नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अस्थिर व असुरक्षित वातावरण…. – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अस्थिर व असुरक्षित वातावरण….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*अस्थिर व असुरक्षित वातावरण*
******************************

महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी गांभीर्याने विचार करावा अशी सध्याची राज्याच्या शालेय शिक्षण व अर्थ विभागाची स्थिती आहे.महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने गेल्या काही महिन्यात जे काही निर्णय घेतले आहेत, त्यामुळे सबंध शिक्षक वर्गात अस्थिरता निर्माण झाली असून प्रत्येकजण असुरक्षित वातावरणात आहे.

*महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक व प्रशासकीय अधिकारी पदाच्या हजारो जागा रिक्त आहेत.गेल्या दहा वर्षात या जागा भरण्यासाठी केवळ फार्स केला गेला,तथापि जागा भरल्या नाहीत.शिक्षक संघटनांनी वेळोवेळी ज्या ज्या मागण्या केल्या त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.केवळ नेतृत्वाच्या स्पर्धेत अडकलेल्या शिक्षक संघटनांच्या मर्यादा आणि अवसान ओळखून आपल्याला हवे तेच धोरण शासनाने अवलंबिले हे सर्वश्रुत आहेच.
आता शिक्षक आणि गोरगरिबांचे शिक्षण यांच्या मुळावरच घाव घातला जात आहे*

*मागच्या आठवड्यात राज्यातील सुमारे ६२ हजार शाळा दत्तक योजना असो की अगदी कालचेच शिक्षण आयुक्तांचे समूह शाळा तयार करण्याचे पत्र असो,घाव मुळावर आहे.सामान्यांच्या मुलांना सक्तीने व मोफत शिक्षण मिळावे म्हणून राईट टू एज्युकेशन हा कायदा आणला.मात्र हाच कायदा अडगळीला टाकून शिक्षणाच्या ह्या पवित्र क्षेत्राला भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.बघा विचार करा*

*१३ मार्चला सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतिहासातील जुनी पेन्शनसह इतर मागण्यांकरिता सर्वात मोठे आंदोलन झाले, ते मोडीत काढले.आज सगळेच जण गाफील आहेत.केवळ दिखाव्यासाठी आंदोलने,मोर्चे करण्यापेक्षा आता काहीतरी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.शिक्षक संघटनांच्या आंदोलनाच्या धारा बोथट झाल्या आहेत. आता सामान्य माणूस जागा करावा लागेल.

*शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत यांचे ठराव करून शासनास सादर करावे असे वाटते.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल तरच कुठे या राज्यकर्ते व प्रशासक यांना जाग येईल. वातानुकूलित जागेत बसून धोरण ठरवून बहुजनांचे शिक्षण बंद करण्याचा कुटील डाव रचणाऱ्या हुशार मंडळींचा डाव असफल झाला पाहिजे. यासाठी सामान्य माणूस हा स्वहिताची जाणीव ठेवून रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सजग झाला पाहिजे.अन्यथा सरकारी शाळा मोडून पडणार आणि शिक्षक हे ढासळलेल्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून राहिले तर नवल वाटायला नको.वेळीच सावध होऊ या.कारण तो दिवस दूर नाही.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031