शेगांव येथील अरुण संगणक टंकलेखन संस्थेचा ५० वा वर्धापन दीन साजरा.. संस्थेने दिले १६७२० विद्यार्थांना टंकलेखनाचे प्रशिक्षण…रेखा चांडक
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
टंकलेखन, संगणक टंकलेखनच्या प्रशिक्षणामुळे शेकडो युवकांना नौकरी प्राप्त झाल्या.
.. रेखा चांडक
शेगांव –शेगांव येथील गजानन महाराजांचे पावन भूमीत अरूण संगणक टंकलेखन व लघुलेखन इन्स्टिटयुटला दि. १ मे २०२४ रोजी ५० वर्ष होत आहे. त्या निमित्य आयोजीत केलेल्या कार्यक्रमात जिल्हयातुन, राज्यातून व संस्थेतून प्रथम आलेल्या प्रत्येक विषयातील तिन विध्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान श्रीमती शैला भागीरथ चांडक यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्षा सौ. कविता शर्मा, खामगांव ह़या होत्या. संस्थेचे भागीदार सौ. रेखा चांडक संस्थे संबधी माहिती देतांना सांगीतले की, १६,७२० विध्यार्थ्यांना टंकलेखनाचे,तर सन २०१५ पासुन टंकलेखनाचे प्रशिक्षण संगणकावर देण्यात येत आहेत यात २६७० विध्यार्थ्यांना तसेच लघुलेखन मधे १५० विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा मुळे शेकडो विध्यार्थांना सरकारी नौकरी प्राप्त झाली. तर अनेकांनी आपला खाजगी व्यवसाय सुरू केला. आज या संस्थेत तिसरी पिढी प्रशिक्षण घेत आहे. अपंग व होतकरू विध्यार्थांना चांडक परीवार तर्फे स्थापन केलेल्या श्रीमती राधादेवी फत्तेलाल चोंडक ट्रस्ट तर्फे फीच्या 25 टक्के मदत दिली जाते. पैसा अभावी कोणताच विध्यार्थी परीक्षे पासुन वंचीत राहत नाही. विध्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य अरूण चांडक सतत प्रशिक्ष्ण व मार्गदर्शन करीत आहे. तसेच निेदेर्शक म्हणुन सागर घटोल व ज्ञानेश्वर घाटोल हे काम पाहत आहे. कार्यक्रमास जिल्हा संघटनेचे रवि देशमुख, अजय चव्हाण, सतिष , मिलींद मुळे, आतीक खान, सौ. निता बोन्द्रे, अविनाश देशमुख, रफिक खन, नसिम भाई, ¬मनोज सराफ आदी संस्था चालक हजर होते.संस्थेचे प्राचार्य अरुण चांडक हे संस्थेचे कामकाज पाहत असतानाच महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटन मुंबई या संघटनेचे गेली ३० वर्षापासून प्रतिनिधित्व करत असून आज सह सचिव पदावर काम करून राज्यातील संस्था चालकांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर आहेत.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space