स्व.दादासाहेब विष्णू गायकवाड पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य यांचे प्रथम पुण्यस्मरण 3 मे अक्षयतृतीया दिनी सावडी ता.करमाळा येथे युवा किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज काकडे यांचे किर्तन सेवेने संपन्न होत आहे….केतन गायकवाड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
-
महाराष्ट्र राज्याचे पोलीस मित्र सर्व महाराष्ट्राला परिचित असणारे सावडी ता.करमाळा जि. सोलापूर गावचे सुपुत्र स्व.दादासाहेब गायकवाड यांचे प्रथम पुण्यस्मरण 3 मे अक्षयतृतीया च्या दिनी अडबंगनाथ संस्थान भामठान ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील युवा किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज काकडे यांचे किर्तन सेवेने पार पडत आहे .
सावडी गाव हे अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण च्या टोकावर राशीन पासून 12 किमी वर करमाळा तालुक्यात वसलेले . याच गावातील सुपुत्र दादासाहेब गायकवाड हे राजकीय सामाजिक व विशेष करून पोलीस दलात पोलीस मित्र म्हणून काम करत होते..महाराष्ट्र राज्यात 70% IAS आणि IPS पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे ते मित्र होते..महाराष्ट्र पोलीस दलाविषयी त्यांना अतिशय अभिमान होता..अधिकारी असो की पोलीस शिपाई त्यांचे नावे हुद्दे आणि नियुक्तीचे ठिकाण त्यांना तोंड पाठ असे. IAS अधिकारी व IPS अधिकारी यांचे निवडीची ब्याच वर्ष निवडसूची क्रमांक आणि प्रथम नियुक्ती जन्म असो किंवा विवाहाचे दिनांक अगदी त्यांचे तोंड पाट असे..प्रत्येकाची भेट घेणे शुभेच्छा देणे कार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हे पोलीस मित्र दादांचे काम होते..महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेच्या प्रत्येक अधिवेशनास त्यांची हजेरी असे संस्था महाराष्ट्रातील संस्थाचालक त्यांना त्यांचे कामासाठी कधीही कॉल करत असत दादा त्यांचे म्हणणे आयकून तात्काळ मदत करत असत..
सावडी व करमाळा तालुक्याच्या राजकारणात दादांना अतिशय मान असे अनेक राजकीय व्यक्ती त्यांना मित्र गुरुस्थानी मानत असे..मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्व.दादासाहेब गायकवाड यांच्या रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांचं प्रथम वर्ष श्राद्धय 3 मे रोजी सावडी ता.करमाळा जि. सोलापूर येथे संपन्न होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

