ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावांतर्गत सिमीत असते,गावाचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा उद्देश असावा …गणेश दिघे ..गणेश दिघे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावापूर्ती सिमीत असते,गावाचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा उद्देश असावा….गणेश दिघे
*ग्रामपंचायत निवडणूक ही फक्त गावांतर्गत सीमित असते.* गावाबाहेर या निवडणुकीचा कवडीचाही संबंध नसतो. तरीही आपण गाव सोडून बाहेरच्या घटकांना महत्व देत बसतो. ही निवडणूक गावातील *गटांची* असते. यात कोणताही *पक्ष* विचारात घेतला जात नाही. तशी घटनेत तरतूद नाही. येथे गावातील *गट* हेच पक्ष असतात. परंतु तरीही लोक येथे गावाबाहेरील लोकांचा किंवा राजकीय पक्षांचा संबंध जोडून जनतेची *दिशाभूल* करतात. येथे गटाची *शिरजोरी* असते. काही गट *काम* करून शिरजोर असतात तर काही गट विरोधी *विचारावर* शिरजोरी करतात. तर काही गट *जातीपातीवर* भर देत तर काही गट *वर्चस्ववादी* असतात. असे अनेक प्रकारचे गट मिळून ग्रामपंचायत निवडणूक होत असते. यात *टोळीयुद्ध* जास्त दिसून येते. खरे उद्देश बाजूला राहतात. आता तर फक्त पद *प्रतिष्ठा* हाच उद्देश पुढारी समोर ठेऊन निवडणूक लढवतात. *विकासासाठी* निवडणूक फारच कमी प्रमाणात होताना लक्षात येते. *प्रतिष्ठा* कमी होऊ नये यासाठी आजकाल *घराघरात* लढाई सुरु आहे. *सरपंच* पद लोकनियुक्त असल्याने *सदस्य* मात्र स्वतः च्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतात. सरपंच पदावर अविश्वास ठराव पारित होण्यासाठी बहुमत लागते. ते बहुमत न होऊ देण्यासाठी *मूठभर* सदस्य जरी हातात ठेवले तरी बहुमत जुळत नाही. त्यामुळे ते सहज बगलात ठेवता येतात. त्यामुळे होणारे सरपंच सदस्यांप्रति फार विचार करणार नाहीत. राहिले उपसरपंच पद, ते तर *धोत्र्याचे फुल* त्याला वासच नसतो. जे त्यासाठी लढतात त्यांना खरे राजकारणच कळाले नाही असा अर्थ होतो. *गावचा विकास हाच ग्रामपंचायत निवडणुकीचा मूळ उद्देश* म्हणून खरा उद्देश बाजूला ठेऊन आपण पवित्र लोकशाहीला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना न्याय देऊ शकतो का? हाच मोठा प्रश्न पडतो.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space