ओंकार कॉम्प्युटर्स रौप्य महोत्सवी वर्ष,”माय भिंगार कॉम्पीटिशण’ स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न …

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ओंकार कॉम्प्युटर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य ‘माय भिंगार कॉम्पिटिशन’ संपन्न
अहमदनगर – तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ओंकार कॉम्प्युटर्स या संस्थेने आपल्या स्थापनेच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने ‘माय भिंगार कॉम्पिटिशन’ या भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेमध्ये विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने गायन, तबलावादन, अबॅकस, भारतनाट्यम, नृत्य, भाषण, चित्रकला, निबंध आणि हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ओंकार कॉम्प्युटर्सच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य टायपिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे सर, वडारवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजकुमार इटेवाड, रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य कैलास मोहिते तसेच दादासाहेब चौधरी विद्यालयाचे माजी प्राचार्य सुभाष होडगे सर हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. ओंकार कॉम्प्युटर्सचे संस्थापक अभिजीत भुतकर, प्राचार्य शितल भुतकर आणि ओंकार कॉम्प्युटर्सच्या संपूर्ण स्टाफने कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या भव्य स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले आणि परीक्षकांचे मन जिंकले. प्रत्येक स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यास आणि नव्या पिढीला सशक्त करण्यास मदत करणे हा होता.
गायन स्पर्धा – या स्पर्धेमध्ये पारंपरिक तसेच आधुनिक गाण्यांची रंगतदार मैफल रंगली. स्पर्धकांनी शास्त्रीय, सुगम आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून सर्धेत भाग घेतला होता. तबलावादन स्पर्धा – तालाची विविधता आणि गती यांचे दर्शन घडवणारी ही स्पर्धा मोठ्या उस्ताही वातावरणात पार पडली होती. या दोनी स्पर्धा ओंकार संगीत निकेतन या ठीकानी पार पडल्या.
अबॅकस स्पर्धा – गणितीय कौशल्य वाढवणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जलदगतीने गणना करून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. हि स्पर्धा ब्राईट किड्स क्लासेस याठिकाणी पार पडली
भारत नाट्यम स्पर्धा – भारतीय संस्कृती आणि पारंपरिक नृत्यशैलीचा उत्कृष्ट आविष्कार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. हि स्पर्धा नृत्य साज भारत नाट्यम या ठिकाणी पार पडली.
नृत्य स्पर्धा – विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यशैलींमधून आपले नृत्यकौशल्य सादर केले. हि स्पर्धा आर. पी. डान्स अकेडमी या ठिकाणी पार पडली.
चित्रकला स्पर्धा – विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक आणि कल्पक चित्रे साकारत कला क्षेत्रातील आपले कौशल्य दाखवले. हि स्पर्धा चित्र कृती भिंगार या ठिकाणी पार पडली
भाषण स्पर्धा – वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी विषयांवर प्रभावी मांडणी केली. निबंध स्पर्धा – विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या विचारसरणीचे प्रभावीपणे सादरीकरण केले. हस्ताक्षर स्पर्धा सुलेखन कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट हस्ताक्षराचा आविष्कार घडवला. या स्पर्धा ओंकार कॉम्पुटर येथे पार पडल्या.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना ओंकार कॉम्प्युटर्सच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक योगदानाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले.
प्रकाश कराळे सरांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून भविष्यातील आव्हाने कशी पेलायची याबद्दल मार्गदर्शन केले. राजकुमार इटेवाड सरांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि सातत्याने शिकण्याच्या वृत्तीचा महत्त्व पटवून दिला. कैलास मोहिते सरांनी शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढवण्याचे आवाहन केले.
स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीची दखल घेत त्यांना प्रेरणादायी सन्मानपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष पचपूल यांनी केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने संपूर्ण कार्यक्रमाचे वातावरण उत्साही ठेवले.
कार्यक्रमाच्या शेवटी ओंकार कॉम्प्युटर्सचे संस्थापक अभिजीत भुतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाची आठवण सांगत भविष्यात देखील अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते कोणत्याही क्षेत्रात चमकू शकतात. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हे स्पर्धा केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी नाहीत तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत.”
हा सोहळा उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला. ओंकार कॉम्प्युटर्सने पुढील काळातही अशा प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. “अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यात देखील व्हावे,” अशी भावना प्राचार्या शीतल भुतकर आणि संपूर्ण टीमने व्यक्त केली. ओंकार कॉम्प्युटर्सचा हा रौप्य महोत्सव विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या आठवणींमध्ये कायमचा कोरला गेला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

