नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांना राष्ट्रपती पदक जाहीर… अहमदनगर ची मान उंचावली… आमदार संग्रामभैय्या जगताप – प्रेरणा जनहित मंच

पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांना राष्ट्रपती पदक जाहीर… अहमदनगर ची मान उंचावली… आमदार संग्रामभैय्या जगताप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने आनंद झाला नगरकरांची मान उंचावली… आमदार संग्राम भैय्या जगताप

अहमदनगर….पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.अंबादास हुलगे पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाला त्यांचा हॉटेल राजयोग येथे स्नेहीजन व मित्रपरिवा उपस्थित व्यसपीठवार माजी कृषी विभागीय कृषी अधिकारी विठ्ठलराव गुंजाळ, इंजि.सदाशिव तळेकर, अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाशराव भागानगरे, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे व्यासपीठावर उपस्थित होते, पोलीस उपनिरीक्षक हुलगे यांनी हवालदार पदापासून प्रशासनात उत्कृष्ट अशी कामगिरी केली तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.विश्वासराव नांगरे पाटील व कृष्णप्रकाश व विद्यमान पोलीस अधीक्षक ओला यांचे विश्वासू म्हणून काम केले, प्रशासनात कामकाज करत असताना पाथर्डी तालुक्यातील धोंडेवाडी येथील प्रकरण असेल किंवा चांदा येथील हत्याकांड प्रकरण असेल या शोधमोहिमेत महत्वाची कामगिरी केली..व आरोपींना गजाआड करून गुन्हा सिद्ध केला, प्रशासकीय सेवेत नेहमी कर्तव्याला महत्व दिले, धार्मिकता, स्वतःचे दोन्ही मुले त्यांनी उच्चशिक्षित करूण शासकीय सेवेत कार्यरत केले,बहीण सौ.लता म्हस्के या कै. दामोधर मास्तर विद्यालयात शिक्षिका म्ह्णून ज्ञानदान कार्य करत आहे.. मेव्हणे राजेंद्र म्हस्के जिल्हा परिषद मध्ये विविध विभागात सेवा करत आहेत. हुलगे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस महासंचालक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले, आजपर्यंत त्यांनी 332 पदक मिळवले असून आता राज्यातून ३६ सेवकांना त्यात अहमदनगर जिल्ह्यातून अंबादास हुलगे यांची एकमेव भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पदकासाठी निवड झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.. आपण आपले कर्तव्य प्रामाणिक पार पाडल्यास त्याची दखल नक्कीच समाज व शासन घेतात असे प्रकाश भागानगरे यांनी बोलून दाखवले,

विठ्ठलराव गुंजाळ यांनी प्रशासनातील सेवेचा अनुभव सांगून हुलगे यांच्या उल्लेखनीय कार्याचा अनुभव बाबत मार्गदर्शन केले..प्रकाश कराळे यांनी पोलीस दलाची नोकरी सोपी नाही त्यांना सणवार नसतात दीपावली नसते आणि न्याय मागायला संघटना नसते त्यामुळे कायम जागृत राहून गुन्हेगारांशी संघर्ष करावा लागतो त्यातूनही ही मंडळी आपल्या वर्दीशी प्रमानिक असतात असे नमूद केले, इंजि.सदाशिव तळेकर यांनी आपले शुभेच्छा पर भाषणात हुलगे परिवाराचे कौतुक केले. यावेळी माणिकराव विधाते शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस; सागर गुंजाळ शहर युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस; राजेंद्र शेटे सर, अशोक अन्हाड सर, चौधरी सर डॉ. किर्तने मैडम आदींनी मनोगत व्यक्त केले, अंबादास हुलगे यांच्या भगिनी सौ. लता म्हस्के बंधू अंबादास याचे विषयी प्रस्तविकात विविध अनुभव सांगून हुलगे कुटुंबाची वाटचाल कशी झाली आम्ही भावंड कसे घडलो हे नमूद करून बंधुला भारत सरकारने राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला, बहिणीच पण कर्तव्य काय असत हे या कार्यक्रमाच्या रूपाने समोर आनंताना आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिले. मुलगा गौरव यांनी वडिलांच्या प्रति भावना व्यक्त करून आभार मानले, इतरांच्या प्रेरनेने वडील नेहमी पोलीस खात्यात प्रामाणिकपणे नोकरी करीत असून 2023 मध्ये त्यांचे राष्ट्र पदकाचे स्वप्न पूर्ण होत आहे याचा परिवाराला आनंद असल्याचे नमूद केले.. अंबादास हुलगे म्हणाले कि माझे नोकरीचे वाटचाल करत असताना मुलांचे शैक्षणिक देखभाल केले त्यांना उच्चशिक्षित करण्यासाठी पत्नीने मोलाची साथ दिली म्हणूनच ते शासनाच्या सेवेत रुजू झालेत, भगिनी लता शिक्षिका म्हणून कार्यरत आहे सर्व स्नेहीजनांचे मित्रपरिवारांचे आशीर्वाद आणि वरिष्ठांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला वरिष्ठांनी मला वेळोवेळी संधी दिली म्हणूनच मी राष्ट्रपती पदकापर्यत पोहोचू शकलो माझ्या सत्कार प्रसंगी उपस्थित्यांचे आभार मानलं, प्राध्यापक भुसे यांनी सूत्रसंचालन केले, केतन म्हस्केे यांनी आभार मानले शेवटी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थिती देऊन अंबादास हुलगे यांची जिल्ह्यातून एकमेव निवड झाली याचा अभिमान असल्याचे सांगून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या..*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031