“अनधिकृत विध्यार्थी” संस्थाचालकांच्या त्रासदायक प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी शिक्षणाधिकारी बुलढाणा जिल्हा यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक…राज्य संघटना सहसचिव अरुण चांडक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बुलढाणा जिल्हा संघटनेची शिक्षणाधिकारी यांचे समवेत अनधिकृत संस्थांच्या तक्रारी व अनधिकृत विध्यार्थी बसविणाऱ्या संस्थाबाबत चौकशी कामी बैठक संपन्न GCC TBC च्या परीक्षेत कार्यक्षेत्रा बाहेरील विध्यार्थी बसविलेल्या संस्थाची चौकशी पूर्ण करून मान्यता काढणार…
नांदुरा-खामगाव यांच्या संयुक्त सभेत एकमताने निर्णय.
शेगाव – दि 3/11/2022 रोजी मा. शिक्षणाधिकारी, बुलढाणा यांच्या दालनात खामगाव, नांदुरा, जिल्हा समनव्य समिती व अधिकारी यांच्या संयुक्त बैठक संपन्न झाली,
खामगाव येथील संस्था चालकांनी केलेल्या तक्रारीवर मा. आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शन नुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तक्रारी मधे खामगाव येथील 60 अवैध विद्यार्थी बसविल्याची यादी सादर करण्यात आली, यावर चर्चा करतांना 3/4 संस्थेने अप्रत्यक्ष रित्या खामगाव, शेगाव, बुलढाणा आदी जागेचे विद्यार्थी बसविल्याचे मान्य केले, यावर उपशिक्षणाधिकारी मा. अनिल अकाळे यांनी सांगितले की हा विषय गंभीर असून संस्थाची तपासणी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच पुढे सांगितले की, जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेनी आपल्या कार्यक्षेत्र सोडून जर विद्यार्थी आपल्या संस्थेत प्रवेश घेत असल्यास चौकशी करुनच प्रवेश द्यावा .
या बैठकीला मार्गदर्शन करतांना श्री मुंढे सर यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त पुणे कडून विवीध पत्रावर चोकशी करण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी एक समिती नेमली असून त्यात बुलढाणा, खामगाव, मोताळा आदी ठिकाणच्या तक्रारीवर चोकशी करून आपला अहवाल मा. आयुक्त यांना त्वरीत सादर करतील, संस्था चालकांनी आपले रेकॉर्ड अद्यावत ठेवावे, नियमानुसार वर्ग स्वच्छ, संगणक क्षमते नुसार जागा, निदर्शक उपस्थिती, हजेरीबुक, एसटी पास रजिस्टर आदी रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे.
समन्वय समन्वय समिती सदस्य व राज्य संघटनेचे सहसचिव अरुण चांडक म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या संख्येने अवैध विद्यार्थी बसविल्याची बाब गंभीर असून याची दखल मा. आयुक्त व राज्य संघटना व जिल्हा संघटना यांनी गंभीर पणे घेतली असून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा जाईल, त्यात जिल्ह्यातील पदाधिकारी सापडल्यास त्यांचेवर ही कारवाई होईल, जानेवारी 2023 होणाऱ्या परीक्षेत परीक्षा फॉर्म भरल्यानंतर असे काही आढळल्यास याची माहिती ताबडतोब जिल्हा व राज्य संघटने च्या पदाधिकारी यांच्या whatapp वर पाठवावी.
बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर खालील प्रमाणे ठराव एक मताने पास करण्यात आले
1 कोणीतीही संस्था अवैध विद्यार्थी बसविणार नाही असे लेखी आश्वासन संस्थाचालकांनी दिले.2 तालुका व जिल्हा बाहेरील विद्यार्थी यांना प्रवेश दिल्यास योग्य ती दखल घेतली जाईल.3 नियमानुसार रेकॉर्ड ठेवण्यात येईल.4 नियम बाहय काम संस्थेस आढळल्यास कारवाही करण्यात येईल.बैठक ला मा उपशिक्षणाधिकारी अनिल अकाळे, श्री मुंढे , समन्वय समिती सदस्य तथा राज्य संघटनेचे सहसचिव अरुण चांडक, जिल्हा संघटना सचिव रवी देशमुख, अजय चव्हाण,खामगाव येथील प्रभारी जिल्हाध्यक्षा सौ कविता शर्मा, संजय कुलकर्णी, श्रीकांत रानडे, अजीत कुलकर्णी नांदुरा केंद्रावरील पुरुषोत्तम वावगे, किशोर गरुड,गजानन चोपडे, वैभव चोपडे, योगेश गायकी, अविनाश देशमुख, आदी हजर होते।
खामगाव येथील संस्था चालकांनी नांदुरा केंद्र बंद करण्याची मागणी केली, मा. अधिकारी वर्गातून सांगण्यात आले की केंद्र बदल होईल, आमचे प्रयत्न सुरू आहे, नांदुरा च्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची सुध्दा काळजी घेऊन शासनाच्या नियमानुसार असलेले सुविधा देत आलेली शिक्षण संस्था न मिळाल्यास बाहेर गावाला सुद्धा परीक्षा केंद्र देण्यात येईल, या कामी चांगले परीक्षा केंद्र शोधून मार्ग काढण्याचे आश्वासन उपशिक्षणाधिकारी अनिल अकाळे यांनी दिले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

