महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेच्या वतीने धुळे येथे लघुलेखन संस्थाप्रमुखांची कार्यशाळा संपन्न… तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा पद्धत राबवणार… डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष परीक्षा परिषद.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य लघुलेखन संस्था प्रमुखांची एक दिवसीय कार्यशाळा धुळे येथे संपन्न…..
…..
महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना मुंबई संघटनेचे वतीने लघुलेखन विषयावर चर्चासत्र दिनांक १६ऑगस्ट २०२३ रोजी रचना हॉल धुळे येथे संपन्न झाली धुळे जिल्हा टंकलेखन संघटनेने कार्यशाळेचे आयोजन केले होते.
लघुलेखन तज्ञ श्रीमती अनुराधा थिटे व लघुलेखन तज्ञ श्री.संजय नाईक यांचे पुढाकाराने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.. या कार्यशाळेस राज्यातून सुमारे ७० संस्था प्रमुख या कार्यशाळेत उपस्थित होते महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, सहसचिव अरुण चांडक, कोषाध्यक्ष सुभाष बागड, उपाध्यक्ष संतोष दाणी,सदस्य प्रमोद वाणी, सदस्या संध्याताई देशपांडे, जयश्री पाटील, सह कोषाध्यक्ष नरेश बोमेवार, माजी सदस्य ज्ञानेश्वर अजमिरे, माजी सदस्य संजय शेंडे,मोहन भोमे, समन्वय समिती सदस्य विठ्ठल बडे, धुळे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संजय कुडे,धुळे जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र
प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे व कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचे शुभ असते दीप प्रज्वलाने शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम पत्रिकेनुसार अनुराधा थिटे यांनी कार्यशाळेचे महत्व नमूद केले लघुलेखन अभ्यासक्रम व शिक्षण पद्धती बाबत त्यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळा व्हावी ही अनेक दिवसाची इच्छा आज पूर्ण होत असल्याने त्याचा अति आनंद होत असल्याचे नमूद केले..
कार्यशाळेत संजय नाईक, संजय शेंडे ज्ञानेश्वर आजमिरे, मोहन भोमे, करंदीकर मॅडम,जयश्री पाटील मॅडम, जोशी सर, काबरा सर, विठ्ठल बडे, तोडकर मॅडम, नरेश बोमेवार,वसंत महाजन, दीपक पाटील, नितीन कोल्हे,क्षीरसागर सर,अनिल भट, मनोज मते, संध्याकाळी देशपांडे, भावसार सर यांनी विचार माडले व मार्गदर्शन केले. लघुलेखन अभ्यासक्रमात
सुधारणांची गरज असल्याचे सर्वांनी नमूद केले. संजय नाईक यांनी लघुलेखन अभ्यासक्रमाची नियमावलीचे वाचन केले तज्ञांनी सादर केलेली नियमावली विचारपूर्वक केलेली असून सदरचे नियमावली व महत्त्वाच्या सुधारणा परीक्षा परिषद पद्धत यावर एकमत घेण्यात आले. संस्थाचालकांनी परीक्षा परिषदेकडे आलेले विविध परिपत्रक नियमावली शासन आदेश यांचे पालन संस्था चालकांनी करावे असे आवाहन संजय नाईक यांनी केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे हे उपस्थित होते, या कार्यक्रमात बोलताना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे म्हणाले नूतन अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परीक्षा पद्धत व कामकाज सुधारणा करताना चांगले निर्णय घेतले आहेत त्यांचे कौतुक केले. विविध सुधारणा कामी संघटना कायम साथ देईल असे सांगितले त्याचबरोबर अधिवेशनातील प्रलंबित मागण्या आठवी पास, शैक्षणिक पात्रता,प्राचार्य पदे, विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी, लघुलेखन नियमावली, लघुलेखन परीक्षा पद्धत ऑडिओ द्वारे, प्यारा टायपिंग संगणकावर टाईप करण्याची पद्धत, स्पेशल स्किल परीक्षेच्या नावात बदल जिसीसी टीबीसी 50 शप्रमी. प्रति मिनिट परीक्षा परीक्षा केंद्रांचे सुधारणा शिवाय नोकर भरती संदर्भात जीसीसी टीबीसीचा समावेश करणे कामी शासकीय व निमशासकीय शासकीय कार्यालयांना आयुक्तांच्या स्वाक्षरीने पत्रव्यवहार करणे इत्यादी विषयी मांडले . आपले मनोगतात डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सर्व मागण्या योग्य असून त्या सोडवण्याचा प्रयत्न पदभार घेतल्यापासून सर्व विभाग सर्व परीक्षांचा आढावा घेत असून आवश्यक त्या सुधारणा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.. टंकलेखन लघुलेखन व संगणक टंकलेखन परीक्षेच्या बाबतीत आलेल्या तक्रारी करावयाच्या सुधारणा व परीक्षा पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी या कामी स्वतः अनेक जिल्ह्यात भेटी दिल्या अवश्य तिथे कारवाया केल्या.. यापुढेही परीक्षा पद्धतीमध्ये मदतनीस म्हणून अथवा नियंत्रक म्हणून महसूल विभागाचा जास्तीत जास्त अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल व पारदर्शक परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला जाईल.. संघटनेने मांडलेल्या मागण्या पैकी ज्या मागण्या या परीक्षा परिषदेच्या स्तरावर आहेत त्या तात्काळ मार्गी लावू ज्या मागण्या शासनाकडील आहेत त्या शासनाकडे तात्काळ पाठवू संघटनेने अनाधिकृत संस्था व अनाधिकृत विद्यार्थी यांचा बंदोबस्त करणे कामी केलेल्या मागणीवर व त्यासाठी उपाययोजना म्हणून सुचविलेल्या बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा स्वीकार केला जाईल .. या कामी संस्था चालकांनीही बायोमेट्रिक हजेरी बाबत तयारी दर्शवावी व आवश्यक त्या मशीन व साहित्य उपलब्ध केल्यास परीक्षा परिषद तात्काळ अंमलबजावणी करेल असे अध्यक्ष यांनी नमूद केले..लघुलेखन परीक्षा ऑडिओ द्वारे डिक्टेशन देऊन प्यारा (लिप्यंतर)ही संगणकावर टाईप करून तो ऑनलाइन सादर करण्याची पद्धत अंमलात आणण्याचा विचार आहे या कामी संघटनेने सुचविलेल्या आजच्या चर्चा सत्रातील सर्व बाबी या मला लेखी स्वरूपात पाठवाव्यात त्याचा विचार करून आवश्यक ते सर्व बदल केले जातील असे सांगितले परीक्षा परिषदेचे कामकाज अग्रेसर कसे राहील चर्चासत्रात संस्थाचालकांना मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष डॉ. बेडसे यांनी राज्य संघटनेला धन्यवाद दिले.. शेवटी आभार धुळे जिल्हा संघटना अध्यक्ष संजय कुडे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अनुराधा थिटे यांनी केले कार्यशाळा आयोजित झाल्याने समाधान व्यक्त करून प्रत्येक वर्षे अशी मागणी केली ती संघटनेने मान्य केले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space