सकल मराठा शिवप्रेमी हितचिंतक मंडळ संचालित राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेचे उदघाटन व जिजाऊ जयंती अभिवादन सोहळा माजी मंत्री श्री.शिवाजीराव कर्डिले यांचे शुभहस्ते संपन्न ….
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
-
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबाना अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेचे उदघाटन संपन्न .
सकल मराठा शिवप्रेमी हितचिंतक मंडळ संचलित राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , अहमदनगर या जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन राज्याचे माजी मंत्री व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा .आ . शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते व नगरशहराचे कार्यतत्पर आमदार मा श्री संग्राम भैय्या जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर मा श्री . गणेश पुरी साहेब , सहाय्यक निबंधक मा श्री घोडेचोर साहेब ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा श्री . भाऊसाहेब बोठे ,नगरसेवक प्रकाशराव भागानगरे,उपसभापती मा श्री रभाजी सुळ , संचालक मा श्री संतोष म्हस्के श्री ठोंबे , माजी संचालक श्री शंकरराव साठे , महानगर बॅकेचे मुख्य व्यवस्थापक श्री धुमाळ साहेब , जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री सुरेश शिंदे साहेब , सेवानिवृत्त जिल्हा शिक्षण अधिकारी मनोहर वीर, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी सुर्यकांत कांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .
यावेळी सकल मराठा शिवप्रेमी हितचिंतक मंडळ व राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री प्रकाश कराळे यांनी सर्वमांन्यवरांचे स्वागत केले , जेष्ठ मार्गदर्शक श्री रामकृष्ण कर्डिले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन पतसंस्था स्थापनेमागची भुमिका स्पष्ट केली , व्हाईस चेअरमन प्रा. डॉ. सौ . अंजली महेश खिलारी यांनी प्रास्ताविक केले,
यावेळी बोलताना जिल्हा निबंधक सहकारी संस्था मा श्री गणेश पुरी साहेब यांनी संस्था नोंदणी करुन सुरू करण सोप आहे परंतु यशस्वी पणे चालविणे साठी प्रामाणिकपणा कार्यतत्पर राहणे गरजेचे असते असे सांगितले , राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या संचालक मंडळ व मार्गदर्शक अनुभवी समाजाचा विश्वास संपादन केलेले असल्यामुळे पतसंस्था लवकरच भरभराटीला येईल व संस्थेला सहकार खात्याचे नेहमीच सहकार्य राहील असा विश्वास दिला .
यावेळी मा श्री शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणाले की या पतसंस्थेचे मार्गदर्शक मंडळातील सदस्यांना शासकीय अधिकारी म्हणून अनुभवा बरोबरच पतसंस्था चालवण्याचाही प्रदिर्घ अनुभव आहे . यातील बहुतांश सर्वांनी शासकीय अधिकारी म्हणून व मी आमदार म्हणून एकत्र काम केले आहे त्याचे काम मी जवळून पाहिले आहे . यांनी प्रमाणिकपणे, जनतेशी निष्ठेने शासकीय सेवा करत समाजसेवा म्हणून पतसंस्था चालवली नावारुपाला आणली त्यामुळे यांनी समाजाचा विश्वास संपादन केलेला आहेच आणि आता त्यांना महिलाची साथ मिळणार आहे . माझ्या सहकार क्षेत्रातील अनुभवानुसार महिला व्यवहारात तत्पर असतात कर्ज वेळेवर भरतात तसेच संचालक मंडळामध्ये अनुभवी व तरुण उच्च शिक्षित महिला आहेत त्यामुळे हि संस्था लवकरच नावारुपाला येईल हा विश्वास आहे. यावेळी कर्डिले साहेबांनी त्यांचे सहकारातील अनुभव सांगितले. संस्थेला सहकारी बँक व सर्वच स्तरावर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
अध्यक्षीय भाषणात शहराचे कार्यतत्पर आमदार मा श्री संग्राम भैय्या जगताप साहेब यांनी अनुभवी सकल मराठा शिवप्रेमी हितचिंतक मंडळ व महिला संचालक मंडळ या दोन्ही मध्ये अनुभवी शासकिय अधिकारी , तरुण व्यवसायीक , उच्चशिक्षित संचालक मंडळ व समाजाचा विश्वास संपादन केलेला असल्याने संस्था लवकरच भरभराटीला येईल असे सांगून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले .
यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या ॲड अनुराधा येवले यांचा , तसेच कोमल वाकळे याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्री मचेसाहेब , उपअभियंता संजय हेंबाडे साहेब , सुनील जगताप साहेब , देशमुख साहेब ,शाखा अभियंता बबनराव सरोदे , तोडमल रावसाहेब , डावखर रावसाहेब , उद्योजक महादेव अकोलकर ,कष्टकरी शेतकरी विद्यार्थी चळवळ स्मायलींग अस्मिता कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, सेवानिवृत्त उपअभियंता बप्पासाहेब बोडखे , बबनराव खिलारी, उद्योजक अमोल रहाणे , बापुसाहेब ओव्हाळ , राजेश काळे , विलास शिंदे , संपतराव साठे , रामदास बर्डे , विलास शेडाळे , भाऊसाहेब हारदे , सोमनाथ गायकवाड , संजय शिंदे , धोंडिभाऊ दातीर , प्राचार्य मुरलीधर कराळे , संजय कांबळे , रेषमाताई आठरे , यादवताई ,ॲड शेखर दरंदले ॲड प्रदिप वावरे , डॉ किरण कर्डिले , दत्तात्रय कर्डिले सर , शेटे साहेब,जगन्नाथ बोडखे सर , सोपानराव मुळे ,
राजेंद्र म्हस्के , इंजि. सदाशिव तळेकर ,अरुण म्हस्के , बाबासाहेब भगत , महादेव कराळे,निंबाळकर साहेब , कातकडेसाहेब , मायाताई मरकड,विजय कावरे, जयश्री कर्डिले,वर्षा निमसे, मीरा कर्डिले ,मंगल पाटील ,गणेश सुपेकर,सविता कर्डिले ,श्री.रतन कासार साहेब , डॉ शरद कासार, रामदास गुलाब तात्या कासार चेरमन वाळकी सोसायटी,रमेश धोंडे,चंद्रकांत बोठे, किशोर बोठे व्हा चेअरमन, प्रवीण खांदवे. विशाल जाधव , गणेश वायशे , किरण सरोदे , विजय म्हस्के , दिनेश शहा , अरुण म्हस्के , गणेश कोल्हे संजय आवरे , सुनील निंबाळकर , शिवाजी देवरुखकर ,शिवश्री आप्पासाहेब बोरुडे , संदीप काटे सर, लालाभाई शेख, सोमनाथ माने , बबनराव पठारे माजी सरपंच बनपिपरी , दिलीपराव पठारे राजीव शिंदे , मोरे डी डी , कापुरवाडी येथील सरपंच सचिन दुसुंगे, माजी सरपंच शिवाजी दुसूंगे, विका सोसायटीचे माजी चेअरमन कानिफनाथ दुसंगे, अशोक कराळे व ग्रामस्थ व मार्केट यार्ड बाजार पेठेतील अनेक व्यापारी, व्यवसायीक उपस्थित होते
पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्वाती कासार यांनी सुत्रसंचलन केले तर पतसंस्थेच्या संचालिका सौ. कांता बोठे यांनी आभार मानले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space