अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न चेअरमन पदी पाचव्यांदा अर्जुनराव बोरुडे तर व्हाईस चेअरमन पदी दुसऱ्यांदा विकास उर्फ विकिशेठ जगताप यांची बहुमताने निवड….
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ (जिल्हा लेबर फेडरेशन चेअरमन पदी पाचव्यांदा अर्जुनराव (अण्णा) बोरुडे व व्हाईस चेअरमन पदी विकास उर्फ विकिशेठ जगताप यांची बहुमताने निवड…
अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ अहमदनगर (जिल्हा लेबर फेडरेशन ) संघाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२०२३ते २०२७-२०२८ या कालावधीसाठी चेअरमन पदी संघाचे विद्यमान चेअरमन अर्जुनराव मल्हारी बोरुडे यांची पाचव्यांदा फेरनिवड झाली, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन पदी विकास उर्फ विकीशेठ जगताप यांची संघाच्या व्हाईस चेअरमन दुसऱ्यांदा निवड झाली आहे चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम संघाच्या कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री के आर रत्नाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या 20 सदस्यांपैकी 18 सदस्य उपस्थित होते 18 सदस्यांमधून चेअरमन व्हाईस चेअरमन निवड ही गुप्त मतदानाने करण्यात आली, चेअरमन पदासाठी अर्जुन मल्हारी बोरुडे व्हाईस चेअरमन पदासाठी विकास उर्फ विकीशेठ जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरले विरोधी परिवर्तन पॅनलच्या वतीने चेअरमन पदासाठी प्रशांत सबाजीराव गायकवाड व व्हाईस चेअरमन पदासाठी रामचंद्र राळेभात यांनी उमेदवारी अर्ज भरला माघारी घेण्याचा वेळ संपल्यानंतर कोणीही माघार न घेतल्याने उपस्थित संचालक अर्जुनराव बोरुडे, विकास दादासाहेब जगताप, प्रशांत सबाजीराव गायकवाड, लीलावती युवराज लाळगे, रामचंद्र बापूराव राळेभात, राजू मलंग फकीर, बाळासाहेब बाजीराव सोनवणे, नामदेव पांडुरंग ढोकने, शंकर बाबुराव गायकवाड, उत्तमराव वामनराव घोगरे, अनिलराव पाचपुते, नानासाहेब माधव कानवडे, सुशांत शांताराम गजे, प्रकाश महादेव सदाफुले, विद्या विनायक काळे, रुख्मिनी गुलाबराव कराळे, प्रकाश पांडुरंग बोरुडे, किशोर सूर्यभान गायकवाड या संचालक मंडळांमधून गुप्त मतदान घेण्यात आले यावेळी झालेल्या मतदानात सहकार पॅनलचे उमेदवार अर्जुन मल्हारी बोरुडे यांना दहा मते तर प्रशांत सबाजीराव गायकवाड यांना आठ मते पडली त्याचबरोबर व्हाईस चेअरमन पदासाठी विकास दादासाहेब जगताप यांना दहा मते पडली तर व्हाईस चेअरमन पदासाठी रामचंद्र राळेभात यांना आठ मत पडले निवडणूक निर्णय अधिकारी श्री.के.आर. रत्नाळे यांनी चेअरमन पदी अर्जुनराव मल्हारी बोरुडे यांची निवड झाल्याचे जाहीर केले त्याचबरोबर व्हाईस चेअरमन पदासाठी विकास उर्फ विकीशेठ जगताप यांची निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी दोन्ही गटाचे मोठे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक अधिकारी यांना सहकारी संजय बनसोडे व अल्ताफ शेख विशाल अळकुटे यांनी सहकार्य केले, संघाचे सचिव विठ्ठल सांगळे, मॅनेजर प्रकाश कराळे, पर्यवेक्षक तुकाराम बोरुडे लिपिक ज्ञानेश्वर हजारे, शिवाजी खेंडके, पंडित बोरुडे, प्रशांत पिंपळे आदी उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहकार पॅनलचे समर्थक यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला नुतन पदाधिकारी यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, खा.सुजय दादा विखेपाटील, माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे, यांनी अभिनंदन केले तर आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी फेटे बांधून नुतन चेअरमन व्हाईस चेअरमन व सहकार पॅनलच्या संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या…..
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space