महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या स्वायत्त संस्थेत चांडाळ चौकडीचा प्रताप “लेखाधिकारी” यांना काढले कॅबिनचे बाहेर …
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या स्वायत्त संस्थेत चांडाळ चौकडींचा प्रताप लेखाधिकार्यांना काढले केबिनच्या बाहेर…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यलयात काही कामानिमित्ताने गेलो असता लेखा विभागात भेट दिली या ठिकाणी एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्यात अग्रेसर असलेले व स्वायत्त असलेली श्रीमंत अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परीक्षा परिषदेचे लेखाधिकार्यांसाठी जीसीसी विभागाच्या प्रवेशद्वारावरच लेखाधिकार्यांचे केबिन कार्यरत होते सदरचे कार्यलयात या पूर्वी अनेक लेखाधिकारी याच कॅबिन मधून कामकाज करत होते, वास्तविक पाहता सर्वच बाह्य परीक्षांसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीचे रेकॉर्ड लाखोच्या ठेवी च महत्त्वपूर्ण असे रेकॉर्ड चेक बुक निविदा विभागाचे दस्तऐवज असे सर्वच कागदपत्र लेखाधिकार्याकडे असतात करोडो रुपयांचे बिल अदा केलेल्या फाइल्स या तर त्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेचा अशासकीय शासकीय सदस्य असतांना 2013 ते 17 व 2017 ते 2021 पर्यंत लेखाधिकार्यांचे केबिन कार्यरत होते मात्र अध्यक्ष शरद गोसावी यांच्या काळात परीक्षा परिषदेतील काही चांडाळ चौकडीने या अधिकाऱ्यांचे केबिन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सहा आयुक्तांचे दालन सुरु करून लेखाधिकाच्या पेक्षाही सहा आयुक्त महत्वाचा असल्याचे चांडाळ चौकडीने ठरवले असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांचे केबिन उभारले आहे त्याच डोक्यावर पहिले मजल्यावर पूर्वी सहायक आयुक्तांचे कॅबिन कार्यरत होते, सहाय्यक आयुक्त प्रभारी आयुक्त आणि त्यांचे चांडाळ चौकडीने परीक्षा परिषदेचे येणारे अध्यक्षांची दिशाभूल करत आहे याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असून अनेक प्रशिक्षित कर्मचारी नोकरी सोडत आहेत तर काहींनी नोकरी सोडून दिली आहे शिक्षण संचालक दर्जाचे अध्यक्ष या वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना बळी पडत आहेत ही बाब निदर्शनास आलेले आहे एकंदरीतच चांडाळ चौकडीच्या या मनमानी कारभाराला नव्याने रुजू झालेले अध्यक्ष महेश पालकर आळा घालतील का? हीच अपेक्षा धरून लेखाधिकार्यांना न्याय देऊन पुन्हा केबिन उपलब्ध करून देतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र कोणीतरी मनमानी होत असलेल्या कारभाराला वाचा फोडली पाहिजे याच भावनेने प्रेरणा जनहित मंचाच्या माध्यमातून लेखाधिकाऱ्यांना पुन्हा कॅबिन मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे खरे..
*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

