटील सर आदी संस्था चालक हजर होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

