अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक 23 एप्रिल 2023 पारनेर १,संगमनेर१, नेवासा२, शेवगाव१, पाथर्डी१, कर्जत १ व अहमदनगर येथील ७ केंद्रावर होणार मतदान….
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक 2023-2028 या वर्षासाठी निवडणूक संपन्न होत आहे, 22 वर्षानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने मोठी चुरस निर्माण झालेली आहे रावसाहेब खेडकर सहायक निबंधक, सहकारी संस्था, राहता तालुका राहता जिला अहमदनगर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे प्रशासनाने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाने पारनेर, संगमनेर,नेवासा ,शेवगाव ,पाथर्डी,कर्जत व अहमदनगर येथे मतदान केंद्र दिलेले असून सहकार खात्यातील अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियंत्रणात निवडणूक पार पडत आहे अहमदनगर येथे एकूण सात मतदान केंद्र देण्यात आलेले असून मतदान केंद्र हे भाऊसाहेब फिरोदिया सोसायटीचे विश्रामबाग शाळा अहमदनगर येथे देण्यात आलेले आहे मराठा पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन व मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष इंजि.विजयकुमार ठुबे यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ सहकार पॅनल व मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी चेअरमन रामकृष्ण कर्डिले व आजी माजी संचालक इंजि. बाप्पासाहेब बोडखे,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, माजी चेअरमन राजेंद्र म्हस्के, माजी चेअरमन इंजि. बबनराव खिलारी, माजी संचालक चंद्रकांत नवले, यशवंत ओहोळ, रमेश कराळे, विलास शिंदे राजेश काळे,संस्थापक मानद सचिव प्रकाश कराळे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल उभा ठाकला आहे दोन्ही पॅनलने आजी माजी संचालकांसह नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे खऱ्या अर्थाने 22 वर्षानंतर सभासदांना योग्य संचालक निवडण्याचा अधिकार निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेला आहे यातून खऱ्या अर्थाने समाजासाठी योगदान देणारे भविष्यात संस्था वाढविण्यासाठी मदत करणारे आणि संस्थेसाठी वेळ देणारे संचालक निवडण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे मागील अनेक वर्षांच्या मतभेदापासून व एकमेकांचे अर्ज बाद करण्याच्या षड्यंत्रात नाराजी वाढल्याने त्याचबरोबर तेच तेच उमेदवार नको म्हणून पॅनल थाटले आहेत यातून खऱ्या अर्थाने संस्थेच्या हितासाठी संचालक मंडळाचे निवडणूक ही निर्णय ठरणार आहे त्यातून समाजासाठी व संस्थेसाठी योगदान देणाऱ्या ना मतदार संधी देतील अशी चर्चा सुरू आहे.*
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space