शिर्डी येथील महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अधिवेशन पत्नीला माहेरी व मला सासुरवाडीला आल्याचा अनुभव…डॉ.यशवंत पवार कन्नड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*शिर्डी अधिवेशन एक मनोगत* डॉ.यशवंत पवार कन्नड
*पत्नीला माहेरी तर मला सासुरवाडीला आल्याचा अनुभव*
नुकतेच पाच आणि सहा मे रोजी शिर्डी येथे टंकलेखन, लघुलेखन व संगणक टंकलेखन या आपल्या संस्थेचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले ,
अधिवेशन शिर्डीला होणार आहे हे जेव्हापासून कळावे तेव्हापासून मनात एक वेगळाच आनंद होता कारण शिर्डी पासून तीन किलोमीटर साकुरी, तालुका राहाता हे माझ्या मामाचे गाव, तसेच माझे जन्मगाव त्यामुळे अधिवेशनाला जाणे हे 1000% निश्चित होते,
ठरल्याप्रमाणे नियोजन केले आणि पत्नी सौ अनिता पवार संचालिका जयकाली कॉम्पुटर टायपिंग कन्नड, जिल्हा संभाजीनगर यांना सोबत घेऊन सकाळीच सहा वाजता कन्नड सोडले आणि नऊ वाजता शिर्डी येथील सिल्वर ओक या आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचलो,
समोरच प्रवेशद्वारावर आपल्या राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाशजी कराळे सर यांनी हसतमुखाने स्वागत केले त्यांचे हसण्याने आणि स्वागताने प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
त्या नंतर आत प्रवेश करताच लॉन वर गाठ पडली महासचिव श्री हेमंतजी ढमढेरे सर यांची अणि त्यांनी ही नेहमीच्या स्टाईल ने हसून स्वागत केले,
सुरूवात तर छान झाली होती.
आणि पुढील कार्यक्रम सुरू झाले आत जाताच संयोजकाकडे नोंदणी करून घेतली ,
नोंदणी संपते न संपते तोच आयोजक जिल्हा अहमदनगर येथील संस्था चालक अगत्याने चौकशी करू लागले प्रथम नाष्टा करून घ्या ! फ्रेश झाले का? रूम मिळालीे का ?कुठे थांबणार अशा आपुलकीच्या प्रश्नांची सरबराई सुरू झाली,
आयोजक अहमदनगर जिल्ह्यातील महिला संस्था चालकांनी आमच्या सौ पवार यांना केव्हा किडनॅप केले हे कळालेच नाही दिवसभर मॅडम त्यांच्या सोबतच वावरत होत्या, गप्पा मारणे ,पाहुण्यांचे स्वागत नाष्टा ,जेवण ,फोटोसेशन यामध्ये मग्न झाल्या होत्या जणू माहेरचा आनंद उपभोगत होत्या ,
आणि शिर्डी जवळील साकुरी हे माझ्या मामाचे गाव त्यामुळे मला पण सासुरवाडीला आल्यासारखे वाटत होतं (तसी माझी सासुरवाडी धुळे आहे) ,
दिवसभर मंत्री महोदय यांचे कार्यक्रम आपल्या अधिवेशनातील इतर कार्यक्रम यामुळे वेळ कशी जात आहे कळालेच नाही,
विविध जिल्ह्यातून आलेले जेष्ठ श्रेष्ठ ,तरुण संचालक ,संस्थाचालिका यांच्या लगबगीने , उपस्थितीने कार्यक्रमात उत्साह संचारला होता,
दुपारचं जेवण तर लाजवाब होते त्यात ही आयोजक संस्था चालक आग्रहाने येऊन वाढत होते आणि आपुलकीचा आनंद देत होते,
संध्याकाळचा सुफी गीतांचा कार्यक्रम तर पहिल्या दिवसाचा कळस ठरला ,
याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ही हिरकणी सत्कार हा आगळावेगळा कार्यक्रम आपला वेगळा ठसा उमटवून गेला सत्कारमूर्ती सर्व हिरकणींना आपण आयुष्यभर केलेल्या कार्याचा कुठेतरी दखल घेऊन गौरव होत आहे त्यामुळे आनंद झालेला दिसला ,
एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील संस्थाचालकांचा अधिवेशनातील सहभाग तो ही सक्रिय सहभाग शिक्षण मंत्र्यांची उपस्थिती तसेच अधिवेशनात संघटनेला मदत करणाऱ्या हितचिंतक आमदार महोदयांचे उपस्थिती माननीय महावीर माने साहेब खानविलकर साहेब यांची उपस्थिती,
संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्यांच्या मदतीने अध्यक्ष प्रकाशजी कराळे सर,
.महासचिव हेमंतजी ढमढेरे सर यांचे सुयोग्य नियोजन व त्याला बागडसर , विरकुवर अण्णा सर , संध्याताई देशपांडे, अनुराधा थिटे मॅडम ,बागड सर, बोरुडे सर पाथर्डी , एस आर पाटील सर जळगाव ,कुंभारे सर सोलापूर, झांजड सर ठाणे, भुमेसर संभाजीनगर, सह सर्वच आयोजक संस्था चालक यांनी दिलेली अनमोल साथ या मुळे कार्यक्रम यशस्वी झाला,.
विशेष म्हणजे अभिलाषा नाईक आणि आमच्या संभाजीनगर चे बैनाडे सर यांच्या जादुई आवाजाने आलेले पाहुणे अणि संस्था चालक यांना मंत्रमुग्ध
करुन ठेवले अणि सर्व कार्यक्रम यशस्वी केला.
धन्यवाद सर्व आयोजकांचे
शेवटी शेवटी एक नामोल्लेख करावा वाटतो तो म्हणजे
नगरच्या सृष्टी कंप्युटर च्या स्वाती जाधव यांच्या नावाचा,
माझ्या सौ पहिल्यांदाच अधिवेशनाला आल्या, फारशी ओळख नाही, सुरवातीला थोडासा बुजरे पणा वाटला, पण कार्यालयात नोंदणी नंतर पहिलीच चौकशी केली स्वाती जाधव मॅडम यांनी, कुठून आलात? नाष्टा झाला का? निवास व्यवस्था चे काय? आणि त्या नंतर आमच्या सौ. नगर ग्रूप मध्ये कशा अणि कधी सामील झाल्या कळलेच नाही,
एवढी वैयक्तिक चौकशी जवळच्या लग्नात पण होत नाही
सर्वांचे मनापासुन आभार अणि अभिनंदन.
*जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट*
लग्नात नवरदेव जातो नवरी साठी
वऱ्हाडी जातात जेवणासाठी
पण अधिवेशनात संस्थाचालक जातो आपल्या मागण्या मांडण्या साठी सर्व योग्य मागण्या शासन दरबारी प्रभावी पने मांडल्या गेल्यात त्या बद्दल अभिनंदन
पण त्या मंजूर होऊ पर्यंत आपली ही शुद्धीकरण मोहीम हाती घेऊ या
आणि अनधीकृत ला पाठिंबा देणारे जे असतील ?
शोधायची गरज नाही, ते कोण आहेत सर्वाँना माहीत आहेत
त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा,
थोड्याशा स्वार्थासाठी हि घाणेरडी वृत्ती सोडण्यास सांगा
आणि ढमढेरे सर यांना विनंती आहे की ,
*जिल्हा परिषदेत अधिकाऱ्याकडून संस्था चालकांना जी हिन दर्जाची वागणूक मिळते त्या वर अंकुश ठेवण्या साठी प्रत्येक जिल्ह्यात अर्जुन सेना स्थापन करावी,*
एकट्या दुकट्या संस्था चालकांना तर तुच्छ समजतात
दुसरी कडे आपण प्राचार्य पदाची मागणी करतोय
हे मी शिर्डी येथे बोलणार होतो पण वेळ संधी मिळाली नाही
डॉ यशवंत पवार
सौ अनिता पवार
कन्नड
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space