नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पैशाच्या मोहात जन्मदात्या आईवर मुलाकडून हल्ला सर्व स्तरात निषेध व्यक्त होत आहे पोलिसांनी केली आरोपीला अटक…. – प्रेरणा जनहित मंच

पैशाच्या मोहात जन्मदात्या आईवर मुलाकडून हल्ला सर्व स्तरात निषेध व्यक्त होत आहे पोलिसांनी केली आरोपीला अटक….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पैशांच्या मोहात आईवरच जीवघेणा हल्ला! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळालेल्या मुलाची क्रूर हरकत
Mother attacked money! Cruel incident son who got job on compassionate grounds
सोलापूर / प्रातिनिधि: सोलापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळालेल्या मुलाने पेन्शनच्या पैशासाठी स्वतःच्या आईवर कुकरने हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पतीच्या निधनानंतर मिळणारी पेन्शन आप्तेष्टांना मदतीसाठी देत होत्या. त्यावरून मुलाने वाद घालत घरातच कुकर डोक्यात फेकून मारला. या हल्ल्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या.
हा हल्ला पोटच्या मुलानेच केला असल्याचे उघड झाले. स्थानिक इमारतीच्या मालकाणे या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुलगा जिल्हा परिषद शिक्षण विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याला अनुकंपा तत्त्वावर ही नोकरी मिळाली होती. आता या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक करत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031