नगर अर्बन बँक..१२३ वर्षाचा प्रवास अखेर थांबला या वाटचालीचा आढावा घेणारा लेखमाला… भाग..१ राजेंद्र गांधी (बँक बचाव समिती)
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
नगर अर्बन बँक..१२३ वर्षाचा प्रवास अखेर थांबला या वाटचालीचा आढावा घेणारा लेखमाला भाग..१..
*नगर अर्बन बँकेसारखी सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याची बँक बंद पडली ही बातमी सर्वांचे मनाला खुप वेदना देवून गेली*
1910 मध्ये स्व रावबहाद्दूर चितळेंनी स्थापन केलेली ही बँकेने शताब्दी चा टप्पा वैभवात पार केला
स्व रावबहाद्दूर चितळे तसेच भारतीय स्वतंत्रता लढ्यात सक्रिय असणारे समाजधुरिणींने स्वातंत्र पुर्व काळात इंग्रजांचे जुलमी राजवटीचे काळात देखील ही बँक सचोटीने व भारतीय नागरिकांचे आर्थिक गरजा पुर्ण करणे खाजगी सावकारीचे पाशातून सर्वसामान्यांची सुटका केली
स्व भाऊसाहेब फिरोदिया स्व डॉ निसळ सारखे दिग्गजांनी स्वातंत्रपुर्व काळात या बँकेला नेतृत्व दिले
नगर अर्बन बँकेची मुख्य शाखेची जी देखणी व मजबूत इमारत दिसत आहे ती इमारत स्व भाऊसाहेब फिरोदिया यांचे निगराणीत तयार झाली या इमारतीचे बांधकाम उच्च प्रतीचे व्हावे म्हणून तत्कालीन संचालक मंडळाने भारत देशातील नावाजलेले आर्किटेक्ट मुंबई चे मे.सुवर्णपाठकी अँन्ड. व्होरा असो.व कॉन्ट्रक्टर मे तेजू काया अँन्ड कंपनी यांना ही कामगिरी सोपविली होती
तसेच अहमदनगर चे नावाजलेले इंजिनियर मे एस बी पोखरणा यांचे देखरेखी खाली हे बांधकाम पुर्ण झाले
तत्कालीन संचालक मंडळ म्हणजे स्वातंत्रसैनिकांचे संचालक मंडळ होते.अशा या वैभवशाली संचालक मंडऴाने ही इमारत स्वातंत्रपुर्व काळात म्हणजे सन 1939 ला इमारतीचे काम पुर्ण केले व त्यावेळीचे मुंबई प्रांताचे पंतप्रधान स्व बी जी खेर यांचे हस्ते या इमारतीचे दिमाखदार उद्घाटन केले होते
या इमारतीचे बांधकामाचा व इतर सर्व गोष्टी मिळून रू 24000/- रूपये मध्ये ही हमारत पुर्ण झाली.
स्वातंत्र्यानंतर डॉ निसळांबरोबर स्व मोतीभाऊ फिरोदियांनी बँकेला नेतृत्व दिले
स्व डॉ निसळ चेअरमन असताना व स्व एस बी गांधी व्हा चेअरमन असताना बँकेचा सुवर्णमोहत्सव 1960 मध्ये पार पडला स्व मोतीभाऊ फिरोदिया व स्व नेमूकाका मुनोत यांचे सारखे प्रमुख नावे,त्या संचालक मंडळात होती.
या ठिकाणी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे त्याकाळी बँकेचे नांव होती दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल अर्बन को ऑप बँक मर्या.
जिल्ह्यातील सर्व को ऑप बँका व पतसंस्थाची मध्यवर्ती बँकेची भूमिका आपली वैभवशाली बँक पार पाडत होती
1960 नंतर स्व मोतीभाऊ फिरोदियांनी त्यांचे चेअरमन पदाचे काळात स्व पद्मश्री विठ्ठलराव विखे व बँरीस्टर धनंजयराव गाडगिळां सारखे सहकारातील दिग्गजांना सोबत घेत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला अर्थ सहाय्य पुरविणेचे उद्देशाने जिल्हा सहकारी बँकेची स्थापना केली
जिल्हा सहकारी बँकेचे पहिले खाते नगर अर्बन बँकेत खोलले गेले व सर्व व्यवहार या खातेतून होत होते
जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन स्व मोतीभाऊ फिरोदिया झाले
यानंतर बँकेचे नेतृत्वाची धुरा अहमदनगर चे विकासपुरूष स्व नवनीतभाई बार्शिकरांसारखे विकासाची दूरदृष्टि असलेल्या व्यक्ति कडे आली अहमदनगर नगरपालिका अध्यक्ष आमदारकी व नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष पद या तीन ही जबाबदारी स्व बार्शिकरांनी लिलया पार पाडली व सर्वसामान्यांची हक्काची बँक अशी ओळख निर्माण केली
स्व बार्शिकरांनी त्यांचे नगरपालिका अध्यक्षपद व बँकेचे अध्यक्षपद याची सांगड घालत शहरात अर्बन बँक कॉलनींचे निर्मिती केली व बँकेचे कर्मचारी ना हक्काची स्व मालकीची घरे अल्प किमंतीत करून दिली यामुळे कर्मचारी चे बँकेविषयीचे प्रेम व आस्था अनेक पटीने वाढली व बँक देॆखील झपाट्याने वाढली स्व बार्शिकरांना संचालक मंडळात साथ देत होते स्व झुंबरलालजी सारडांसारखे अहमदनगरचे कापड व्यवसायाचे नांव पुर्ण देशात प्रसिद्ध करणारे सारडा कुटुंबातील सदस्य.स्व झुंबरलालजी सारडांनी नंतर बँकेची कमान सांभाळली होती
स्व बार्शिकरांचे काळात आणखी दोन दिग्गजांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकले ते दोन व्यक्ति म्हणजे स्व बार्शीकरांचे लाडके शिष्य ल नंतर चे काळात नगर अर्बन बँकेचे सर्वेसर्वा व भाग्यविधाते म्हणून प्रसिद्ध झालेले स्व सुवालालजी गुंदेचा.व अहमदनगर मर्चटस बँकेची स्थापना करणेत सिंहाचा वाटा असलेल्या व ज्यांचे नेतृत्वाखाली नगर मर्चटस बँकेने प्रगतीची भरारी घेतली आहे ते आदरणीय श्री हस्तीमलजी मुनोत यांनी नगर अर्बन बँकेचे संचालकपद भुषविले होते
( भाग 1)
क्रमशः
राजेंद्र गांधी
बँक बचाव समिती
9423793321
06/10/2023
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space