महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेकडून शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (टंकलेखन लघुलेखन)परीक्षा पारदर्शी होणेकामी केंद्रसंचालक यांना सक्त सुचना…….
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*GCC Manual Typing परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यासाठी सूचना*-
• विद्यार्थ्यांशिवाय इतर कुणालाही कोणत्याही कारणासाठी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देऊ नये. विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी आधार कार्ड व दहावीचे प्रमाणपत्र तपासणी करणे बंधनकारक राहील. काही ठिकाणी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरताना संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची चुकीची नावे नोंदविलेली असल्यामुळे, दहावीच्या प्रमाणपत्रावरील नावाची पडताळणी करण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
• गैरहजर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकावर संस्थाचालक/पर्यवेक्षक यांनी लगेचच संबंधित प्रपत्रामध्ये Absent लिहिले पाहिजे. तसेच उत्तर पत्रिका सोडवून झाल्यानंतर त्यामधील कोऱ्या पानांवर पर्यवेक्षकांनी लाल पेनाने रेघा मारणे अनिवार्य राहील. अर्धे कोरे पान जरी शिल्लक असेल, तरी त्यावर लाल पेनाने रेघा मारणे बंधनकारक आहे. मूल्यमापन करताना जर कोऱ्या पानांवर रेघा मारलेल्या आढळून आल्या नाहीत, तर त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित केंद्र संचालक,पर्यवेक्षक यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
• दररोज उत्तरपत्रिका शेवटची बॅच संपल्यानंतर लगेचच सिलबंद व्हायला पाहिजेत.
• केंद्र संचालक यांनी परीक्षा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत व उत्तरपत्रिकांची पेटी सील करेपर्यंत परिक्षा केंद्र सोडता कामा नये.
• राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात करण्याबाबत लेखी स्वरूपात विनंती करण्यात आलेली आहे.
• यापूर्वीच्या परीक्षांमध्ये काही ठिकाणी डमी उमेदवार बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून संक्षिप्त चौकशी केल्यानंतर केंद्र संचालकांनी संबंधित विद्यार्थी आणि डमी उमेदवार यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. याकरिता परिषदेकडून वेगळ्याने परवानगी मागण्याची आवश्यकता नाही. यामध्ये एखाद्या संस्थेचे संगणमत आढळून आल्यास सदर संस्थेची शासन मान्यता रद्द करण्यात येईल याची देखील जाणीव संबंधितांना करून द्यावी.
• परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी परीक्षा केंद्रांवर महसूल विभागातर्फे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्या निरीक्षक(Observer) म्हणून नेमणुका तालुका स्तरावर करण्यात आलेल्या आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकारी/SDO, तहसीलदार व इतर महसूल अधिकारी यांना सर्व केंद्रांवर आकस्मिक भेटी देण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.
एखाद्या ठिकाणी गैरप्रकार किंवा बेकायदेशीर कृत्य आढळून आल्यास संबंधित केंद्र संचालक व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी दिलेला आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space