संगमनेर जि. अहमदनगर येथील मनीषा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चा 45 वा वर्धापन दिन साजरा….गणेश दिघे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*मनिषा कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहॅन्ड संस्थेचे 45 व्या वर्षात यशस्वी पदार्पण…. वर्धापन दिन उत्साहात साजरा..*
संगमनेर येथील मनिषा कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहॅन्ड या संस्थेने टायपिंग प्रशिक्षण क्षेत्रात 5 डिसेंबर 2022 रोजी 44 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करत 45व्या वर्षात पदार्पण केले आहे. संगमनेर येथे 5डिसेंबर 1978 रोजी स्थापन झालेली ही टायपिंग प्रशिक्षण संस्था आजही अविरतपणे विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देत आहे. अतिशय अडचणीच्या काळात ही संस्था उभी करण्याचे काम सुशिक्षित बेरोजगार म्हणून कर्ज घेऊन संगमनेर तालुक्यातील पहिली महिला संस्थेच्या संचालिका श्रीमती. संध्याताई देशपांडे मॅडम (मनीषाताई )यांनी केले आहे. आजही काळानुसार बदल स्वीकारत प्रशिक्षण देण्यात अग्रेसर असलेली संस्था म्हणून संगमनेर तालुक्यात संस्थेचे नाव अग्रस्थानी आहे. अनेक हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन शासनाच्या विविध पदावर रुजू आहेत. दरवर्षी संस्थेचा वर्धापन दिन संस्थेत विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या उपस्थित साजरा केला जातो. याही वर्षी 5 डिसेंबर 2022 रोजी अत्यंत उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी उपस्थित आजी माजी विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद देत आपली मनोगते व्यक्त केली. संस्थेचे प्रशिक्षक श्री. गणेश दिघे सर, श्री. संतोष जोंधळे सर व सौ. भारती अभंग मॅडम यांनी अतिशय सुंदर नियोजन करत कार्यक्रमास उत्साह निर्माण केला. त्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाविषयीं जागृत केले.
संस्थेच्या संचालिका श्रीमती. संध्याताई देशपांडे मॅडम (मनीषाताई ) यांनी संस्थेची मुहूर्तमेड उभारण्यापासून आजपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. पारंपरिक प्रशिक्षण व आधुनिक कॉम्प्युटर प्रशिक्षण यातील काळानुसार बदल तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी कराळे सर यांचे नेतृत्वाखाली कोरोना काळानंतर येणाऱ्या अनेक अडचणी बाबत मार्ग काढत संस्थाचालक आणि विद्यार्थी यांना केलेली मदत याबाबत विवेचन केले. तसेच मा. अध्यक्ष श्री. प्रकाशजी कराळे सर यांनी संस्थेला पुढील वाटचालीस 45व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक मान्यवरांनी व पालकांनी संस्थेत येऊन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी श्रीयुत. धायगुडे साहेब, श्रीयुत. सहाणेसाहेब, श्रीयुत. उदमले, श्रीयुत. गुंजाळ, श्रीयुत. पवार, श्रीयुत. किशोरजी कालडा, श्रीयुत. नरोडे व श्रीयुत लांडगे, कुंभार मॅडम व पावबाके मॅडम आदी मान्यवरानीं उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन गणेश दिघे सर यांनी करत उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले…. (प्रतिनिधी, प्रेरणा जनहितमंच ) गणेश दिघे.. संगमनेर.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space